व्हिडीओ कॉलिंगची सुविधा असलेला भारतातील पहिला अँड्रॉईड टीव्ही लाँच

जगभरातील टीव्ही इंडस्ट्रीतील अग्रगण्य कंपनी टीसीएलने व्हिडीओ कॉलिंगची सुविधा असणारा भारतातील पहिला अँड्रॉयड 11 टीव्ही लाँच केला आहे.

व्हिडीओ कॉलिंगची सुविधा असलेला भारतातील पहिला अँड्रॉईड टीव्ही लाँच
TCL Android 11 TV
Follow us
| Updated on: Mar 11, 2021 | 8:19 AM

मुंबई : जगभरातील टीव्ही इंडस्ट्रीतील अग्रगण्य कंपनी टीसीएलने व्हिडीओ कॉलिंगची सुविधा असणारा भारतातील पहिला अँड्रॉयड 11 टीव्ही पी 725 आणि हाय एंड हेल्दी स्मार्ट एसीची ओकॅरीना सीरीज आज लॉन्च केली. (TCL Launches India’s First Android 11 TV with Video Call Camera P725)

पी 725 हा पहिला 4 के एचडीआर टीव्ही असून तो अँड्रॉयड ११ वर चालतो, यात व्हिडिओ कॉलिंगची सुविधा असून, डॉल्बी व्हिजनचे अल्ट्रा व्हिव्हिड कलर्स एमईएमसी, डॉल्बी व्हिजन व अ‍ॅटमॉस, हँड्स-फ्री व्हॉइस कंट्रोल 2.0 स्पीड आणि सिक्युरिटी अपडेट्स इत्यादी आधुनिक सुविधांचा समावेश आहे. या टीव्हीत 7000+ अॅप्स आणि 700,000+ शो/ फिल्म एकाचवेळी अॅक्सेस करता येतील.

यामधील चुंबकाने जोडलेला व्हिडिओ कॉल कॅमेरा आपल्याला सहजपणे प्लग इन आणि प्ले करता येतो. गुगल ड्युओचा वापर करून मित्र आणि कुटुंबासह व्हिडिओ चॅट करण्यासह, ऑनलाइन क्लासमध्ये सहभागी होणे, वर्क फ्रॉम होम करत असताना किंवा इतरवेळीदेखील घरूनच आरामात ऑफिससोबत कनेक्ट होणे सहज शक्य होते.

पी725 चे डॉल्बी व्हिजन हे आधुनिक इमेजिंग तंत्रज्ञान असून ते ब्राइटनेस, कॉन्ट्रास्ट, कलर आणि डिटेलसह अल्ट्रा-व्हिव्हिड पिक्चर क्वालिटी प्रदान करु शकते. अॅमेझॉन या ई-कॉमर्स साईटवर हा टीव्ही 43 इंच, 50 इंच, 55 इंच आणि 65 इंच या प्रकारात अनुक्रमे 41,990, 56,990, 62,990 आणि 89,990 रुपये अशा किमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Amazon चा धमाका! 50 इंची Ultra-HD TV लाँच

ई-कॉमर्स वेबसाइट अ‍ॅमेझॉनने नववर्षानिमित्त लेटेस्ट फिचर्सचा समावेश असेलेल्या टिव्ही बाजारात आणल्या आहेत. या कंपनीने AmazonBasics Fire TV Edition Ultra-HD TV या सिरीजचे दोन मॅडेल लॉन्च केले आहेत. यामध्ये 50 इंच आणि 55 इंच असणारे दोन प्रकारचे टीव्ही आहेत. त्यांची किंमत अनुक्रमे 29,999 आणि 34,999 रुपये आहे.

अ‌ॅमेझॉनने 50 इंच असणाऱ्या टिव्हीचे मॉडेल AB50U20PS आणि 55 इंची टिव्ही AB55U20PS या नावाने बाजारात आणले आहे. या दोन्ही टीव्ही 4K HDR LED डिस्प्ले असलेल्या आहेत. या दोन्ही प्रकारच्या टिव्हींमध्ये Dolby Vision, Dolby Atmos यांच्यासाऱखे अनेक प्रकारचे फिचर्स उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

इतर बातम्या

मूनशॉट फीचरसह दमदार कॅमेरा, ‘या’ दिवशी लाँच होणार OnePlus 9, OnePlus 9 Pro

Flipkart Carnival Sale सुरु, स्मार्टफोन्सवर बम्पर डिस्काऊंट, आयफोनवर 10000 रुपयांची सूट

Jio युजर्ससाठी खुशखबर! IPL चे सामने मोफत पाहता येणार

(TCL Launches India’s First Android 11 TV with Video Call Camera P725)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.