तुमचा स्मर्ट टीव्ही स्वच्छ करताना या टीप्स फॉलो करा, नेहमीच दिसेल नवा

तुमचा स्मार्ट टीव्ही सुद्धा घराची शान आहे, पण त्याची योग्य स्वच्छता किती महत्त्वाची आहे हे तुम्हाला माहित आहे का? चुकीच्या पद्धतींचा अवलंब केल्याने नुकसान होऊ शकते. या लेखात, आम्ही तुम्हाला काही सोपे आणि सुरक्षित मार्ग सांगणार आहोत ज्यामुळे तुमचा टीव्ही नेहमीच नवीन दिसेल.

तुमचा स्मर्ट टीव्ही स्वच्छ करताना या टीप्स फॉलो करा, नेहमीच दिसेल नवा
स्मार्ट टीव्ही
Follow us
| Updated on: Dec 06, 2024 | 7:44 PM

आजकाल स्मार्ट टीव्ही हा आपल्या सर्वांच्या घराचा महत्त्वाचा भाग बनला आहे. तसेच आपल्या स्मार्ट टीव्हीची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी आणि दीर्घकाळ वापरण्यासाठी टीव्हीला व्यवस्थित स्वच्छ करणे महत्वाचे आहे. त्याचबरोबर जर तुम्ही योग्य वेळी टीव्हीची साफसफाई न केल्यास टीव्ही स्क्रीनखराब होऊ शकते. येथे आम्ही तुम्हाला काही सोप्या आणि सुरक्षित टिप्स सांगणार आहोत. ज्याने तुमचा स्मार्ट टीव्ही स्वच्छ राहतील आणि अगदी नवीन दिसेल.

1. टीव्ही बंद करा आणि अनप्लग करा

साफसफाई करण्यापूर्वी नेहमी टीव्ही बंद करा आणि पॉवर केबल अनप्लग करा.

हे केवळ आपल्या सुरक्षिततेसाठी आवश्यक नाही तर टीव्ही बंद केल्याने टीव्हीच्या स्क्रिनवरील धूळ आणि डाग लगेच दिसतात. त्यामुळे तुम्ही स्मार्ट टीव्हीची स्क्रीन सहजतेने साफ कराल.

2. मायक्रोफायबर कापड वापरा

स्क्रीनची धूळ पुसण्यासाठी नेहमी मायक्रोफायबर कापड वापरा. हे कापड इलेक्ट्रिक वस्तू साफ करण्यासाठी वापरला जातो. तुम्हाला हे कापड बाजारात व ऑनलाईन वेबसाईट वर मिळू शकते.

हे कापड टीव्हीच्या स्क्रीनवर बारीक स्क्रॅच देखील येऊ देत नाही आणि धूळ सहज पुसून टाकते.

पेपर टॉवेल, टिश्यू पेपर किंवा कापड वापरू नका, कारण यामुळे स्क्रीनखराब होऊ शकते.

३. हलके ओले कपडे वापरा (गरज पडल्यास)

स्क्रीनवर डाग असतील तर मायक्रोफायबरचे कापड हलके ओले करावे.

तसेच टीव्हीच्या स्क्रीनवर जास्त पाणी वापरू नका आणि थेट पाणी शिंपडू नका.

स्क्रीन हलक्या हाताने पुसून घ्या, जास्त दाब देऊन पुसू नका.

4. स्क्रीन क्लीनरचा योग्य वापर करा

फक्त इलेक्ट्रिक वस्तूच्या स्क्रीनसाठी वापरण्यात येणारे क्लीनरचा वापर करा.

अल्कोहोल, अमोनिया किंवा इतर कोणत्याही रसायन-आधारित क्लीनर वापरणे टाळा.

ब्रँडच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार स्वच्छता प्रॉडक्ट निवडा.

