मल्टी कलर चेंजिंग स्मार्टफोन म्हणजे काय रं भाऊ… 15 सप्टेंबरला टेक्नोचा धमाका…
Tecno Camon 19 Pro Mondrian Edition भारतात या आठवड्यात लॉन्च होणार आहे. हा स्मार्टफोन मल्टी-कलर चेंजिंग बॅक पॅनलसह लॉन्च केला जाणार असून भारतातील हा असा पहिला फोन ठरणार आहे. या लेखातून या फोनबद्दलची फीचर्स आहे किंमतबाबत माहिती घेणार आहोत.

टेक्नो कंपनीचा कॅमॉन 19 प्रो मोंड्रियन एडिशन (Tecno Camon 19 Pro Mondrian Edition) या आठवड्यात भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्यात येणार आहे. हा स्मार्टफोन भारतातील पहिला मल्टी कलर चेंजिंग स्मार्टफोन ठरणार आहे. त्यामुळे या स्मार्टफोनबद्दल ग्राहकांमध्ये कमालीची उत्सूकता आहे. मल्टी कलर चेंजिंग म्हणजे याचा अर्थ स्मार्टफोनच्या मागील पॅनल त्याचा रंग बदलतो. टेक्नोने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विट करून या मोंड्रियन (Mondrian) एडिशनच्या लॉन्चची माहिती दिली आहे.
टेक्नोने बरीच माहिती दिली असली तरी ती पूर्ण आहे, असे म्हणता येणार नाही. ग्राहकांना हा स्मार्टफोन (smartphone) प्रत्यक्ष बाजारात दाखल झाल्यावरच त्याची संपूर्ण माहिती कळू शकणार आहे.
कधी होणार दाखल?
टेक्नोने केलेल्या ट्विटनुसार, Tecno Camon 19 Pro Mondrian Edition 15 सप्टेंबर रोजी लॉन्च होईल. या टेक्नो मोबाईल फोनमध्ये कोणते फीचर्स दिसतील याबाबत ग्राहकांमध्ये उत्सूकता आहे. काही लिक्सच्या माध्यमातून कन्फर्म फीचर्सची माहिती मिळाली आहे.
लॉन्चच्या अगोदर Amazon वर संबंधित टेक्नो स्मार्टफोनसाठी एक मायक्रोसाइट तयार करण्यात आली असून त्या माध्यमातून फोनच्या काही खास फीचर्सची माहिती उघड झाली आहे.
डिस्प्ले : 120Hz रिफ्रेश रेटसह 6.8 इंच फुल एचडी+ डिस्प्ले.
बॅटरी : फोन अधिक दमदार बनविण्यासाठी 33 वॅट फास्ट चार्ज सपोर्टसह 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे.
कॅमेरा : फोनच्या मागील बाजूस 64 मेगापिक्सेल RGBW+(G+P) सेन्सरसह 50 मेगापिक्सेल पोर्ट्रेट लेन्स आहे.
रॅम आणि स्टोरेज : फोनमध्ये व्हर्च्युअल रॅम सपोर्टच्या मदतीने 13 जीबीपर्यंत रॅम वाढवता येते. ग्राहकांना 128 जीबी इंटरनल स्टोरेजही मिळतो.
सध्या, कंपनीने Tecno Camon 19 Pro Mondrian Edition किंमतीबाबत कोणतीही माहिती दिलेले नाहीत. तसेच टेक्नोच्या या स्मार्टफोनच्या किंमतीशी संबंधित कोणतीही लिक्स अद्याप समोर आलेले नाहीत.