80 wash washing machine |  अर्धा पेला पाण्यात 5 कपड्यांची धुलाई, 80 वॉश वॉशिंग मशिनची कमाल, आखिर बचत भी तो है कमाई 

80 wash washing machine | अवघ्या अर्ध्या ग्लास पाण्यात तुमची वॉशिंग मशिन 5 कपड्यांची धुलाई करु शकते? उत्तर जर हो असेल तर पुढे वाचण्याची गरज नाही.

80 wash washing machine |  अर्धा पेला पाण्यात 5 कपड्यांची धुलाई, 80 वॉश वॉशिंग मशिनची कमाल, आखिर बचत भी तो है कमाई 
आखीर बचत भी तो है कमाईImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 26, 2022 | 7:19 PM

80 wash washing machine | बदलत्या जीवन शैलीमुळे आता घरातील एक कोपरा वॉशिंग मशीनने (washing machine) व्यापलेला दिसतो. ती आता अनेक घरातील अपरिहार्य संपत्ती झाली आहे. कारण ही तसेच आहे. वॉशिंगमशीनमुळे कपडे धुणं सोपं झालं आहे. पण आजच्या घडीला फुली ऑटोमॅटीक (Automatic) वॉशिंगमशीन विकत घेणं प्रत्येकालाच परवडेल असं नाही. एक तर वीज बिल (Electricity Bill), दुसरं भरपूर पाणी (Water) या दोन्ही गोष्टी लोकांच्या अडचणीच्या ठरतात. प्रत्येक शहरात मुबलक पाणी मिळेलच याची शाश्वती नसते. तसेच जेवढ्या सुविधा जास्त तेवढी मशीनची किंमत अवाक्या बाहेर जाते हे नव्याने सांगायलाच नको. एवढा समस्यांचा पाढा वाचल्यानंतर तुम्हाला जर कोणी सांगतिलं की, अवघ्या अर्धा पेला पाण्यात तुमच्या 5 कपड्यांची धुलाई होईल ते हे कोणत्याही डिटर्जंटविना तर ही बचतच तुमची कमाई राहील नाही का? आता तुम्ही म्हणाला हा काय प्रकार आहे. तर एका भारतीय स्टार्टअप कंपनीनं तोडगा काढला आहे. कंपनीच्या या मशीनचं नाव 80 वॉश (80 wash washing machine) असं आहे. कंपनीनं 80 सेकंदात कपडे स्वच्छ करणारी अनोखी वॉशिंग मशीन तयार केली आहे.

स्टार्टअपची कमाल

80Wash या स्टार्टअपने हे अनोखं वॉशींगमशीन तयार केले आहे. कंपनीने दोन समस्यांवर लक्ष केंद्रीत केलं. पहिले पाण्याचा बेसुमार वापर आणि दुसरं म्हणजे केमिकलयुक्त डिटर्जंट पाऊडर. दोन्ही गोष्टींना फाटा देण्याचा प्रयत्न कंपनीने केला. त्यासाठी त्यांनी अर्थातच आयडियाची कल्पना लढवली. या दोन्ही गोष्टींमुळे महिला वर्गाचा मोठा ताण कमी होणार आहे. दुसरं म्हणजे वीज बिलाचा ही प्रश्न सुटणार आहे. रुबल गुप्ता, नितीन कुमार सलूजा आणि विरेंद्र सिंह या तरुणांनी हे स्टार्ट अप सुरु केले आहे. त्यात त्यांनी केवळ 80 सेंकदात कपडे स्वच्छ धुऊन बाहेर पडतील असे तंत्रज्ञान विकसीत केले आहे. पण डाग जास्त असतील तर ही वेळ वाढेल.

हे सुद्धा वाचा

कसं काम करतं?

80Wash ही वॉशिंगमशीन ISP स्टीम टेक्नोलॉजीवर आधारित आहे. यामध्ये बॅक्टेरिया लो फ्रिक्वेंन्सी रेडियो फ्रिक्वेंन्सीच्या सहाय्यानं मारले जातात. तसेच कपड्यांवरील डाग, धूळ आणि रंगही निघून कपडे स्वच्छ निघतात. रुम टेम्परेचरवर ड्राय स्टीम जनरेटरचा त्यासाठी वापर केला जातो. सिंगल सायकलमध्ये तुम्ही 80 सेकंदात जवळपास 5 कपडे अवघ्या अर्धा पेला पाण्यात स्वच्छ धुवून काढू शकता. कंपनीने या मशीनमध्ये कुठल्याही डिटर्जंटची गरज नसल्याचा दावा केला आहे. कंपनीने दोन मॉडेल तयार केली आहेत. एक घरगुती वापरासाठी आणि दुसरी व्यावसायिक वापरासाठी. पहिले मशीन हे 7-8 किलोचं असून दुसरं मशीन हे 70-80 किलोचं आहे आणि ते हॉटेल आणि तत्सम ठिकाणी वापरता येऊ शकते. यामध्ये 50 कपडे स्वच्छ होऊ शकतात. त्यासाठी मात्र 5-6 ग्लास पाणी लागू शकते. या स्टार्टअपला पंजाब आणि हरियाणा सरकारकडून मंजुरी मिळाली आहे.

Non Stop LIVE Update
मी शिंदे साहेबांना वाशीतच सांगितले होते...काय म्हणाले मनोज जरांगे
मी शिंदे साहेबांना वाशीतच सांगितले होते...काय म्हणाले मनोज जरांगे.
अजित पवार गटातले आमदार राजेंद्र शिंगणे हाती तुतारी घेणार ?
अजित पवार गटातले आमदार राजेंद्र शिंगणे हाती तुतारी घेणार ?.
भारत आणि कॅनडा संबंध आणखी बिघडले,बिष्णोई टोळीशी काय कनेक्शन ?
भारत आणि कॅनडा संबंध आणखी बिघडले,बिष्णोई टोळीशी काय कनेक्शन ?.
दिल्लीत महायुतीच्या जागांचा फॉर्म्युला ठरणार,अमित शाहसोबत अंतिम बैठक
दिल्लीत महायुतीच्या जागांचा फॉर्म्युला ठरणार,अमित शाहसोबत अंतिम बैठक.
आमचं सरकार आलं तर बहि‍णींना तीन हजार रुपये देणार - गुलाबराव पाटील
आमचं सरकार आलं तर बहि‍णींना तीन हजार रुपये देणार - गुलाबराव पाटील.
'लाडकी बहीण योजना' बंद करणाऱ्यांचा करेक्ट कायक्रम - मुख्यमंत्री
'लाडकी बहीण योजना' बंद करणाऱ्यांचा करेक्ट कायक्रम - मुख्यमंत्री.
ज्यांचा गृहमंत्री जेलमध्ये गेला ते आम्हाला कायदा...काय म्हणाले फडणवीस
ज्यांचा गृहमंत्री जेलमध्ये गेला ते आम्हाला कायदा...काय म्हणाले फडणवीस.
लाडकी बहिण कोणाची ?महायुतीत श्रेयवाद सुरुच, तीन पक्षात स्पर्धा
लाडकी बहिण कोणाची ?महायुतीत श्रेयवाद सुरुच, तीन पक्षात स्पर्धा.
लाडकी बहीण योजनेच्या यशामुळे विरोधक गडबडले - अजित पवार
लाडकी बहीण योजनेच्या यशामुळे विरोधक गडबडले - अजित पवार.
टोल माफ करण्याची मागणी आमचीच - राज ठाकरे
टोल माफ करण्याची मागणी आमचीच - राज ठाकरे.