आता मोबाईल बिल महागणार, दूरसंचार कंपन्या शुल्क वाढवण्याच्या तयारीत
आता मोबाईल बिल महागणार, दूरसंचार कंपन्या शुल्क वाढवण्याच्या तयारीत (telecom companies are preparing to raise tariff)
नवी दिल्ली : सर्व दूरसंचार कंपन्या आपल्या टॅरिफ प्लॅनमध्ये वाढ करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे टॅरिफ प्लानमध्ये वाढ झाल्यास मोबाईल बिल महागणार आहेत. येत्या काही दिवसात आपल्या टॅरिफ प्लाननध्ये वाढ करण्याचे संकेत दूरसंचार कंपन्यांनी दिले आहेत. दूरसंचार कंपन्या आता शुल्क योजना वाढविण्याच्या तयारीत असून येत्या काही दिवसांत तुमचे मोबाईल बिलही वाढणार आहे. दूरसंचार क्षेत्रातील विद्यमान शुल्क योजना बदलण्याचा निर्णय कंपन्यांनी घेतला आहे. (telecom companies are preparing to raise tariff)
एअरटेल, जिओ, बीएसएनएल, व्हीआय शुल्क वाढवण्याच्या तयारीत
एअरटेल, जिओ, बीएसएनएल, आणि व्हीआय आपल्या विद्यमान शुल्क वाढवण्याची तयारी करीत आहे. इन्व्हेस्टमेंट इन्फॉर्मेशन अँड क्रेडिट रेटिंग एजन्सी (आयसीआरए)च्या बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, एक एप्रिलपासून सुरू होणार्या आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये कंपन्या आपला महसूल वाढविण्यासाठी ही शुल्क वाढ करु शकतात. व्होडाफोन-आयडिया (व्हीआय) ने असे संकेत दिले आहेत की, येत्या काही दिवसात शुल्काच्या योजनांमध्ये वाढ केली जाईल. शुल्क योजनेती बदल लवकरच सादर केले जातील.
प्रति युजर्स उत्पन्नात वाढ होईल
अहवालातील माहितीनुसार वाढीव दरांमुळे प्रति युजर्स सरासरी उत्पन्नात वाढ होईल, अशी आशा आयसीआरएने व्यक्त केली आहे. वर्षाच्या मध्यापर्यंत ते सुमारे 220 रुपये असू शकते. यामुळे पुढील 2 वर्षात उद्योगाच्या उत्पन्नात 11% वरून 13% आणि 2022 मध्ये सुमारे 38% वाढ होईल.
दूरसंचार कंपन्यांवर कोटींचे कर्ज
दूरसंचार कंपन्यांवरील एकूण समायोजित सकल महसूल (एजीआर) 1.69 लाख कोटी रुपये आहे. तर 15 दूरसंचार कंपन्यांनी केवळ 30,254 कोटी रुपये दिले आहेत. एअरटेलवर सुमारे 25,976 कोटी रुपये, व्होडाफोन आयडियावर 50399 कोटी रुपये आणि टाटा टेलिसर्व्हिसेसवर 16,798 कोटी रुपयांचे कर्ज आहे. चालू आर्थिक वर्षात कंपन्यांना 10 टक्के आणि पुढील वर्षांत उर्वरित रक्कम भरावी लागेल. यापूर्वी डिसेंबर 2019 मध्ये दूरसंचार कंपन्यांनी आपले दर वाढविले होते. (telecom companies are preparing to raise tariff)
ही कार कंपनी करणार कर्मचारी कपात, 2025 पर्यंत सर्व गाड्यांमध्ये होणार महत्वाचे बदलhttps://t.co/883RKpuM2o#JaguarLandRover |#layoff |#employees |#electriccars
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 18, 2021
इतर बातम्या
7,199 रुपयांचा स्मार्टफोन अवघ्या 599 रुपयात, कंपनीकडून ऑफर्सचा धमाका
ह्युंदायचा इलेक्ट्रिक SUVs चा धडाका, भारतात 3200 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार