एक्सची जोरदार खेळी, WhatsApp ची चिंता वाढली, आले हे फीचर
WhatsApp X | एलॉन मस्क यांनी ट्विटर हाती घेतल्यापासून ते एक प्रयोगशाळाच ठरले आहे. त्याचे नाव बदलण्यात आले. या मायक्रो ब्लॉगिंग साईटचे नाव X ठेवण्यात आले. या सोशल मीडिया ॲपने मध्यंतरी केलेल्या प्रयोगाचा मोठा फटका बसला. युझर्स परत मिळवण्यासाठी त्यांना आता आणखी नवीन प्रयोगाचा घाट घातला आहे. त्याचा व्हॉट्सॲपला फटका बसू शकतो.
नवी दिल्ली | 21 January 2024 : जगातील अब्जाधीश एलॉन मस्क याने ट्विटर हाती घेतल्यापासून या मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मचा खेळ झाला. त्याचे नाव एक्स, X करण्यात आले. पण सुविधा देण्याचा नावाखाली शुल्क अकारणी सुरु झाल्यावर युझर्सने या चिमणीला रामराम ठोकला. अजूनही सब्सक्रिप्शन प्लॅनची चलती आहे. चिमणीला उडवल्यानंतर मस्कने लोगो आणि नाव बदलले. त्याचा परिणाम झाला नाही. पण युझर्सची संख्या वाढवण्यासाठी मस्कने आता एक खेळी खेळली आहे. युझर्स परत आणण्यासाठी आता एक्सवर एकदम खास फीचर जोडण्यात आले आहे. त्याचा फटका व्हॉट्सॲपला बसू शकतो.
जोडले हे फीचर
तशी अनेकांना शंका पण आहे, कारण व्हॉट्सॲप हे पूर्णपणे मोफत आहे. त्यासाठी ग्राहकांना पैसे मोजावे लागत नाही. तर एक्सवर अनेक सेवांसाठी ग्राहकांना किंमत मोजावी लागते. बेसिक एक्सवर त्यांना फार सवलती मिळत नाही. आता एक्सवर ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. अँड्रॉईड युझर्स त्यांच्या ॲपवरुन त्यांचे नातेवाईक, मित्र, संबंधितांना थेट कॉल करु शकतात. हा कॉल ऑडिओ आणि व्हिडिओ स्वरुपाचा असेल.
इंजिनिअरने दिली ही माहिती
या प्रकल्पावर काम करणाऱ्या एक्सच्या इंजिनिअरने याविषयीची माहिती दिली आहे. त्याच्या माहितीनुसार, अँड्राईड युझरला ही सेवा मिळवायची असेल तर त्यांनी लागलीच त्यांचे ॲप अपडेट करणे आवश्यक आहे. पण एक्सवर काही सेवांसाठी शुल्क आकारण्यात येते. प्रीमियम युझर्सला ही सेवा मिळणार की बेसिक एक्स ॲप वापरणाऱ्यांना सुद्धा त्याचा लाभ मिळणार हा प्रश्न विचारण्यात येत होता. पण ही सुविधा केवळ प्रीमियम युझर्सलाच मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कसे करता येईल कॉलिंग?
- ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंग ॲक्टिव्ह कसे करणार?
- ही सेवा सुरु करण्यासाठी युझर्सला सेटिंगमध्ये जावे लागेल
- प्रायव्हेसी आणि सिक्युरिटी हा पर्याय निवडा
- युझर्स त्यानंतर डायरेक्ट मॅसेज वर जाऊन सेवाचे लाभ घेता येईल
पेमेंटचा पर्याय कधी मिळणार
X वर पेमेंट फीचर लवकरच मिळेल, अशी वार्ता एक वर्षांपासून सोशल मीडियावर सुरु आहे. अर्थात मस्कच्या सुपीक डोक्यातून शुल्क आकारणी सुरु झाल्यानंतर ही चर्चा मागे पडली. पण लवकरच एक्स ॲपच्या माध्यमातून युझर पेमेंट करु शकतील,असा खुलासा एलॉन मस्क यांनी केला आहे. पेमेंट फीचर लवकरच लाँच करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. त्यावर अनेक युझर्सने त्यासाठी किती शुल्क आकारण्यात येणार, अशा चिमटा त्याला काढला.