कमी किंमत, जास्त मायलेज, इलेक्ट्राच्या तीन स्कूटर लाँच
वाढत्या प्रदुषणामुळे देशात इलेक्ट्रॉनीक कार वापरण्यासाठी सरकारकडूनही प्रोत्साहन केलं जात आहे. आतापर्यंत अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रॉनीक कार आणि बाईक लाँच केली आहे.
पुणे : वाढत्या प्रदुषणामुळे देशात इलेक्ट्रॉनीक कार वापरण्यासाठी सरकारकडूनही प्रोत्साहन केलं जात आहे. आतापर्यंत अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रॉनीक कार आणि बाईक लाँच केली आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील Techo Electra स्टार्ट अप कंपनीनेही तीन इलेक्ट्रॉनीक स्कूटर लाँच केल्या आहेत. Neo, Raptor आणि Emerge अशी या तीन मॉडेलची नावं आहेत.
Techo Electra च्या तीन स्कूटरची किंमत 43 हजार 967 पासून सुरु होत आहे. या तिन्ही स्कूटरची किंमत प्रत्येक सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारी असल्यामुळे या स्कूटरची मोठ्या प्रमाणात विक्री होऊ शकते, असं सांगितलं जात आहे.
- Techo Electra Neo : 43,967 रुपये
- Techo Electra Raptor : 60,771 रुपये
- Techo Electra Emerge : 72,247 रुपये
Techo Electra च्या तिन्ही मॉडलमध्ये Raptor सर्वात वरचा मॉडल आहे. तर Emerge कंपनीचा फ्लॅगशिप मॉडल आहे. कंपनीने या तिन्ही स्कूटरमध्ये हब-माऊंटेड BLDC मोटारचा वापर केला आहे. जो 250 व्हॅटचा आहे. कंपनीने Emerge स्कूटरमध्ये लिथियम-आयन बॅटरीचा वापर केला आहे. तर Neo आणि Raptor मध्ये अॅसिडचा वापर केलेला आहे.
Neo आणि Raptor मॉडल पूर्ण चार्ज होण्यासाठी 5 ते 7 तास लागतात. तर Emerge ला चार्ज होण्यासाठी 4 ते 5 तास लागतात. Neo पूर्ण चार्ज झाल्यावर 60 ते 65km, Raptor 70 ते 85km आणि Emerge 80km मायलेज देतात.
Techo Electra च्या स्कूटरमध्ये एलईडी हेडलाईट्स, यूएसबी चार्जिंग आणि सेंट्रल लॉकिंगसारखे फीचर दिले आहेत. याशिवाय फ्रंट डिस्क ब्रेक, रिव्हर्सिंग फंक्शन डिजिटल एलसीडी इंस्ट्रूमेंट कन्सोलसराखेही फीचर दिलेले आहेत.
संबधित बातम्या :