जूनमध्ये होणार महाधमाका ! ‘या’ कंपन्यांचे स्मार्टफोन्स होणार लाँच… काय आहे किंमत?

स्मार्टफोन निर्माता कंपन्या पोको, रिअलमी, मोटोरोला, ओप्पो आणि विवो या महिन्यात त्यांचे विविध स्मार्टफोन अनेक लाँच करण्याच्या तयारीमध्ये आहे. त्यामुळे येत्या काळात जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासमोर विविध पर्याय उपलब्ध राहणार आहेत.

जूनमध्ये होणार महाधमाका ! ‘या’ कंपन्यांचे स्मार्टफोन्स होणार लाँच... काय आहे किंमत?
रिअलमी जीटी निओ3Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 5:01 PM

गेल्या 5 महिन्यांत विवो एक्स 80 (Vivo X80) सिरीज, शाओमी 11 आय (Xiaomi 11i) हायपरचार्ज आणि रिअलमी जीटी निओ 3 (Realme GT Neo 3) यासह अनेक बजेट आणि विविध फीचर्स असलेले स्मार्टफोन अलीकडेच लाँच करण्यात आले आहेत. दरम्यान, ‘ये तो अभी ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है’, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. कारण, जूनमध्ये अजून काही स्मार्टफोन्स लाँच होणार आहेत. स्मार्टफोन निर्माता कंपन्या पोको, रिअलमी, मोटोरोला, ओप्पो आणि विवो आदी कंपन्या या महिन्यात त्यांचे स्मार्टफोन लाँच करण्यासाठी सज्ज आहेत. Poco F4 GT आणि Oppo Reno8 Pro सारखे मोठे स्मार्टफोन जूनमध्ये लाँच होणार आहेत. जून 2022 मध्ये लाँच होणार्‍या आगामी स्मार्टफोनबद्दल माहिती जाणून घेउ.

Vivo T2

Vivo T2 1080 x 2400 पिक्सेल, 20:9 आस्पेक्ट रेशो आणि 120Hz रिफ्रेश रेटच्या FHD+ रिझोल्यूशनसह 6.62 इंचाचा OLED डिसप्लेसह बाजारात येणार आहे. हा स्मार्टफोन Android 12 वर आधारित Origin OS Ocean वर काम करतो. फोनमध्ये Octa core Qualcomm SM8250-AC Snapdragon 870 5G (7 nm) प्रोसेसर देण्यात आला आहे. स्टोरेज वेरिएंटसाठी, हा स्मार्टफोन 8GB आणि 128GB स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनच्या मागील कॅमेरामध्ये f/1.9 अपर्चरसह 64 मेगापिक्सलचा पहिला कॅमेरा, f/2.2 अपर्चरसह 8 मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा आणि f/2.4 अपर्चरसह 2 मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर या स्मार्टफोनच्या फ्रंटमध्ये f/2.0 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. Vivo T2 ची किंमत जवळपास 25,000 रुपये असू शकते.

Poco F4 GT

Poco चा पुढील स्मार्टफोन Poco F4 GT युरोपमध्ये लाँच झाला आहे आणि आता जागतिक स्तरावर प्रवेश करण्यासाठी तयार आहे. मात्र याची लाँचची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, Poco F4 GT ला 6.67 इंचाचा AMOLED डिसप्ले दिला जाऊ शकतो, हा डिसप्ले फुल-एचडी + स्क्रीन रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. स्टोरेजबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज दिले जाऊ शकते. या स्मार्टफोनची किंमत जवळपास 41,425 रुपये असू शकते.

हे सुद्धा वाचा

Oppo Reno8 Pro

Oppo Reno सीरीज अंतर्गत हा स्मार्टफोन लवकरच लाँच केला जाऊ शकतो. नुकत्याच लाँच झालेल्या स्मार्टफोनमध्ये Oppo Reno8 सिरीजचा समावेश आहे. हा स्मार्टफोन याआधीच चीनमध्ये लाँच करण्यात आला असून लवकरच जागतिक बाजारात लाँच होण्याची शक्यता आहे. फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाले तर Oppo Reno 8 Pro मध्ये 6.62 इंचाचा E4 AMOLED डिसप्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120 Hz आहे. या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 7 Gen 1 चिपसेट देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज आहे.

Vivo T2 चे फीचर्स

परफोर्मेंस  क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778G डिसप्ले    6.67 इंच (16.94 सेमी) स्टोरेज    128 जीबी कॅमेरा     64 MP + 8 MP + 2 MP बॅटरी      5000 mAh किंमत     28435 रॅम       8 जीबी

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.