Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

3GB/64GB, 6,999 रुपयात खरेदी करा 6000 mAh बॅटरीवाला फोन, अमेझॉनवर पहिला सेल

जागतिक प्रीमियम स्मार्टफोन ब्रॅण्ड टेक्नोने गेल्या आठवड्यात नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. टेक्नो स्पार्क 7 असं या स्मार्टफोनचं नाव आहे.

3GB/64GB, 6,999 रुपयात खरेदी करा 6000 mAh बॅटरीवाला फोन, अमेझॉनवर पहिला सेल
Techno Spark7
Follow us
| Updated on: Apr 18, 2021 | 8:07 AM

मुंबई : जागतिक प्रीमियम स्मार्टफोन ब्रॅण्ड टेक्नोने (Techno) गेल्या आठवड्यात नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. यामध्ये मोठा डिस्प्ले, मजबूत बॅटरी, मोठा एआय डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. टेक्नो स्पार्क 7 (Techno Spark 7) असं या स्मार्टफोनचं नाव आहे. आजपासून या स्मार्टफोनची अमेझॉन या ई-कॉमर्स साईटवर विक्री सुरु झाली आहे. दरम्यान, या ब्रॅण्डने बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड केली आहे. त्यामुळे आयुष्मान खुराना आता टेक्नो स्पार्क 7 या अभियानाचा चेहरा बनला आहे. (Techno Spark 7 sale live on Amazon, know price and features)

टेक्नो स्पार्क 7 (Techno Spark 7) हा स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. 2 जीबी प्लस 32 जीबी व्हेरिएंट असणाऱ्या स्मार्टफोनची किंमत 6,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर 3 जीबी प्लस 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 7,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन स्प्रूस ग्रीन, मॅग्नेट ब्लॅक आणि मॉर्फियस ब्लू या तीन रंग पर्यायांसह सादर करण्यात आला आहे.

Techno Spark 7 मध्ये काय आहे खास?

  • या स्मार्टफोनमध्ये 6.52 इंचाचा एचडी प्लस डॉट नॉच डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 720 x 1600 रेजोल्यूशन देण्यात आलं आहे. याचा स्क्रीन बॉडी रेशो 90.34 टक्के तर आस्पेक्ट रेशियो 20 : 9 इतका आहे. 480 निट्स ब्राइटनेससह इमर्सिव व्ह्यूईँक एक्सपीरियंस मिळतो.
  • स्पार्क 7 मध्ये क्वाड फ्लॅशसह 16 मेगापिक्सलचा एआय ड्यूल रियर कॅमेरा आहे. त्याच्या प्राथमिक कॅमेऱ्यामध्ये एफ / 1.8 अपर्चर देण्यात आला आहे, जो अधिक चांगले फोटो कॅप्चर करण्यास सक्षम आहे.
  • हा स्मार्टफोन फोटोग्राफीसाठी चांगला आहे, असे कंपनीने म्हटले आहे. याच्या कॅमेऱ्यामध्ये टाइम-लॅप्स व्हिडीओ, स्लो मोशन व्हिडीओ, बोकेह मोड, एआय ब्यूटी मोड आणि एआय पोर्ट्रेट मोड सारखे प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत.
  • यात एफ 2.0 अपर्चरसह 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आणि अॅडजस्टेबल ब्राइटनेससह ड्युअल फ्रंट फ्लॅश देण्यात आला आहे.
  • स्मार्टफोन स्पार्क 7 चा 3 जीबी + 64 जीबी व्हेरिएंट अँड्रॉयड 11 वर बेस्ड लेटेस्ट एचआयओएस 7.5 वर चालतो. यात शक्तिशाली ऑक्टा-कोर 1.8 गिगाहर्ट्झ सीपीयू हेलियो ए 25 प्रोसेसर आहे.

6000 mAh ची दमदार बॅटरी

या फोनच्या बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये सुरक्षित चार्जसह 6000 एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामध्ये आपल्याला 41 दिवसांपर्यंत स्टँडबाय टाईम मिळतो. तसेच 42 तासांचा कॉलिंग टाईम, 17 तासांचं वेब ब्राऊझिंग, 45 तासांचा म्युझिक प्लेबॅक, 17 तासांचा गेम प्ले आणि 27 तासांचा व्हिडीओ प्लेबॅग मिळेल. बॅटरी इतर एआय फीचर्स जसे की एसआय पॉवर सेव्हिंग, फुल चार्ज अलर्टसह देण्यात आली आहे. जेव्हा फोन पूर्ण चार्ज होईल, तेव्हा ओव्हरचार्जिंग होऊ नये यासाठी हे फीचर पॉवर कट करण्यास सक्षम आहे.

इतर बातम्या

Mobile Bonanza Sale : ‘या’ 10 स्मार्टफोन्सवर तब्बल 8000 रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट

भारतात लाँच झाला Oppo F19 स्मार्टफोन, Paytm वरुन खरेदी केल्यास मिळेल जबरदस्त डिस्काउंट

(Techno Spark 7 sale live on Amazon, know price and features)