Smartphone Blast : का होतो स्मार्टफोनचा ब्लास्ट? अनेकांना नाही माहिती यामागचे कारण

स्मार्टफोनला आग लागण्याची शक्यता फार कमी असते; मात्र आपण फोनचा वापर कसा करतो यावर ही गोष्ट अवलंबून असते.

Smartphone Blast : का होतो स्मार्टफोनचा ब्लास्ट? अनेकांना नाही माहिती यामागचे कारण
स्मार्टफोन ब्लास्टImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Mar 15, 2023 | 10:13 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये स्मार्टफोनचा स्फोट (Smartphone Blast) झाल्याच्या अनेक गंभीर घटना समोर आल्या आहेत. स्मार्टफोनला आग लागण्याची शक्यता फार कमी असते; मात्र आपण फोनचा वापर कसा करतो यावर ही गोष्ट अवलंबून असते. स्मार्टफोनमध्ये 4500mAh किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेची बॅटरी असते. तसंच अलीकडे स्मार्टफोनच्या फास्ट चार्जिंगची सोही उपलब्ध असते. त्यामुळे स्मार्टफोन योग्य पद्धतीने वापरणं गरजेचं आहे.

डुप्लिकेट चार्जरचा वापर

फास्ट चार्जिंग अॅडाप्टरचा (Fast charging adaptor) वापर करताना खूप काळजी घ्यावी. आपल्या फोनसोबत आलेला चार्जरच वापरावा. जास्त पॉवरच्या चार्जरचा वापर केल्यास तुमच्या फोनच्या बॅटरीवर ताण येऊ शकतो. डुप्लिकेट चार्जरचा वापर टाळावा.

डॅमेज असतानाही फोनचा वापर करणं

तुमचा स्मार्टफोन पडल्यामुळे फुटला असेल, तर तसाच वापरू नये. लगेच सर्व्हिस सेंटरला नेऊन फोन दुरुस्त करून घ्यावा. डिस्प्ले फुटला असेल किंवा बॉडी फ्रेम तुटली असेल, तर त्यातून पाणी, घाम आत जाऊन फोनची बॅटरी किंवा इतर पार्ट बिघडू शकतो. अशा फोनचा वापर करणं धोकादायक ठरू शकतं.

हे सुद्धा वाचा

 थर्ड पार्टी किंवा डुप्लिकेट बॅटरीचा वापर

थर्ड पार्टी किंवा डुप्लिकेट बॅटरीचा वापर केल्यामुळे गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. खराब लिथियम-आयन बॅटरी (Lithium ion battery) तुमच्या फोनला जास्त गरम करू शकते. त्यामुळे फोनला आग लागण्याची शक्यता वाढते.

गरम झाल्यास फोन वापरू नये

फोन खूप जास्त गरम झाला आहे, असं वाटलं तर तो बाजूला ठेवून त्याच्यापासून दूर जावं. फोनचं चार्जिंगही बंद करावं. फोन चार्ज करण्यासाठी कार चार्जिंग अॅडाप्टरचा वापर नको. प्रवासात कार चार्जरऐवजी (Car charger) पॉवर बँकचा वापर करावा. भारतात कार उत्पादक कंपन्या थर्ड पार्टी व्हेंडरकडून अॅक्सेसरीज इंस्टॉल करून घेतात. बऱ्याचदा त्यात वायरिंगच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष केलेलं असतं. त्यामुळे या चार्जरमध्ये चार्ज करताना पॉवर अचानक वाढू शकते. त्यामुळे, तुमच्या फोनला आग लागू शकते.

फोन ओव्हरचार्ज करणं

फोन रात्रभर चार्जिंगला लावू नये. तसंच कायम 100 टक्के चार्जिंग करणं आवश्यक नाही. फोनची बॅटरी 90 टक्के चार्ज झाल्यानंतर चार्जिंग बंद करणं ही चांगली सवय आहे. यामुळे बॅटरीचं आयुष्य वाढतं. जास्त चार्ज केल्यामुळे बॅटरी फुगते आणि फुटू शकते.

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.