60,000 चा iPhone 12 Mini मिळतोय फक्त 24 हजारात ! वाचा कुठे सुरु आहे ही ऑफर
कमी किमतीत आयफोन खरेदी करण्याची संधी मिळाली तर कोणाला आवडणार नाही ! iPhone 12 Mini स्वस्तात खरेदी करण्याची संधी चालून आली आहे. ही ऑफर कुठे सुरू आहे, ते जाणून घेण्यासाठी वाचा.
नवी दिल्ली : आजकाल स्मार्टफोन (smartphone) हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. लोकं मोबाईलवर सतत काही ना काहीतरी करत असतात. स्मार्टफोन वेगवेगळे ब्रँड्स बाजारात आहेत , पण बहुतांश लोकांना आयफोनची (iPhone) भुरळ पडलेली असते. आयुष्यात एकदा तरी आयफोन वापरावा , अशी बहुतांश लोकांची सुप्त इच्छा असते. पण त्यांच्या महाकाय किमतीमुळे (huge price) सर्वांनाच तो परवडतो असं नाही. तुम्हीसुद्धा कमी किमतीत चांगली कामगिरी करणारा स्मार्टफोन शोधत असाल तर तुमच्यासाठी iPhone 12 हा एक चांगला पर्याय असू शकतो. आयफोन 12 Apple च्या ‘मिनी’ आयफोन लाइनअपचा एक भाग आहे, ज्यामध्ये iPhone 13 Mini देखील समाविष्ट आहे.
iPhone 12 हा कॉम्पॅक्ट 5.4- इंच डिझाइन, A14 बायोनिक चिपसेटसह सुसज्ज आहे. Flipkart सध्या फक्त 23999 रुपयांमध्ये हा स्मार्टफोन ऑफर करत आहे. बाजारात या घडीला आयफोनची किंमत 59900 रुपये आहे. पण फ्लिपकार्टवरून तुम्ही हा फोन बऱ्याच स्वस्तात विकत घेऊ शकता.
iPhone 12 Mini वर मिळत्ये सूट
फ्लिपकार्टने iPhone 12 Mini वर एक मोठी ऑफर जाहीर केली आहे. iPhone 12 mini च्या 64GB व्हेरिएंटची मूळ किंमत 59900 रुपये आहे. पण डिस्काउंट आणि ऑफर्स लागू केल्यानंतर तुम्ही हा फोन फक्त 23,990 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. एवढंच नव्हे तर इतर एक्सचेंज आणि बँक ऑफरसह ही किंमत तुम्ही आणखी कमी करू शकता.
म्हणजेच, iPhone 12 Mini मोठ्या प्रमाणात एक्सचेंज बोनस देखील देत आहे. किंमत आणखी कमी करण्यासाठी तुम्ही एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊ शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की, एक्सचेंज ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुमचा सध्याचा (वापरात असलेला) फोन चांगल्या स्थितीत असणे आवश्यक आहे.
iPhone 12 Mini वर बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफर
फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक (Flipkart Axis Bank) कार्डने व्यवहार केल्यावर ग्राहकांना 5 टक्के कॅशबॅक मिळू शकतो. तसेच, तुम्हाला एक सरप्राईज कॅशबॅक कूपन मिळेल जे नोव्हेंबर 2023 पर्यंत वैध असेल. फोन विकत घेताना सर्व रक्कम एकाच वेळी भरणे शक्य नसेल तर तुम्ही नो-कॉस्ट EMI या पर्यायाचा देखील लाभ घेऊ शकता. ॲपल कंपनीचा फोन (iPhone) कमी किमतीत खरेदी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या युजर्ससाठी ही ऑफर चांगलीच लाभदायी ठरू शकते.
iPhone 12 Mini चे स्पेसिफिकेशन्स
iPhone 12 Mini मध्ये 5.4 इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 12 मेगापिक्सलचे ड्युअल कॅमेरे देण्यात आले आहेत. तसेच, सेल्फीसाठी फोनमध्ये 12-मेगापिक्सलचा फ्रंट सेल्फी कॅमेराही आहे. iPhone 12 Mini मध्ये पॉवरफुल A 14 Bionic चिपसेट आहे. हे सिरॅमिक शील्ड डिझाइनसह येते. फोन इंटस्ट्री लीडिंग IP68 वॉटर रेझिस्टन्स प्रोटेक्शनसह येतो. फोनमध्ये नाईट मोड, 4k डॉल्बी व्हिजन एचडीआर रेकॉर्डिंग इत्यादी सुविधा देण्यात आल्या आहेत.