Smartphone चा स्फोट होईल, फास्ट चार्जर वापरत असाल तर ‘हे’ नक्की वाचा

अल्ट्रा फास्ट चार्जर हे तुमचे स्मार्टफोन खूप वेगाने चार्ज करू शकतात, त्यामुळे अनेकजण त्यांचा जास्त वापर करत आहेत. पण या फास्ट चार्जरच्या नादात तुमच्या फोनचे खूप मोठे नुकसान होऊ शकते.

Smartphone चा स्फोट होईल, फास्ट चार्जर वापरत असाल तर 'हे' नक्की वाचा
फास्ट चार्जरच्या नादात तुमच्या फोनचे खूप मोठे नुकसान होऊ शकते
Follow us
| Updated on: Nov 18, 2024 | 2:43 PM

अल्ट्रा फास्ट चार्जर हे तुमचे स्मार्टफोन खूप वेगाने चार्ज करू शकतात, त्यामुळे अनेकजण त्यांचा जास्त वापर करत आहेत. पण या फास्ट चार्जरच्या नादात तुमच्या फोनचे खूप मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे रोज फास्ट चार्जर वापरताना खूप काळजी घेतली पाहिजे. आज आम्ही तुम्हाला अश्याच फास्ट चार्जिंग केल्याने होणाऱ्या 5 नुकसानाबद्दल सांगणार आहोत.चला तर मग जाणून घेऊयात.

ओव्हरहिट होणे

आपला फोन लवकर चार्जिंग व्हावा म्हणून अनेक जण मोठ्या प्रमाणात फास्ट चार्जिंग करत असलेला चार्जरचा वापर करतात. फास्ट चार्जिंग चार्जरची सर्वात मोठी समस्या म्हणजे ते तुमचा फोन खूप गरम होतो. हे चार्जर अतिशय कमी वेळात बॅटरीला भरपूर पॉवर देतात, ज्यामुळे तुमचा फोन ओव्हरहिट होतो. आणि हे तुमच्या फोनसाठी खूप धोकादायक देखील ठरू शकतो. या ओव्हरहिटमुळे तुमच्या फोनच्या आतील भागांचे नुकसान होऊ शकते, तसेच बॅटरी आयुष्य कमी होऊन जाते. एवढेच नाहीतर तुमचा फोने जास्त गरम झाल्यावर कधी कधी फोनचा स्फोट होऊ शकतो, जो अत्यंत धोकादायक आहे.

बॅटरी खराब होणे

जी लोकं बाहेर सतत फिरत असतात, त्यांच्यासाठी फास्ट चार्जिंग चार्जर चांगले आहे. पण तुम्ही देखील सतत फोन चार्जिंग करत असाल तर यामुळे फोनची बॅटरी लवकर खराब होते. जर तुमच्या फोनमध्ये लिथियम-आयन बॅटरी असेल तर ओव्हरहिट आणि वारंवार फास्ट चार्जिंगमुळे बॅटरी खराब होते.त्यामुळे तुमचा फोन पूर्वीपेक्षा जास्त वेळ चार्ज होणार नाही.

फास्ट चार्जर वापरणे योग्य नाही

सर्वच फोन फास्ट चार्जिंगचा योग्य वापर करू शकत नाहीत, हे खरे आहे. जर तुम्ही तुमच्या फोनलवकर चार्ज व्हावा म्हणून फास्ट चार्जर वापरत असाल तर यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. फोन पटकन चार्ज होणार नाही, जास्त गरम होणार नाही किंवा अजिबात चार्ज होणार नाही. तुमचा फोन कोणत्या प्रकारचे चार्जरने चार्ज होऊ शकतो हे तुम्ही नेहमीच तपासले पाहिजे. यासाठी फोन निर्मात्याची मार्गदर्शक तत्त्वे वाचा.

विजेचा शॉक लागण्याची शक्यता

मोबाईल लवकर चार्ज व्हावा म्हणून फास्ट चार्जर वापरतात. फास्ट चार्जरमुळे अचानक इलेक्ट्रिक शॉक तुमच्या फोनमध्ये येऊ शकतो, ज्यामुळे चार्जिंग पोर्ट किंवा बॅटरी सारख्या तुमच्या फोनच्या आतील लहान भागांचे नुकसान होऊ शकते. जरी बरेच चार्जर संरक्षणासह येतात, परंतु जर आपल्या घराचे विद्युत कनेक्शन चांगले नसेल तर विजेचा शॉक येऊ शकतो.

बॅटरीचे आयुष्य कमी होते

तुम्ही देखील तुमचा फोन फास्ट चार्जिंगने चार्ज करत असाल तर तुमच्या फोनची बॅटरी कमी चार्ज होईल, त्याचबरोबर बॅटरीचे आयुष्य देखील कमी होईल. जर तुम्ही दररोज फास्ट चार्ज करत असाल तर तुमची बॅटरी लवकर संपेल. आजकाल जुन्या फोनपेक्षा नवे फोन फास्ट चार्जिंगला चांगले सपोर्ट करू शकतात.

Non Stop LIVE Update
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी.
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली.
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'.
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्...
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्....
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई.
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात.
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय...
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय....
'..त्यांच्या पाय चाटण्याला आक्षेप', देवेंद्र फडणवीस ठाकरेंवर भडकले अन्
'..त्यांच्या पाय चाटण्याला आक्षेप', देवेंद्र फडणवीस ठाकरेंवर भडकले अन्.
प्रचाररॅलीत कार्यकर्त्यांनी उडवले फटाके अन् ठिणगीन उमेदवाराचे केस जळले
प्रचाररॅलीत कार्यकर्त्यांनी उडवले फटाके अन् ठिणगीन उमेदवाराचे केस जळले.
चित्रा वाघ यांचं ट्वीट खरं की खोटं? नितीन राऊतांचा ‘तो’ व्हिडीओ शेअर
चित्रा वाघ यांचं ट्वीट खरं की खोटं? नितीन राऊतांचा ‘तो’ व्हिडीओ शेअर.