फेब्रुवारी-मार्चमध्ये लाँच होणार हे पाच स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि फिचर्सची माहिती

फेब्रुवारी-मार्चमध्ये लाँच होणार हे पाच स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि फिचर्सची माहिती (The five smartphones will be launched in February-March)

फेब्रुवारी-मार्चमध्ये लाँच होणार हे पाच स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि फिचर्सची माहिती
पुढील आठवड्यात भारतात लाँच होणार हे स्मार्टफोन
Follow us
| Updated on: Feb 15, 2021 | 11:52 AM

नवी दिल्ली : ग्राहकांना परवणाऱ्या किंमतीत अत्याधुनिक सुविधा देत आपल्या प्रोडक्टच्या विक्रीत वाढ करण्यासाठी सर्व स्मार्टफोन कंपन्यांमध्ये चढाओढ सुरु आहे. प्रत्येक स्मार्टफोन कंपनी नवनविन फिचर्स मोबाईलमध्ये आणत आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्यात असेच पाच दमदार स्मार्टफोन लाँच करण्यास कंपन्या सज्ज झाल्या आहेत. या स्मार्टफोनमध्ये काही फ्लॅगशिप आहेत, तर काही चांगले फिचर्सयुक्त मध्यम-बजेट रेंजमधील फोन आहेत. सर्व स्मार्टफोन कंपन्या परवडणाऱ्या किंमतीत अधिक वैशिष्ट्यपूर्ण स्मार्टफोन लाँन्च करण्याच्या प्रयत्नात आहेत. या यादीमध्ये शाओमी, रिअल मी आणि सॅमसंग सारख्या ब्रँड्सचा समावेश आहे. तर फ्लॅगशिप यादीमध्ये वनप्लस, ओप्पो, सॅमसंग आणि आता रिअल मी सहभागी होत आहे. आज आम्ही अशा 5 टॉप्स स्मार्टफोन्सबाबत तुम्हाला माहिती देणार आहोत जे लवकरच बाजारात लाँच होत आहेत. (The five smartphones will be launched in February-March)

1. हुवावे मेट X2

हा फोन 22 फेब्रुवारी रोजी लाँच केला जाऊ शकतो. हुवावे मेट X2 अँड्रॉईड 10 OS वर काम करेल आणि यात Kirin 9000 5nm चिपसेट असेल. हे एक फोल्डेबल डिव्हाईस असून यात दोन डिस्प्ले असतील. फोनमध्ये क्वाड रिअर कॅमेरा सेटअप देण्यात येईल, ज्यामध्ये आपल्याला 50 मेगापिक्सलचा प्राथमिक सेन्सर आणि 16 मेगापिक्सल, 12 मेगापिक्सल आणि 8 मेगापिक्सलचा दुय्यम सेन्सर मिळेल. फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 4400mAh बॅटरी बॅकअप आहे जे 66W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

2. शाओमी Mi 11 सीरीज

हा फोन फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये लॉन्च करण्याची शक्यता आहे. फोनमध्ये टॉप नॉच प्रोसेसर स्नॅपड्रॅगन 888 असेल, यात 12 जीबी का रॅम आणि 6.81 इंच डिस्प्ले आहे. फोनमध्ये 108 मेगापिक्सल के प्रायमरी सेंसरसह ट्रिपल रिअर कॅमरा सेटअप दिले आहे. फोनमध्ये 13 आणि 5 मेगापिक्सल सेंसरही देण्यात आले आहे. फोनमध्ये 4600mAh बॅटरी बॅकअप असेल, जी मी टर्बोचार्ज 55W आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करेल.

3. रिअल मी GT, रिअल मी 8 आणि नार्जो 30 सिरीज

रिअल मी जीटीबाबत अधिक माहिती उपलब्ध नाही. मात्र या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 888 मोबाईल प्रोसेसर असण्याची शक्यता आहे. फोनमध्ये 12 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज असेल. रिअल मी जीटी ला रिअल मी रेस म्हणून ओळखले जाते. या स्मार्टफोनचे 6.81 इंच OLED स्क्रिन असलेले प्रो व्हर्जनही लॉन्च होऊ शकते. फोनमध्ये 125W सुपरफास्ट चार्जिंगसह 5000mAh बॅटरी बॅकअप दिले आहे. फोनमध्ये ट्रिपल कॅमरा सिस्टम असून 64 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, 13 मेगापिक्सल सेकेंडरी लेन्स आणि 13 मेगापिक्सलचे लेन्स आहे. फोनमध्ये 12 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे.

4. वनप्लस 9 सीरीज

वनप्लस 9 सीरीज मार्चमध्ये लॉन्च केले जाऊ शकते. या फोनबाबत सर्व माहिती लिक झाली आहे. मात्र अद्याप या स्मार्टफोनच्या मेन फिचर्सबाबत कळले नाही. वनप्लस 9 लाईनअप फोनमध्ये वनप्लस 9, वनप्लस 9 SE आणि वनप्लस 9 प्रो अॅड केले जाऊ शकते. डिव्हाईसमध्ये 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज दिले आहे. फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह FHD+ आणि QHD+ डिस्प्ले ऑप्शन दिले आहेत.

5. सॅमसंग गॅलेक्सी A12

नोव्हेंबर 2020 मध्ये सॅमसंगने हा फोन को युरोपियन मार्केटमध्ये लॉन्च केले होते. आता लवकरच हा फोन भारतात लॉन्च जाऊ शकतो. हा फोन गॅलेक्सी A11 चे पुढचे व्हर्जन असेल. फोनमध्ये मीडियाटेक हिलियो P35 SoC चिपसेट दिले आहे. तसेच 6.5 इंच HD+ इंफिनिटी वी डिस्प्ले असून, फोन साईड माऊंटेड फिंगरप्रिंट स्कॅनरही फोनमध्ये आहे. फोनमध्ये 48 मेगापिक्सल प्रायमरी सेंसर, 5 मेगापिक्सल अल्ट्रा वाईड सेंसर आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर देण्यात आले आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सल सेल्फी कॅमरा आहे. यात 15W फास्ट चार्जिंगसह 5000mAh बॅटरी बॅकअप देण्यात आले आहे. (The five smartphones will be launched in February-March)

इतर बातम्या

स्टेट बँकेचा कोट्यवधी ग्राहकांना दिलासा, नव्या योजनेअंतर्गत घरबसल्या रोख रक्कम घरपोच मिळणार

Omkar Realtors Case | विजय माल्याचा बंगला विकत घेणारा अभिनेता सचिन जोशीला ईडीची अटक

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.