That Indian Way : जुन्या पिढीच्या स्मार्टफोनच्या ‘या’ सवयी तुम्हाला करतील चकित!

शाळेत जाणाऱ्या मुलांपासून ते आजी-आजोबांपर्यंत सर्वांसाठीच स्मार्टफोन हा जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे.

That Indian Way : जुन्या पिढीच्या स्मार्टफोनच्या 'या' सवयी तुम्हाला करतील चकित!
प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: Corning Incorporated
Follow us
| Updated on: Sep 06, 2022 | 4:17 PM

शाळेत जाणारी लहान मुलं असोत किंवा आजी-आजोबा, आजकाल स्मार्टफोन (Smartphone) हा सर्वांच्याच जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. तरूण पिढी त्यांच्या सभोवतालच्या तंत्रज्ञानासोबतच (Technology) मोठी झाली आहे. पण स्मार्टफोनच्या तंत्रज्ञानात एवढी वेगाने प्रगती झाली आहे, की या Gen Xने प्लॅस्टिकच्या चंकी फोनपासून ते आत्ताच्या काळातील स्लिक, स्लिम स्मार्टफोन्सपर्यंत सर्व बदल पाहिला आहे. यामुळेच प्रश्न पडतो, की आपले आई-वडील, काका-काकू रोज स्मार्टफोन कसे वापरतात? एक गोष्ट मात्र नक्की, की तरूण पिढीपेक्षा ते लोक (आई-वडील, काका-काकू) स्मार्टफोन्स अतिशय जपून वापरतात. आजची तरूण पिढी म्हणजे Gen Z त्यांचे फोन अक्षरश: हवेत उडवतात, Gen X (जुनी पिढी) त्यांच्या फोनचा खूपच जपून वापर करतात.

‘माझ्यापेक्षा स्मार्टफोनवर प्रेम!’

माझी आई माझ्याशी जेवढी प्रेमाने वागत नाही, त्यापेक्षा हळूवारपणे ती माझा फोन वापरते, असा अनुभव 22 वर्षांच्या रोहितने सांगितला. तो एक लेखक आहे. आश्चर्याची बाब म्हणजे याच्या अगदी उलटही आहे! Gen X (जुनी पिढी)मधील लोक अशा ठिकाणी स्मार्टफोनचा वापर करतात, जिथे फोन वापरण्यापूर्वी (Gen Z) नव्या पिढीतील लोक दोनवेळा तरी विचार करतील. स्वयंपाकघरात रोजची कामं करताना, नव्या पदार्थांचे यूट्यूबवरील व्हिडिओज पाहण्यासाठी ते स्मार्टफोन वापरतात. अशा वेळी आई-बाबा, काका-काकूंची काळजी करायची, की त्यांच्या स्मार्टफोनची, असा प्रश्न नव्या पिढीला नक्कीच पडतो. खरंतर त्यांना दोघांचीही काळजी वाटतेच.

हे सुद्धा वाचा

डिजीटल क्रिएटरचे काय म्हणणे?

डिजीटल क्रिएटर म्हणून काम करणाऱ्या फुन्यासीला त्याच्या आईच्या बाबतीत हा संघर्ष रोज करावा लागतो. ‘माझ्या आईच्या फोनवर किती वेळा कणीक, मैदा, मीठ किंवा हळद येते, याचा मला काहीच अंदाज नाही’ असे 21 वर्षांची पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थिनी असलेल्या अंजलीने सांगितले.

View this post on Instagram

A post shared by Funyaasi (@funyaasi)

व्हिडिओ कॉल महत्त्वाचे

कोरोना महामारी आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळे जगभरातील बऱ्याच कुटुंबांसाठी एकमेकांशी जोडलेले राहण्यासाठी व्हिडिओ कॉल खूप महत्त्वाचे बनले होते. पण लॉकडाऊन नसतानाही फॅमिली व्हिडिओ कॉल्स हे भारतीय कुटुंबांचा एक भाग बनले आहेत. जुन्या पिढीसाठी (Gen X) याचा अर्थ, बऱ्याच वेळेस कॅमेरा चेहऱ्याच्या खूप जवळ धरून गप्पा मारणे असा होतो. इतर कामं करतानाही त्यांचा स्मार्टफोन एक वेगळ्याच अनिश्चित अँगलमध्ये ठेवलेला दिसतो. आपली आई आपल्यापेक्षा स्मार्टफोनची जास्त काळजी घेते, याबद्दल आर. जे. करिश्मा हिला गंमत वाटते.

View this post on Instagram

A post shared by RJ Karishma (@rjkarishma)

आश्चर्यकारक पिढी

विष्णू कौशल याचे रील्स पाहून असं वाटतं की तो आपल्यावर आणि आपल्या आईवर नजर ठेऊनच आहे की काय? त्याचे व्हिडिओज अचूक असतात. विनोदाचा भाग सोडल्यास, जुनी पिढी (Gen X) ही खरोखरच आश्चर्यकारक पिढी आहे. एवढ्या कमी वेळात त्यांनी कितीतरी नवं तंत्रज्ञान शिकून घेतलं आहे. पर्सनल कॉम्प्युटर्सपासून ते स्मार्टफोनपर्यंत, तसेच टॅब्लेट आणि स्मार्टवॉचसारख्या इतर गॅजेट्सपर्यंत जुन्या पिढीतील लोकांनी हळूहळू तंत्रज्ञानातील अद्ययावत गोष्टींशी जुळवून घेतलं आहे.

डिव्हाइसला स्क्रॅच आणि थेंबांपासून वाचवण्यात मदत

इलेक्ट्रॉनिक्स बद्दलच्या काही गोष्टी थोड्याशा ‘ऑफ’ वाटत असल्या तरी या Gen Xला त्यांच्या डिव्हाइसमध्ये नक्की काय हवे आहे, हे बरोबर माहीत आहे. म्हणूनच ते कॉर्निंग गोरिल्ला ग्लास असलेल्या स्मार्टफोनला प्राधान्य देतात. जी ग्लास दररोजच्या वापरातील त्यांच्या डिव्हाइसला स्क्रॅच आणि थेंबांपासून वाचवण्यात मदत करते, अशी ग्लास ते वापरतात. यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. पालकांना सगळ्यांत उत्तम कळतं, हे सौरभ घाडगे याचं म्हणणं अगदी खरं आहे!

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.