तुमचा फोन पर्सनल गोष्टी ऐकतो ! एक सेटिंग करा बंद आणि..

तुमचा स्मार्टफोन तुमचे सर्व पर्सनल गोष्टी ऐकत असतो. जर तुम्हाला तुमचा वैयक्तिक डेटा वैयक्तिक ठेवायचा असेल तर तुमच्या फोनमध्ये हे तीन सेटिंग्ज ताबडतोब बंद करा. अन्यथा, तुमची सर्व माहिती थर्ड पार्टी अॅप्स किंवा स्कॅमर्सच्या हाती पडण्याचा धोका असू शकतो. चला तर मग आजच्या या लेखात आपण आपल्या स्मार्टफोनच्या कोणत्या तीन सेटिंग्ज बंद करू करणे गरजेचे आहे ते जाणून घेऊयात...

तुमचा फोन पर्सनल गोष्टी ऐकतो ! एक सेटिंग करा बंद आणि..
स्मार्टफोन ऐकतोय तुमच्या पर्सनल गोष्टी
Image Credit source: TV9 bharatvasrh
| Edited By: | Updated on: Apr 28, 2025 | 1:44 PM

आजकाल आपण सर्वजण स्मार्टफोन वापरतो. बोलण्यापासून ते बँकिंग, खरेदी करण्यापासून आणि फोटो काढण्यापर्यंत सर्व कामे आपण आपल्या फोनमध्ये करत असतो. त्यात हा स्मार्टफोन आपल्या आयुष्याचा एक भाग झाला आहे. ज्यामुळे फोनशिवाय आपण एक क्षण सुद्धा वेगळे राहत नाही. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमचा फोन तुमचे संभाषण देखील ऐकू शकतो? पण प्रश्न असा येतो की हे कसे घडते? खरं तर, बऱ्याचदा आपण स्वतः आपल्या फोनला अशी परवानगी देतो की तो आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी रेकॉर्ड करू शकतो. यामुळे, तुमच्या वैयक्तिक बाबी, तपशील आणि सवयी थर्ड पार्टीला कळू शकतात. जर तुम्हाला हे टाळायचे असेल तर हे 3 सेटिंग्ज ताबडतोब बंद करा. कोणत्या आहेत त्या सेटिंग्ज जाणून घेऊयात…

Google Assistant सेटिंग्ज

आपल्या स्मार्टफोनमध्ये गुगल व्हॉइस असिस्टंट आहे जो “Hey Google” असे म्हणताच सक्रिय होतो. हे वैशिष्ट्य मायक्रोफोन नेहमी चालू ठेवते. ज्यामुळे तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी रेकॉर्ड केल्या जाऊ शकतात. गरज नसल्यास तुम्ही ते नेहमी बंद ठेवावे. यासाठी फोनच्या Settings मध्ये जा. Googleवर क्लिक करा. यानंतर All Services वर जा आणि Search वर क्लिक करा. येथे Assistant & Voice चा पर्याय असेल. त्यावर क्लिक करा. आता
Google Assistantवर जा आणि Hey Google बंद करा. यामुळे तुमचा मायक्रोफोन नेहमीच सक्रिय राहणार नाही.

Mic Permission

अनेक अ‍ॅप्स गरज नसतानाही मायक्रोफोनची परवानगी मागतात. अशावेळेस तुम्ही त्यांचा वापर करत असाल किंवा नसाल तरी ते तुमचे संभाषण ऐकू शकतात. तुम्ही ते अशा प्रकारे तपासू शकता आणि बंद देखील करू शकता. यासाठी Settingsमध्ये जा आणि Appsवर क्लिक करा. येथे Permissionsतपासा आणि Microphoneवर क्लिक करा. कोणत्या अॅप्सना मायक्रोफोन परवानगी आहे ते तुम्ही पहा. आवश्यक नसलेल्या अ‍ॅप्समधून मायक्रोफोन परवानगी काढून टाका.

Always Listening Feature

काही स्मार्टफोनमध्ये असे फिचर्स असते जे तुमचा आवाज नेहमी ऐकते जेणेकरून ते लगेच प्रतिसाद देऊ शकेल. पण यामुळे तुमच्या प्रायव्हसीलाही धोका निर्माण होऊ शकतो. जर ते तुमच्या फोनमध्ये असेल तर तुम्ही ते अशा प्रकारे बंद करू शकता. यासाठी देखील फोनच्या Settingsमध्ये जा आणि Accessibility किंवा Privacyवर क्लिक करा. येथे तुम्हाला ते Always listening किंवा Voice Wake Upसारख्या पर्यायांमध्ये मिळेल. तुम्ही ते बंद करावे.

याशिवाय, कोणताही थर्ड पार्टी अ‍ॅप इन्स्टॉल करण्यापूर्वी, त्याचे रिव्ह्यू नक्कीच वाचा. इतकेच नाही तर, अॅपवर नोंदणी करताना, अटी आणि शर्तींकडे देखील लक्ष द्या आणि परवानगी देताना काळजी घ्या.