कॅमेऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या या मोबाईल कंपनीने घेतला मोठा निर्णय, यापुढे या देशात विकला जाणार नाही हा स्मार्टफोन

आपल्या कॅमेऱ्यांसाठी प्रसिध्द असलेल्या एका मोठ्या स्मार्टफोन ब्रँडने या बड्या देशाच्या मार्केटमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. मोबाईल कंपनीत मोठे नाव असलेल्या या कंपनीने एवढे मोठे मार्केट सोडण्याचा निर्णय घेतला असला तरी त्याची अधिकृत घोषणा केलेली नाही.

कॅमेऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या या मोबाईल कंपनीने घेतला मोठा निर्णय, यापुढे या देशात विकला जाणार नाही हा स्मार्टफोन
smart phone
Follow us
| Updated on: Mar 08, 2024 | 4:43 PM

नवी दिल्ली | 8 मार्च 2024 : स्मार्टफोन बनविणारी प्रसिद्ध जपानी कंपनी सोनी ( sony Xperia ) या कंपनीने आता चीनच्या बाजारातून आपला काढता पाय काढतात. अनेक प्रिमियम फ्लॅगशिप स्मार्टफोनसाठी कॅमेरा सेंसर तयार करणारी कंपनी आपला कोणताही Xperia स्मार्टफोन चीनमध्ये लॉंच केले जाणार नाही. सोनी कंपनीच्या तर्फे या संदर्भात अजूनही कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. चीन इंड्रस्टीच्या समोर आलेल्या रिपोर्टनूसार सोनी कंपनी आपला स्मार्टफोन बिझनेस बंद करणार आहे.

सोनी कंपनीने ( sony ) चीनच्या बाजारात Ericssion चे अधिग्रहण करुन एण्ट्री मारली होती. सोनी कंपनीने आपला पहिला स्मार्टफोन 2008 रोजी लॉंच केले होता. त्यानंतर सोनी कंपनीने आपली Xperia सिरीजचे अनेक फ्लॅगशिप स्मार्टफोन चीनी बाजारात उतरविले जातात. mydirvers च्या रिपोर्टनूसार आता सोनी एक्सपिरियाचे मॉडेल चीनमध्ये उतरविणार नाही. सोनी कंपनीच्या या निर्णयाचे कोणतेही कारण पुढे आलेले नाही. सोनी कंपनीला Vivo, Huawei, Xiaomi, Oppo सारख्या ब्रॅंड्समुळे आव्हान मिळाले आहे. त्यामुळे सोनी कंपनीला आपले चीनी मार्केट सोडले आहे. तरीही सोनी कंपनी इतर स्मार्टफोनसाठी कॅमेरा सेंसर बनविणार आहे. OnePlus, Xiaomi, Oppo, Realme, Samsung सारख्या फ्लॅगशिप आणि मध्यम बजेटच्या स्मार्टफोनमध्ये sony कंपनीचा इमेज सेंसर वापरला जातो.

सोनी कंपनीचे तगडे स्मार्टफोन

सोनी कंपनी लवकरच ग्लोबल मार्केटमध्ये फ्लॅगशिप स्मार्टफोन Xperia 1 VI आणि Xperia 5 VI ला लॉंच करण्यात तयारीत आहे. दोन्ही स्मार्टफोनचे फिचर्स गेल्या काही दिवसांपूर्वी लीक झाली होती. सोनी कंपनीचे दोन्ही स्मार्टफोन जगातील पहिले डिजिटल सिग्नेचर टेक्नॉलॉजीने परिपूर्ण आहेत. या टेक्नॉलॉजीमुळे नेक्स्ट जेनरेशन Xperia स्मार्टफोनसाठी फोटोला इंस्टॅंटली डिजिटली साईन केले जाणार आहे. त्यामुळे या स्मार्टफोन काढलेल्या फोटोला कोणीही छेडछाड करु शकणार नाही. Xperia 1 VI मध्ये 48MP चे तीन कॅमेरा सेंसर मिळणार आहे. याशिवाय हा फोन फ्लॅगशिप प्रोसेसर आणि डिस्प्ले सोबत येणार आहे. या फोनची लॉंचिंग कधी होणार हे कंपनीने अजून जाहीर केलेली आहे.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.