आता IPL नाही पाहू शकणार मोफत? 25 एप्रिलपासून JioCinema वर येतोय नवीन प्लॅन

IPL Matches : Video Streaming प्लॅटफॉर्म JioCinema बाबत एक अपडेट समोर येत आहे. या प्लॅटफॉर्मवर व्हिडिओदरम्यान येणाऱ्या जाहिरातींमुळे प्रेक्षक त्रस्त असतात. त्यामुळे जिओ सिनेमा युझर्ससाठी 25 एप्रिलपासून सब्सक्रिप्शन योजना आणण्याच्या तयारीत आहे.

आता IPL नाही पाहू शकणार मोफत? 25 एप्रिलपासून JioCinema वर येतोय नवीन प्लॅन
सामने पाहण्यासाठी पैसा मोजाव लागणार?
Follow us
| Updated on: Apr 24, 2024 | 3:19 PM

Jio Cinema New Subscription Plan : मोफत आयपीएल सामने पाहणाऱ्या प्रेक्षकांना कदाचित एक झटका बसू शकतो. Video Streaming प्लॅटफॉर्म JioCinema युझर्ससाठी सब्सक्रिप्शन प्लॅन आणण्याची तयारी करत आहे. यासंदर्भात कंपनीने एक व्हिडिओपण आणला आहे. त्यानुसार, ग्राहकांन जाहिरातमुक्त अनुभवासाठी पैसा मोजावा लागू शकतो. त्यामुळे एक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे की, जिओ प्लॅटफॉर्मवर IPL Matches साठी शुल्क आकारले जाऊ शकते. पण हा केवळ अंदाज आहे. याविषयी कंपनीकडून कोणतेीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Ad-Free सब्सक्रिप्शन

JioCinema ने एक्सवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओनुसार, युझर्स, प्रेक्षक व्हिडिओदरम्यान येणाऱ्या जाहिरातींमुळे हैराण आहेत. ते जाहिरात पण उबगले आहेत. त्यामुळे कंपनी 25 एप्रिल रोजी नवीन Ad-Free सब्सक्रिप्शन प्लॅन घेऊन येत आहे. यामध्ये फॅमिली प्लॅन पण असेल. आयपीएल सामन्या दरम्यान अनेक जाहिराती येतात. त्यामुळे सामना पाहण्याच्या आनंदावर विरजण पडते.

हे सुद्धा वाचा

जिओचे दोन प्लॅन

सध्या जिओ सिनेमावर आयपीएल सामने मोफत पाहता येतात. पण लवकरच सब्सक्रिप्शन प्लॅनमुळे प्रेक्षकांना सामना पाहण्यासाठी पैसे मोजावे लागण्यीच शक्यता वर्तविण्यात येत आहे. अजून जिओने याविषयीची अधिकृत घोषणा केलेली नाही. सध्या जिओ सिनेमा 2 प्रकारचे प्लॅन ऑफर करते. यामध्ये एक योजना 999 रुपये वार्षिक अशी आहे. तर दुसरा प्लॅन हा 99 रुपये प्रति महिना असा आहे. हा प्लॅन घेतला तरी तुमची जाहिरातीपासून सूटका होत नाही.

असा पाहतात मोफत सामना

सध्या प्रेक्षक जिओ सिनेमावर मोफत आयपीएल सामना पाहू शकतो. त्यासाठी युझर्सला जिओ सिनेमा ॲप डाऊनलोड करावे लागते. नंतर मॅच पाहता येते. जिओ सिनेमाने आयपीएल सामन्यासाठी, या ॲपमध्ये अनेक खास फीचर दिले आहेत. या ॲपवर अनेक भारतीय भाषेत मॅचचे समालोचन, कॉमेंट्री ऐकता येते. युझर्स 360 डिग्री कॅमरा अँगलचा वापर करु शकतात. त्यामुळे प्रेक्षकांना एकाच बाजूने नाही तर चारही बाजूने सामना पाहण्याचा आनंद लूटता येतो.

भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....