5. स्वच्छ व्हेंट आणि पोर्ट साफ करणे

टीव्हीच्या व्हेंट आणि पोर्टमध्ये धूळ जमा होते, ज्यामुळे टीव्हीचा मागील भाग हा ओव्हरहिट होऊ शकते.

हे भाग स्वच्छ करण्यासाठी सॉफ्ट ब्रश किंवा एअर ब्लोअर वापर करा.

6. रिमोट कंट्रोल स्वच्छ करणे देखील महत्वाचे आहे

ओलसर कापड आणि सौम्य साबणाने रिमोट कंट्रोल स्वच्छ करा.

रिमोटच्या बटणांमधील घाण काढून टाकण्यासाठी क्यू-टिप किंवा टूथपिक वापरा.

7. नियमित स्वच्छतेची काळजी घ्या

आठवड्यातून एकदा तरी टीव्ही स्क्रीन आणि व्हेंट स्वच्छ करा.

बोटांचे ठसे आणि धूळ जमा होऊ नये यासाठी स्क्रीन नियमितपणे स्वच्छ करत रहा.

8. टीव्ही योग्य ठिकाणी ठेवा

टीव्ही अशा ठिकाणी ठेवा जिथे धूळ कमी असेल आणि थेट सूर्यप्रकाश नसेल.

स्वयंपाकघरात किंवा अतिदमट ठिकाणी टीव्ही ठेवणे टाळा.

अल्लू अर्जूनच्या जामिनाचा मार्ग मोकळा,इतक्या दिवसांची न्यायालयीन कोठडी
अल्लू अर्जूनच्या जामिनाचा मार्ग मोकळा,इतक्या दिवसांची न्यायालयीन कोठडी.
'ते' मंदिर कोणाचं हेही माहिती नाही अन्.., चित्रा वाघ यांचा कोणाला टोला
'ते' मंदिर कोणाचं हेही माहिती नाही अन्.., चित्रा वाघ यांचा कोणाला टोला.
रविवारी भाजप, शिवसेनेसह राष्ट्रवादीचे कोणते नेते घेणार मंत्रिपदाची शपथ
रविवारी भाजप, शिवसेनेसह राष्ट्रवादीचे कोणते नेते घेणार मंत्रिपदाची शपथ.
आता मुंबईऐवजी 'या' ठिकाणी येत्या १५ तारखेला होणार मंत्रिमंडळ विस्तार
आता मुंबईऐवजी 'या' ठिकाणी येत्या १५ तारखेला होणार मंत्रिमंडळ विस्तार.
'राष्ट्रवादीवर बोलणारे मिटकरी कोण? त्यांना अकोल्यात..', कोणाचाी टीका?
'राष्ट्रवादीवर बोलणारे मिटकरी कोण? त्यांना अकोल्यात..', कोणाचाी टीका?.
विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय, नाना पटोले यांचं दिल्लीत पत्र अन्.
विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय, नाना पटोले यांचं दिल्लीत पत्र अन्..
राष्ट्रवादी पुन्हा एक होणार? रोहित पवारांच्या आईनं काय केलं वक्तव्य?
राष्ट्रवादी पुन्हा एक होणार? रोहित पवारांच्या आईनं काय केलं वक्तव्य?.
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला ‘पुष्पा 2’प्रकरणी अटक, नेमकं काय घडलं?
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला ‘पुष्पा 2’प्रकरणी अटक, नेमकं काय घडलं?.
फडणवीसांचं वक्फ बोर्ड विधेयकासंदर्भात मोठं वक्तव्य, जिथे बोट ठेवतील...
फडणवीसांचं वक्फ बोर्ड विधेयकासंदर्भात मोठं वक्तव्य, जिथे बोट ठेवतील....
बेस्ट चालकांची सरप्राईज टेस्ट;महाव्यवस्थापकांचे कंत्राटदारांना निर्देश
बेस्ट चालकांची सरप्राईज टेस्ट;महाव्यवस्थापकांचे कंत्राटदारांना निर्देश.