Tecno Phantom X या आठवड्यात होणार आहे लॉंच ! वैशिष्ट्ये, पाहुन तुम्हीही व्हाल हैराण…
Tecno Phantom X चे लॉंचींग जवळ आल्याचे बोलले जात आहे. त्याबद्दल बाजारात चर्चा सुरू झाली असून, कधीही हा शक्तिशाली स्मार्टफोन भारतात लॉच केला जाऊ शकतो. जाणून घेऊया काय असतील वैशिष्टये.
मुंबई : Tecno ने जून 2021 मध्ये Tecno Phantom X स्मार्टफोनची घोषणा (Smartphone announcement) केली होती. Tecno Phantom X ही कंपनीची टॉप-ऑफ-द-लाइन ऑफर (Top-of-the-line offer)आहे आणि उत्कृष्ट डिझाइन ऑफर करते. आम्ही तुम्हाला सांगु इच्छितो की, Amazon India वर एक मायक्रो-साइट लाइव्ह (Micro-Site Live) झाली असून, यावर दिलेल्या माहितीनुसार हा हँडसेट लवकरच भारतीय बाजारात लॉंच केला जाईल. जरी मायक्रो-साइटने Tecno Phantom X इंडिया लॉंचची तारीख उघड केली नसली तरी, लीक झालेली माहिती सूचित करते की, हँडसेट या महिन्यात भारतीय बाजारात लॉंच होईल. हॅंडसेट OLED डिस्प्लेसह येईल जो 90Hz चा रीफ्रेश दर देईल. Phantom X च्या इतर हायलाइट्समध्ये MediaTek Helio G95 प्रोसेसर, 50MP रिअर कॅमेरा, 48MP सेल्फी कॅमेरा आणि 33W फास्ट चार्जिंगसह 4700mAh बॅटरी यांचा समावेश आहे.
Tecno Phantom X ची वैशिष्ट्ये
Tecno Phantom X मध्ये 2340×1080 पिक्सेल रिझोल्यूशन, 90Hz रिफ्रेश रेट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास संरक्षणासह 6.7-इंचाचा फुल HD+ सॅमोलेड डिस्प्ले आहे. डिव्हाइस कर्व्ही डिस्प्लेसह येते आणि त्यात एक ऑप्टिकल इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देखील देण्यात आला आहे.
Phantom X मध्ये Octa-core MediaTek Helio G95 प्रोसेसर आणि Mali G76 GPU आहे. Helio G95 हा एक मध्यम-श्रेणीचा प्रोसेसर आहे जो Redmi Note 10S, Realme Narzo 30 आणि Realme 8 सह अनेक मध्यम-श्रेणी उपकरणांना शक्ती देतो.
ट्रिपल-रियर कॅमेरा सेटअप
या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला ट्रिपल-रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल ज्यामध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा समाविष्ट आहे. यासोबत 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 13MP 50mm पोर्ट्रेट कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी, ते ड्युअल फ्रंट कॅमेऱ्यांवर अवलंबून आहे ज्यात 48MP प्राथमिक शूटर आणि 8MP अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्स समाविष्ट आहेत. Tecno Phantom X 4700mAh बॅटरीने सुसज्ज आहे आणि 33W जलद चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन Starry Night Blue और Monet Summer या दोन रंगामध्ये उपलब्ध होईल.
इतर बातम्या :