Smartphone: तुमचं बजेट 15 हजारांपर्यंतच आहे? तर हे स्मार्टफोन ठरतील बेस्ट पर्याय
तुम्ही चांगल्या आणि स्वस्त स्मार्टफोनच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. बजेट फोनसह यामध्ये महागड्या फोन इतकेच फीचर्स आहेत. तसेच 5 जी नेटवर्कला सपोर्ट करणारे असल्याने फायद्याचे ठरतील.
मुंबई- तंत्रज्ञानाचं युग असून आपल्याला प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन पाहायला मिळतो. कारण या स्मार्टफोनमुळे सर्वकाही एका क्लिकवर उपलब्ध होतं. स्मार्टफोनवरील अॅपच्या माध्यमातून प्रत्येक गोष्ट सहजरित्या मिळते. असं असलं तरी चांगला हँडसेट असावा असा प्रयत्न करतो. खरं तर महागडे स्मार्टफोन आपल्या बजेटमध्ये बसत नसल्याने स्वस्त आणि मस्त हँडसेटच्या शोधात असतो.त्यासाठी वेगवेगळ्या स्मार्टफोनची चाचपणी केली जाते. आता तर भारतात 5जी नेटवर्क सुरु झाल्याने त्या दृष्टीने दुकानदाराकडे विचारपूस केली जाते. अनेक स्मार्टफोन पाहिल्यानंतर आपला संभ्रम वाढतो. तुम्हीही अशाच स्मार्टफोनच्या शोधात असाल तर पाच पर्याय तुमच्यासाठी बेस्ट ठरतील. तुमचं बजेट जर 15 हजारांच्या खाली असेल तर बातमी तुमच्यासाठीच आहे. या यादीत सॅमसँग गॅलक्सी F04, ओप्पो के10, रियलमी स्मार्टफोनचा समावेश आहे.
सॅमसँग गॅलक्सी F04: या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक पी35 चिपसेट आहे. तसेच 8जीबी रॅम असून आणखी काही फीचर्स आहेत. हा स्मार्टफोन अँड्रॉईड 12 तंत्रज्ञानावर आधारित आहे. यात 13 एमपी+2एमपी ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. तसेच जेड पर्पल, ओपल ग्रीन या रंगांमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध आहे. 4 जीबी+64 जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत 9499 रुपये इतकी आहे. हा स्मार्टफोन Samsung.com, फ्लिपकार्ट आणि स्थानिक दुकानदारांमध्ये मिळेल.
पोको एम4 प्रो 5 जी: या स्मार्टफोनच्या 6जीबी/64जीबी स्मार्टफोनची किंमत 14999 रुपये इतकी आहे. तर 6जीबी/128जीबी व्हेरियंटची किंमत 16499 रुपये,8जीबी/128जीबी व्हेरियंटची किंमत 17999 रुपये इतकी आहे. डिसप्ले 6.6 इंच (16.76 सेमी)399 पीपीआय, आईपीएस एलसीडी90 हर्ट्ज रिफ्रेश रेट इतका आहे. कॅमेरा 50 एमपी + 8 एमपी डुअल प्राइमरी कॅमेरा एलईडी फ्लॅश आणि 16 एमपी फ्रंट कॅमेरा आहे.
ओप्पो के10: हा स्मार्टफोन सध्या सवलतीच्या किमतीत फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. 6 जीबी रॅम आमइ 128 जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत 13990 रुपये इतकी आहे. खरं तर ही किंमत बँक ऑफर आणि एक्सचेंजवर आधारित आहे. या स्मार्टफोनमध्ये क्लॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट आि 6.59 इंच डिस्प्ले आहे. ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि 5000mAh बॅटरी आहे.
रियलमी 9 5जी: 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरियंट सध्या फ्लिपकार्टवर सवलतीच्या दरात मिळत आहे. या हँडसेटची किंमत 15999 रुपये इतकी आहे. हा स्मार्टफोन मीडियाटेक डिमेन्सिटी 810 चिपसेट, 6.5 इंच डिस्प्ले, ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि 5000mAh बॅटरीसह येतो.