Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लॉकडाऊनमध्ये घरबसल्या करा ताजमहालाची सफर, गुगलचा भन्नाट प्रयोग

अमेरिकन सर्च जायंट गुगलने (Google) असं एक टूल आणलं आहे, ज्याचा वापर करून युजर्स ताज महालाची सफर करु शकतात.

लॉकडाऊनमध्ये घरबसल्या करा ताजमहालाची सफर, गुगलचा भन्नाट प्रयोग
Taj Mahal Virtual Tour
Follow us
| Updated on: Apr 23, 2021 | 6:59 PM

नवी दिल्ली : कोरोना साथीचा रोग पुन्हा एकदा संपूर्ण भारतात पसरला आहे. कोरोना विषाणूमुळे प्रत्येक भारतीय आता त्यांच्या घरामध्ये बंद आहे. सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, नागरिकांना कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळावे लागतील आणि त्यांना जास्तीत जास्त वेळ त्यांच्या घरात राहावं लागणार आहे. या कठीण काळात अमेरिकन सर्च जायंट गुगलने असं एक टूल आणलं आहे, ज्याचा वापर करून युजर्स ताज महालाची सफर करु शकतात. (take a virtual tour of Taj Mahal on Google, here’s how)

गुगलचे हे नवीन फीचर वापरुन कोणताही युजर घरी बसून ताज महाल पाहू शकतो. जागतिक वारसा दिनाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्रांच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेने गुगलबरोबर भागीदारी करत एक नवीन टूल सादर केलं आहे. या टूलच्या मदतीने कोणताही युजर जगभरातील लोकप्रिय ठिकाणांची व्हर्च्युअल टूर करु शकतो.

घरबसल्या प्रसिद्ध ठिकाणांना भेटी द्या

कोणत्याही व्यक्तीसाठी हा एक उत्तम अनुभव असेल. कारण यामुळे प्रत्येक युजर घरी बसूनच जगभरातील विविध स्थळांना भेटी देऊ शकतो. Google ने 10 UNESCO हेरिटेज साइट्ससाठी एक मायक्रोसाइट तयार केली आहे, जी युजर्सना व्हर्च्युअल टूर घडवेल. त्यामुळे कोणताही युजर या लिंकवर (https://artsandculture.google.com/story/zAUxtGbI2DyODQ) क्लिक करुन जगभरातल्या हेरिटेज साईट्सना भेटी देऊ शकतो.

व्हर्च्युअल टूरची संधी

गुगलने या टूलद्वारे ताज महालासह युजर्सना Serengeti नॅशनल पार्क, Colosseum आणि The Yosemite नॅशनल पार्कच्या व्हर्च्युअल टूरवर जाण्याची संधी दिली आहे. या मायक्रोसाईटच्या मुख्यपृष्ठास भेट दिल्यानंतर तुम्हाला त्यासंदर्भातील सर्व माहिती मिळेल, वास्तू कधी बांधली, कशासाठी बांधली, कोणी बांधली, अशा अनेक प्रश्नांची उत्तरंदेखील तुम्हाला या साईटवर पाहायला मिळतील.

इतर बातम्या

तुमच्या स्मार्टफोनमधील ही 8 अ‍ॅप तातडीने डिलीट करा, अन्यथा मोठा फटका

90,000 रुपयांचा लॅपटॉप अवघ्या 29 हजारात, 13 हजारांचा लॅपटॉप 10 हजारात, वॉरंटीसह

सावधान ! व्हॉट्सअ‍ॅप पिंक एक नवीन व्हायरस जो युजर्सना करतो लक्ष्य, फोनवर मिळवू शकतो संपूर्ण नियंत्रण

(take a virtual tour of Taj Mahal on Google, here’s how)

ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं.
ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं दीर्घआजारपणाने निधन
ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं दीर्घआजारपणाने निधन.
ही चांडाळ चौकटी युती होऊच देणार नाही, राज-उद्धव युतीवर शिरसाटांची टीका
ही चांडाळ चौकटी युती होऊच देणार नाही, राज-उद्धव युतीवर शिरसाटांची टीका.
पवार काका-पुतण्याच्या एकत्र येण्यावर राऊतांची टीका
पवार काका-पुतण्याच्या एकत्र येण्यावर राऊतांची टीका.
'...तर कायमचं शेतावर जावू, अशी शिंदेंना भिती', संजय राऊतांनी डिवचलं
'...तर कायमचं शेतावर जावू, अशी शिंदेंना भिती', संजय राऊतांनी डिवचलं.
'राज ठाकरे यांना मातोश्रीचं निमंत्रण द्या', ठाकरेंच्या सेनेची बॅनरबाजी
'राज ठाकरे यांना मातोश्रीचं निमंत्रण द्या', ठाकरेंच्या सेनेची बॅनरबाजी.
शेलार व्यवहारशून्य, त्याची बौद्धिक दिवाळखोरी...; मनसे नेत्याची टीका
शेलार व्यवहारशून्य, त्याची बौद्धिक दिवाळखोरी...; मनसे नेत्याची टीका.
काका-पुतण्याची बंद दाराआड बैठक; काय झाली चर्चा?
काका-पुतण्याची बंद दाराआड बैठक; काय झाली चर्चा?.
'सडकछाप, त्यांच्या अकलेचे...', विजय वडेट्टीवार भाजप नेत्यावर भडकले
'सडकछाप, त्यांच्या अकलेचे...', विजय वडेट्टीवार भाजप नेत्यावर भडकले.
राज ठाकरेंच्या मनसैनिकांना महत्वाच्या सूचना
राज ठाकरेंच्या मनसैनिकांना महत्वाच्या सूचना.