Telegram CEO Arrest : टेलिग्रामचे सीईओ पावेल डुरोव यांना केली अटक, विमानतळावर उतरताच पोलिसांनी घेतले ताब्यात, हे कारण आले समोर

CEO Pavel Durov Arrest : टेलिग्रामचे सीईओ पावेल डुरोव यांना फ्रान्स पोलिसांनी अटक केली आहे. फ्रांस वृत्तसंस्थेनुसार, टेलिग्राम मॅसेजिंग ॲपचे अब्जाधीश संस्थापक आणि सीईओ पावेल डुरोव यांना शनिवारी संध्याकाळी विमानतळावरच अटक करण्यात आली.

Telegram CEO Arrest : टेलिग्रामचे सीईओ पावेल डुरोव यांना केली अटक, विमानतळावर उतरताच पोलिसांनी घेतले ताब्यात, हे कारण आले समोर
टेलिग्रामच्या सीईओंना अटक
Follow us
| Updated on: Aug 25, 2024 | 9:13 AM

टेलिग्राम मॅसेजिंग ॲपचे अब्जाधीश संस्थापक आणि सीईओ पावेल डुरोव यांना फ्रान्स पोलिसांनी अटक केली. पॅरिस विमानतळावर उतरताच त्यांना अटक करण्यात आली. शनिवारी संध्याकाळी पॅरिसच्या जवळील बॉर्गेट विमानतळावर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ते स्वतःच्या खासगी जेटने पॅरिस येथे आले होते. त्यावेळी पोलिसांनी ही कारवाई केली. डुरोव हे अजरबैजान या देशातून फ्रान्समध्ये पोहचले होते. त्यांच्या या अटकेवर टेलिग्रामने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

इतर समाज माध्यमांप्रमाणेच टेलिग्रामचा पण एक मोठा वर्ग जगभर पसरलेला आहे. या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर अनेक जण आहेत. भारतात काही वर्षांपूर्वी व्हॉट्सॲप बॉयकॉटची टूम आली होती. त्यावेळी टेलिग्राम हे भारतीय असल्याचा खोटा प्रचार पण झाला होता. डुरोव हे दुबईत स्थायिक झाले आहेत. ते मुळत: रशियन आहेत. त्यांनी 2014 मध्येच रशिया सोडला होता.

का केली अटक

हे सुद्धा वाचा

फ्रान्स मीडियानुसार, डुरोव यांना टेलिग्राम ॲप संबंधी एका प्रकरणात अटक करण्यात आली आहे. टेलिग्रामवर नियंत्रक नसल्याचे फ्रान्स सरकारचे म्हणणे आहे. फ्रान्समध्ये या ॲपच्या माध्यमातून काही गुन्हेगारी कृत्य घडल्याचा ठपका आहे. तेव्हापासून फ्रान्स सरकारने या ॲपच्या घडामोडीवर लक्ष केंद्रीत केले आहे. या मॅसेजिंग ॲपवर नियत्रंक नसल्याने गुन्हेगारी घडामोडीत त्याचा वापर वाढल्याचा आरोप करण्यात आला आहे.

किती आहे डुरोव यांची संपत्ती

फोर्ब्सनुसार, डुरोव यांच्याकडे एकूण 15.5 अब्ज डॉलर इतकी संपत्ती आहे. डुरोव यांनी पण सरकारविरोधात मोर्चा उघडला आहे. सरकार गेल्या काही महिन्यांपासून आपल्यावर दबाव टाकत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सध्या या टेलिग्रामवर जगभरात 900 दशलक्ष सक्रिय वापरकर्ते आहेत. या अटकेनंतर रशियातील ब्लॉगर्सने रविवार दुपारी फ्रान्सच्या दुतावासासमोर आंदोलनाचा इशारा दिला आहे. फ्रान्स डुरोव यांच्यावर दडपण आणत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. डुरोव हे सध्या दुबईत स्थायिक झाले आहेत. पण ते मुळत: रशियन आहेत. त्यांनी 2014 मध्येच रशिया सोडला होता. पण त्यांचा मोठा चाहता वर्ग या देशात आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.