Technical Hacks: तुमचा कॉल रेकॉर्ड केला जातोय का? अशा प्रकारे करा माहिती

फोनवर बोलत असताना आपला फोन रेकॉर्ड तर होत नाही आहे ना? असा संशय अनेकांना येतो. कॉल रेकार्डिंग अशा प्रकारे ओळखू शकता.

Technical Hacks: तुमचा कॉल रेकॉर्ड केला जातोय का? अशा प्रकारे करा माहिती
कॉल रेकॉर्डिंग Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Dec 09, 2022 | 5:56 PM

मुंबई, अनेक देशांमध्ये कॉल रेकॉर्डिंग (Call Recording) बेकायदेशीर आहे. हे पाहता गुगलने काही काळापूर्वी कॉल रेकॉर्डिंगसह थर्ड पार्टी ॲप्सही (Third Party app) बंद केले होते. म्हणजेच थर्ड पार्टी ॲपच्या मदतीने कॉल रेकॉर्डिंग करता येत नाही. यासाठी यूजरला फोनचे इनबिल्ट कॉल रेकॉर्डिंग फीचर वापरावे लागेल. मात्र, इनबिल्ट कॉल रेकॉर्डिंग फीचर ऑन केल्यावर समोरच्या व्यक्तीला त्याची माहिती मिळते. पण, अनेकवेळा असे घडते की समोरची व्यक्ती आपले कॉल रेकॉर्ड करत असते आणि आपल्याला माहितीही नसते.

कॉल रेकॉर्ड होतोय हे कळू शकतं का?

हे कळू शकते. यासाठी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करण्याची गरज नाही. नवीन फोनमध्ये कॉल रेकॉर्डिंगची घोषणा ऐकू येते. परंतु, जुन्या किंवा फीचर फोनवरून कॉल रेकॉर्डिंग केल्यावर समस्या येते. घोषणा ऐकू न आल्यास, तुम्ही इतर पद्धतींचा अवलंब करू शकता.

बीपच्या आवाजाकडे लक्ष द्या

कॉल दरम्यान, तुम्हाला बीपच्या आवाजाकडे लक्ष द्यावे लागेल. कॉल करताना बीप-बीपचा आवाज येत असेल, तर याचा अर्थ तुमचा कॉल रेकॉर्ड होत आहे. जर कॉल रिसिव्ह केल्यानंतर बराच वेळ बीपचा आवाज येत असेल, तर तो कॉल रेकॉर्ड करण्याच्या दिशेने देखील सूचित करतो.

हे सुद्धा वाचा

तुम्हाला नवीन आगामी अँड्रॉइड फोन्सबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही कारण आधीच नमूद केल्याप्रमाणे, तुम्ही कॉल रेकॉर्डिंग फीचर चालू करताच तुम्हाला त्याबद्दल अलर्ट केले जाईल. ज्याद्वारे तुम्ही सहज समजू शकता की तुमचा कॉल रेकॉर्ड होत आहे.

कॉल रेकॉर्डिंग आणि कॉल टॅपिंगमधील फरक

बऱ्याचदा लोकं कॉल रेकॉर्डिंग आणि कॉल टॅपिंग एकच समजतात. पण यामध्ये फरक आहे,  कॉल टॅपिंगमध्ये तिसरी व्यक्ती दोन लोकांचे संभाषण रेकॉर्ड करत आहे. यासाठी दूरसंचार कंपन्यांचीही मदत घेतली जाते. उदाहरणार्थ, न्यायालयाच्या परवानगीनंतर तपास यंत्रणा कॉल टॅपिंग करू शकतात. खाजगी सुरक्षा एजन्सीद्वारे देखील वेगवेगळ्या साधनांचा वापर करून कॉल टॅपिंग केले जाते.

साधारणपणे कॉल टॅपिंगमध्ये कॉल करणाऱ्यांना थेट माहिती नसते. पण अशा काही गोष्टी आहेत ज्याकडे लक्ष दिल्यास कॉल टॅप होत आहे की नाही हे समजू शकते. उदाहरणार्थ, जर प्रत्येक वेळी तुम्ही एखाद्याला कॉल करत असाल आणि मध्येच सिग्नल जाण्याचा आवाज येत असेल, जसे की जुन्या रेडिओमध्ये येत असे, तर सावध व्हा. वारंवार कॉल ड्रॉप होणे हे देखील अनेक वेळा कॉल टॅपिंगचे लक्षण आहे, परंतु केवळ कॉल ड्रॉप्समुळे कॉल टॅप होत आहेत असे म्हणता येणार नाही.

दुसऱ्या आवाजाकडे लक्ष द्या

कॉल दरम्यान, बीप ऐवजी इतर टोन असल्यासदेखील आपण सतर्क झाले पाहिजे. यावरून कॉल रेकॉर्डिंग देखील ट्रेस करता येते.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.