Tesla Powerwall : सूर्याच्या प्रकाशावर धावणार कार, घर लख्ख उजळणार !

Tesla Powerwall : Elon Musk ची कंपनी टेस्ला भारतात एक अनोखा प्रयोग घेऊन येत आहे. पुण्यात कंपनीने मोठे कार्यालय भाड्याने घेतले आहे. लवकरच कंपनी देशात प्रकल्प उभा करण्याची शक्यता आहे. पॉवरवॉल या तंत्रज्ञानाच्या मदतीने कंपनी क्रांती करण्याच्या तयारीत आहे. काय आहे हे तंत्रज्ञान

Tesla Powerwall : सूर्याच्या प्रकाशावर धावणार कार, घर लख्ख उजळणार !
Follow us
| Updated on: Sep 22, 2023 | 2:06 PM

नवी दिल्ली | 22 सप्टेंबर 2023 : अमेरिकेतील मुख्य इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी Tesla ने भारतात प्रकल्पाचा नारळ फोडला आहे. भारताच्या रस्त्यावर लवकरच टेस्लाच्या कार धावतील. भारत आणि पूर्व आशियात इलेक्ट्रिक वाहनांची मोठी बाजारपेठ टेस्लाला आकर्षित करत आहे. एलॉन मस्कने (Elon Musk) त्यासाठी कंबर कसली आहे. टेस्ला इंडिया मोटर अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडने पुण्यात पंचशील बिझनेस पार्कमध्ये एक कार्यालय भाड्याने घेतले आहे. टेस्ला भारतात एक खास प्रयोग करण्याच्या तयारीत आहे. सूर्य प्रकाशाच्या सहायाने इलेक्ट्रिक कार तर धावेलच पण तुमचे घर पण उजळून निघेल, असा हा प्रयोग आहे. काय आहे Tesla Powerwall तंत्रज्ञान? कसा होतो त्याचा वापर?

टेस्ला कार लवकरच भारतात

Tesla गेल्या काही आठवड्यांपासून नवीन इलेक्ट्रिक वाहन (EV) तयार करण्यासाठी फॅक्टरी सुरु करणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारसोबत चर्चा सुरु आहे. एका वृत्तानुसार कंपनी 24,000 डॉलर म्हणजे जवळपास 20 लाख रुपयांची इलेक्ट्रिक कार भारतीय बाजारात उतरवणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकन दौऱ्यावर असताना एलॉन मस्क याने त्यांची भेट घेतली होती. तेव्हापासून भारतीय बाजारपेठेत टेस्ला येणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहे Powerwall तंत्रज्ञान

Powerwall एक इंटिग्रेटेड बॅटरी सिस्टम आहे. पॉवर ग्रीड बंद झाले तर बॅकअपसाठी ते उपयोगी ठरते. सूर्याच्या ऊर्जेचे रुपांतर वीजेत करुन हे तंत्रज्ञान बॅटरीमध्ये साठवते. जेव्हा वीजेची गरज असते, तेव्हा या तंत्रज्ञानाच्या मदतीने आपोआप वीज प्रवाह सुरु होतो. हे एक वीजेचे एकप्रकारे बॅकअप आहे. यावर घरातील अनेक उपकरण चालतात. घर उजळून निघते. एवढेच नाही तर तुमच्या कारच्या बॅटरी पण रिचार्ज होतात.

असे करते काम

Tesla Powerwall घराच्या छतावर बसवावे लागते. सूर्याच्या ऊर्जे आधारे यातील लिथिनियम बॅटरी चार्च होतात. त्याचा वापर करुन घरगुती उपकरणांना ऊर्जा मिळते. तुम्ही विद्युत प्रवाह खंडीत झाला तरी याचा बॅकअप मिळतो. तसेच या आधारे इलेक्ट्रिक वाहनातील बॅटरी सुद्धा चार्ज करता येते.

किंमत किती?

सध्या जगात दोन प्रकारच्या पॉवरवॉल उपलब्ध आहेत. एक साधी पॉवरवॉल तर दुसरी पॉवरवॉल प्लस अशी दोन उत्पादनं आहेत. कॅलिफोर्नियात पॉवरवॉलची किंमत 5500 डॉलर म्हणजे 45,000 रुपयांपेक्षा अधिक आहे. यामध्ये इतर खर्च पण येतो. भारतात टेस्ला या तंत्रज्ञानाच्या किंमती आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.