Tata चा 100 mbps स्पीड असलेला हा इंटरनेट प्लॅन आहे जबरदस्त, OTT मिळवा मोफत

टाटा प्ले फायबरने एक नवा प्लॅन लाँच केला आहे, ज्यामध्ये युजर्सला १०० एमबीपीएसचा स्पीड मिळेल आणि यासोबतच ओटीटीचा ही मोफत आनंद घेता येणार आहे. जाणून घेऊया या प्लॅनची वैधता काय आहे आणि याला किती सब्सक्राइब करू शकते.

Tata चा 100 mbps स्पीड असलेला हा इंटरनेट प्लॅन आहे जबरदस्त, OTT मिळवा मोफत
tata fiber plan
Follow us
| Updated on: Dec 14, 2024 | 12:31 AM

टाटा प्ले फायबर अनेकदा आपल्या नवीन ऑफर्समुळे ट्रेंडमध्ये असते. नुकताच कंपनीने एक ब्रॉडबँड प्लॅन लाँच केला आहे, जो खूप चर्चेत आहे. कारण कंपनीने १०० एमबीपीएस ब्रॉडबँड प्लॅनसह ओटीटीचा मोफत आनंद घेण्याचा प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनमुळे युजर्सला मोफत OTT चा आनंद घेता येणार आहे. चला तर मग जाणून घेऊया हा प्लॅन किती किंमतीत खरेदी करता येईल आणि त्याची वैधता किती आहे.

टाटा प्ले फायबरचे मुंबई, बेंगळुरू आणि दिल्ली येथे कनेक्शन आहेत. टाटा प्ले फायबर प्लॅन हा एक प्रीपेड प्लॅन आहे, तुम्ही जेव्हा या प्लॅनचा वापर करता तेव्हा हे तुम्हाला 1 महिना, 3 महिने, 6 महिने आणि 12 महिने अश्या वैधतेमध्ये मिळते आणि वैधतेनुसार त्याचे शुल्क बदलते. तर या नवीन लाँच करण्यात आलेल्या प्लॅनमध्ये तुम्हाला दरमहा ९०० रुपयांचा १ महिन्यांचा ओटीटी प्लॅन मिळणार आहे. त्याचबरोबर ओटीटी सुविधा नको असेल तर त्यासाठी तुम्हाला कमी पैसे मोजावे लागतील.

प्लॅननुसार सवलत

टाटा प्ले फायबर प्लॅनमध्ये १०० एमबीपीएस प्राइम प्लॅन आणि मेगा प्लॅन असे दोन प्रकारचे प्लॅन लाँच करण्यात आलेले आहेत. या प्लॅन्समध्ये युजर्सला वेगवेगळे बेनिफिट्स मिळतील आणि त्यांच्या किंमतीही वेगवेगळ्या असतील. जर तुम्ही या प्लॅन्सअंतर्गत 12 महिन्यांसाठी सब्सक्रिप्शन घेतले तर तुम्हाला त्यावर चांगली सूट मिळेल. जर तुम्हाला याचा लाइट प्लॅन खरेदी करायचा असेल तर तुम्हाला महिन्याला 750 रुपये मोजावे लागतील. तर वर्षभरासाठी हा प्लॅन खरेदी करण्यासाठी तुम्हाला जीएसटीसह 9000 रुपये मोजावे लागतील. यामध्ये युजर्संना ओटीटी सेवा देखील फ्री मध्ये मिळणार आहे.

6 ओटीटी पर्यायांसह प्लॅन

त्याचबरोबर टाटा प्ले फायबरचा १०० एमबीपीएसचा प्लॅन देखील खूप भन्नाट आहे. यासाठी तुम्हाला दरमहा 800 रुपये मोजावे लागणार आहेत. याशिवाय जर तुम्हाला यासाठी वार्षिक सब्सक्रिप्शन घ्यायचे असेल तर जीएसटीसह 9600 रुपयांमध्ये हा प्लॅन खरेदी करावे लागेल. यामध्ये युजर्संना 6 ओटीटी प्लॅटफॉर्मसह 200 हून अधिक टीव्ही चॅनल्समधून निवडण्याचा पर्याय मिळणार आहे.

यासोबत टाटा प्ले फायबरचा एक मेगा प्लॅन आहे, ज्यासाठी युजर्संना दरमहा ९५० रुपये मोजावे लागतील. वर्षभरासाठी हा प्लॅन खरेदी करण्यासाठी तुम्हाला जीएसटीसह 11,400 रुपये मोजावे लागतील. यामध्ये सुद्धा तुम्हाला अनेक पर्याय मिळणार आहेत.

अल्लू अर्जूनच्या जामिनाचा मार्ग मोकळा,इतक्या दिवसांची न्यायालयीन कोठडी
अल्लू अर्जूनच्या जामिनाचा मार्ग मोकळा,इतक्या दिवसांची न्यायालयीन कोठडी.
'ते' मंदिर कोणाचं हेही माहिती नाही अन्.., चित्रा वाघ यांचा कोणाला टोला
'ते' मंदिर कोणाचं हेही माहिती नाही अन्.., चित्रा वाघ यांचा कोणाला टोला.
रविवारी भाजप, शिवसेनेसह राष्ट्रवादीचे कोणते नेते घेणार मंत्रिपदाची शपथ
रविवारी भाजप, शिवसेनेसह राष्ट्रवादीचे कोणते नेते घेणार मंत्रिपदाची शपथ.
आता मुंबईऐवजी 'या' ठिकाणी येत्या १५ तारखेला होणार मंत्रिमंडळ विस्तार
आता मुंबईऐवजी 'या' ठिकाणी येत्या १५ तारखेला होणार मंत्रिमंडळ विस्तार.
'राष्ट्रवादीवर बोलणारे मिटकरी कोण? त्यांना अकोल्यात..', कोणाचाी टीका?
'राष्ट्रवादीवर बोलणारे मिटकरी कोण? त्यांना अकोल्यात..', कोणाचाी टीका?.
विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय, नाना पटोले यांचं दिल्लीत पत्र अन्.
विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय, नाना पटोले यांचं दिल्लीत पत्र अन्..
राष्ट्रवादी पुन्हा एक होणार? रोहित पवारांच्या आईनं काय केलं वक्तव्य?
राष्ट्रवादी पुन्हा एक होणार? रोहित पवारांच्या आईनं काय केलं वक्तव्य?.
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला ‘पुष्पा 2’प्रकरणी अटक, नेमकं काय घडलं?
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला ‘पुष्पा 2’प्रकरणी अटक, नेमकं काय घडलं?.
फडणवीसांचं वक्फ बोर्ड विधेयकासंदर्भात मोठं वक्तव्य, जिथे बोट ठेवतील...
फडणवीसांचं वक्फ बोर्ड विधेयकासंदर्भात मोठं वक्तव्य, जिथे बोट ठेवतील....
बेस्ट चालकांची सरप्राईज टेस्ट;महाव्यवस्थापकांचे कंत्राटदारांना निर्देश
बेस्ट चालकांची सरप्राईज टेस्ट;महाव्यवस्थापकांचे कंत्राटदारांना निर्देश.