“अत्यंत धोकादायक…”; आत्महत्येपूर्वी चॅट जीपीटीबद्दल सुचिरने काय केला धक्कादायक खुलासा
सुचिर बालाजीच्या आत्महत्येने सर्वत्र खळबळ उडाली आहे, दरम्यान आत्महत्येपूर्वी सुचिरने त्याच्या पोस्टद्वारे AI बद्दल चिंता व्यक्त केली होती. एवढच नाही तर, चॅटजीपीटीसाठी वापरल्या जाणाऱ्या डेटावरही त्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे आता नेटकऱ्यांच्याही आता एआय वापरण्यावर भिती वाटत असल्याच्या कमेंट येऊ लागल्या आहेत.
सुचिर बालाजीच्या आत्महत्येने सर्वत्र खळबळ उडाली आहे. सुचिर बालाजीच्या निधनानंतर सोशल मीडियावर नव्या विषयावर चर्चा होऊ लागली आहे. सुचिर बालाजी हा ओपनएआयचा संशोधक होता. आता जे चॅट जीपीटी सर्वजन अगदी सर्सासपणे वापरत आहेत त्याबद्दल त्याने चिंता व्यक्त केली होती.
सुचिर जवळपास चार वर्षे सॅम ऑल्टमनच्या नेतृत्वाखालील स्टार्टअपमध्ये होता आणि त्याने शेवटचे 18 महिने चॅट जीपीटीसाठी घालवले. बालाजीने ऑगस्टमध्ये चॅट जीपीटी बनवणाऱ्या OpenAI या कंपनीचा राजीनामा दिला होता. नोकरी सोडताना त्याने कंपनीवर कॉपीराइट उल्लंघनाचा आरोपही केला होता.
सुचिरने आत्महत्येपूर्वीच्या पोस्टमुळे अनेक खुलासे
सुचिरने आत्महत्येपूर्वी जी पोस्ट केली होती त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. ओपनएआयमध्ये असताना सुचिर बालाजीने चॅटजीपीटीला प्रशिक्षण देण्यासाठी वापरला जाणारा इंटरनेट डेटा संकलित आणि व्यवस्थापित करण्यात मोठी भूमिका बजावली. लोकप्रिय AI मॉडेल्स तयार करण्यात त्याच्या कामाने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.
चॅटजीपीटी तयार करण्यासाठी पत्रकार, लेखक, प्रोग्रामर इत्यादींचे कॉपीराइट केलेले साहित्य वापरण्यात आले आहे. ज्याचा थेट परिणाम अनेक व्यवसाय आणि व्यापारांवर होणार आहे. OpenAI विरुद्ध चालू असलेल्या कायदेशीर खटल्यांमध्ये त्याचे ज्ञान आणि साक्ष यांचा मोठा प्रभाव पडू शकतो, असं सुचिरने म्हटले होते. OpenAI च्या कार्यपद्धती धोकादायक आहेत कारण त्यांनी AI मॉडेलला प्रशिक्षण देण्यासाठी कोणत्याही परवानगीशिवाय कॉपीराइट केलेला कंटेट वापरला जात असल्याचा धक्कादायक खुलासा सुचिरने केला होता.
AI चा नैतिक परिणाम धोकादायक
त्याने AI च्या नैतिक परिणामांबद्दल वारंवार चिंता व्यक्त केली होती. एआयमुळे संपूर्ण इंटरनेट इकोसिस्टमला हानी पोहोचवू शकते, अशी भीतीही त्याने व्यक्त केली होती. ओपनएआयचे बिझनेस मॉडेल अस्थिर आणि इंटरनेट इकोसिस्टमसाठी अत्यंत हानिकारक आहे, असेही त्याने म्हटले होते. एवढच नाही तर “जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर तुम्ही देखील ही कंपनी सोडली पाहिजे.’, असे तो नोकरी सोडण्याच्या निर्णयाबद्दल एका मुलाखतीत म्हणाला होता. ओपनएआयची नोकरी सोडण्यावेळी सुचिरने AIच्या संभाव्य नुकसानाबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्याच संदर्भातील पोस्टही केली होती
नेटकऱ्यांनी एआयबद्दल चिंता व्यक्त केली
सुचिरने केलेल्या अनेक खुलासानंतर अनेकांना या टेक्नॉलॉजीबद्दल चिंता वाटू लागली आहे. वापरताना सहज आणि सोप वाटणारी ही AI किंवा चॅट जीपीटी सिस्टम पुढे जाऊन कितपत हानिकारक ठरू शकते याबद्दल वापरकर्त्यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे.