Tecno Spark 9 : 11 GB रॅम अन् दमदार कॅमेरा फीचर्ससह Tecno Spark 9 लाँच
Tecno Spark 9 हा स्मार्टफोन इन्फिनिटी ब्लॅक आणि स्काय मिरर कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. Tecno Spark 9 एंट्री लेव्हल स्मार्टफोन म्हणून लाँच करण्यात आला आहे. या फोनची सुरुवातीची किंमत 9,499 रुपये इतकी ठरविण्यात आली आहे.
चायनिज स्मार्टफोन निर्माता टेक्नोने (Tecno) सोमवारी (18 जुलै) आपला नवीन स्मार्टफोन टेक्नो स्पार्क 9 (Tecno Spark 9) भारतात लाँच केला. Tecno Spark 9 हा एंट्री लेव्हल स्मार्टफोन असून तो 9,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये 6.6 इंचाचा एचडी प्लस डिसप्ले आणि 90Hz चा रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आणि 13 मेगापिक्सलची प्रायमरी लेंसदेखील आहे. या फोनमध्ये 11 जीबीपर्यंतची रॅम उपलब्ध आहे. Tecno Spark 9 हा स्मार्टफोन इन्फिनिटी ब्लॅक आणि स्काय मिरर कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. या लेखातून आपण टेक्नोच्या स्मार्टफोनविषयी (smartphone) संपूर्ण तपशिल, किंमतीची माहिती घेणार आहोत.
काय आहे किंमत
Tecno Spark 9 एंट्री लेव्हल स्मार्टफोन म्हणून लाँच करण्यात आला आहे. या फोनची सुरुवातीची किंमत 9,499 रुपये आहे. हा फोन 23 जुलैपासून ई-कॉमर्स वेबसाइट ॲमेझॉनवरून खरेदी करता येणार आहे. ॲमेझॉन प्राइम-डे सेलअंतर्गत त्याची विक्री सुरु करण्यात येणार आहे.
दमदार स्पेसिफिकेशन्स
Tecno Spark 9 Android 12 वर काम करीत असून HiOS 8.6 सह उपलब्ध आहे. स्मार्टफोनमध्ये Octacore MediaTek Helio G37 प्रोसेसर देण्यात आले आहे. या फोनमध्ये 6.6 इंचाचा एचडी प्लस डिसप्ले देण्यात आला आहे. त्याच बरोबर फोनच्या समोर वॉटर ड्रॉप नॉच डिसप्ले देण्यात आला आहे. Tecno Spark 9 मध्ये 6 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज असून ते मायक्रो एचडी कार्डच्या मदतीने 512 जीबीपर्यंत वाढवता येते. रॅम प्लस फीचर्सच्या मदतीने फोनची रॅम 11 जीबी (6 जीबी फिजिकल रॅम + 5 जीबी व्हर्च्युअल रॅम)पर्यंत वाढविली जाऊ शकते.
13 मेगापिक्सेलचा कॅमेरा
Tecno Tecno Spark 9 मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला असून तो 13 मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा सेंसर आणि दुसरा AI लेंससह उपलब्ध आहे. या फोनमध्ये एलईडी फ्लॅश लाईट देखील उपलब्ध आहे. फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असून तो F/2.0 अपर्चरसह येतो.
टेक्नो स्पार्क 9 बॅटरी
Tecno Spark 9 मध्ये 5,000mAh बॅटरी उपलब्ध आहे. या फोनमध्ये 3.5mm ऑडिओ जॅक, FM रेडिओ, ड्युअल 4G VoLTE, वायफाय 802.11 ac, ब्लुटूक्ष 5, USB टाइप सी पोर्ट आणि जीपीएससारखे फीचर्स आहेत. फोनमध्ये सुरक्षेसाठी मागील बाजूस फिंगरप्रिंट रीडर देखील देण्यात आला आहे.