अमेरिकी कंपनीचा नवा स्मार्टफोन लाँच, चार वर्षांची वॉरंटी, पाहा फीचर

आतापर्यंतच्या प्रत्येक स्मार्टफोनला एक वर्षाची वॉरंटी दिली जाते (Smartphone with four years warranty).

अमेरिकी कंपनीचा नवा स्मार्टफोन लाँच, चार वर्षांची वॉरंटी, पाहा फीचर
Follow us
| Updated on: Oct 07, 2020 | 2:46 PM

मुंबई : आतापर्यंतच्या प्रत्येक स्मार्टफोनला एक वर्षाची वॉरंटी दिली जाते (Smartphone with four years warranty). पण आता मार्केटमध्ये एका अशा स्मार्टफोनची एण्ट्री झाली आहे ज्याला चार वर्षाची वॉरंटी दिली आहे. या स्मार्टफोनला Teracube नावाच्या अमेरिकी कंपनीने तयार केले आहे. फोनचे नाव Teracube 2e आहे. या फोनची किंमत 99 डॉलर (भारतीय रुपयात 7200 रुपये) आहे (Smartphone with four years warranty).

टेराक्यूब 2e एक अँड्रॉईड स्मार्टफोन आणि रीसायकल मटीरियल्सपासून तायर केला आहे. हा फोन Indiegogo वर क्राऊडफंडिंगसाठी लिस्ट केला आहे. चार वर्षांच्या वॉरंटीसह फोनमध्ये रिप्लेस केली जाणारी बॅटरी आणि बायोडिग्रेडेबल मिळतात.

मीडियाटेक प्रोसेसर आणि ड्युअल कॅमेरा सेटअप

फोनमध्ये तुम्हाला वॉटरड्रॉप नॉचसह 6.1 इंचाचा एचडी+ डिस्प्ले मिळतो. 4 जीबी रॅम आणि 64 जीबीचा इंटरनल स्टोअरेजच्या या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो A25 प्रोसेसर लावला आहे. फोटोग्रॅफीसाठी यामध्ये 13 मेगापिक्सल + 8 मेगापिक्सलच्या कॅमेराचा समावेश आहे.

4000mAh बॅटरी आणि फिंगरप्रिंट सेंसर

फोनमध्ये रिअर माऊंटेड फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे. 4000mAh ची बॅटरी दिली आहे. तसेच फोनमध्ये फेस अनलॉक, ड्युअल सिम सपोर्टसह मायक्रो एसडी कार्ड स्लॉटही मिळतो. कनेक्टव्हिटीसाठी या फोनमध्ये ऑडिओ जॅकसह ब्लूटूथ 5.0, NFC, ड्युअल बँड वाय-फाय आणि यूएसबी टाईप-C पोर्टसारखे ऑप्शन दिले आहे.

फोनच्या रिटेल बॉक्समध्ये तुम्हाला चार्जर, इअरफोन आणि केबल मिळणार नाहीत. कंपनीच्या मते सर्वाधिक युझर्सकडे या गोष्टी उपलब्ध असतात. इंडिगोगो पेजच्या लिस्टिंगनुसार या फोनच्या पॅकेजिंग recycled paper ने झाली आहे आणि याच्या प्रिटिंगमध्ये सोय इंकचा वापर केला आहे.

क्राऊडफंडिंग प्रोडक्ट असल्यामुळे याच्या किमतीत चढ-उतार होत राहतात. आता हा फोन 99 डॉलर (जवळपास 7200 रुपये) मध्ये खरेदी केला जाऊ शकतो. आता या फोने केवळ आठ युटिन शिल्लक राहिले आहेत. फोनची किंमत कधीही 119 डॉलर (8700 रुपये) होऊ शकते. हा फोन ट्विन पॅकमध्ये उपलब्ध आहे. ज्याची किंमत 199 डॉलर (जवळपास 14600 रुपये) आहे. चार वर्षाच्या वॉरंटीसह हा फोन फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड, पोलँड, सिंगापूर, स्पेन आणि युकेमध्ये उपलब्ध आहे.

संबंधित बातम्या :

Paytm Mini App store | थेट गुगलला आव्हान, पेटीएमचे नवे ‘मिनी अ‍ॅप स्टोअर’ लाँच!

BMW ची शानदार बाईक लाँच होण्यास सज्ज, दमदार फिचर्समुळे रायडर्स प्रभावित

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.