iPhone 16 ची संपली प्रतिक्षा! जोरदार फीचर्स, समोर आले ही माहिती

iPhone 16 | आयफोन 16 ची जगभर चर्चा सुरु झाली आहे. या स्मार्टफोनची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. आयफोन 15 नंतर नवीन एडिशनची प्रतिक्षा होती. Apple च्या या आगामी आयफोनची चर्चा रंगली आहे. त्याच्याविषयी काही माहिती लीक झाली आहे. काय आहेत फीचर्स , जाणून घ्या..

iPhone 16 ची संपली प्रतिक्षा! जोरदार फीचर्स, समोर आले ही माहिती
Apple iPhone 15, iPhone 15 आणि iPhone 15 Plus चे दोन मॉडेल भारतात बनवले गेले आहेत. अशा परिस्थितीत, अशी अपेक्षा आहे की जर आयफोन 15 चे हाय-एंड मॉडेल भारतात असेंबल केले गेले तर जागतिक स्तरावर आयफोन निर्यातीत भारताचा वाटा वाढू शकेल.
Follow us
| Updated on: Mar 09, 2024 | 3:56 PM

नवी दिल्ली | 9 March 2024 : iPhone ची क्रेझ तर जगभरात आहे. iPhone 16 लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनविषयीची माहिती लीक झाल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यानुसार, या स्मार्टफोनची सविस्तर माहिती समोर येत आहे. बाजारात Apple च्या आगामी आयफोन संबंधी वातावरण तयार होत आहे. त्यामुळे अनेकांना iPhone 15 सीरीजपेक्षा यामध्ये काय फरक असेल. हा नवीन आयफोन खरेदी करणे कितपत फायदेशीर ठरेल, अशी शंका त्यांच्या मनात आहे.

सध्याची iPhone सीरीज लोकप्रिय झाली आहे. पण iPhone 16 मध्ये नवीन डिझाईन दिसून येऊ शकते. याशिवाय कंपनीने नवीन फीचर्स पण जोडल्या जाऊ शकते. अर्थात लीक रिपोर्टच्या आधारे ज्या गोष्टी माहिती समोर आली आहे. कंपनीकडून अजून याविषयी अधिकृत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

काय आहे iPhone 16 चे वैशिष्ट्ये?

हे सुद्धा वाचा

लीक रिपोर्ट्सनुसार, iPhone 16 मध्ये A17 प्रोसेसर दिसू शकते. A17 Pro पेक्षा ते वेगळे असेल. त्याचा वापर iPhone 15 Pro मध्ये करण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या स्टँडर्ड मॉडलमध्ये 6.1-इंचचा डिस्प्ले असेल. स्क्रीन 120Hz रिफ्रेश रेट मदत करेल. या स्मार्टफोनमध्ये 3,561mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते. याशिवाय कंपनी 40W वायर्ड चार्जिंग आणि 20W ची MagSafe चार्जिंग देऊ शकते. अर्थात iPhone 15 सीरीजसाठी पण अशीच माहिती समोर आली होती. पण त्यानंतर आलेल्या स्मार्टफोनमध्ये मोठा बदल दिसला.

iPhone 15 वा iPhone 16

ॲप्पलच्या ताज्या दमाच्या फोनमध्ये टाईप-सी चार्जिंग पोर्टची सुविधा आहे. कंपनीने iPhone 15 सीरीजच्या फोनमधील तांत्रिक अडचण दूर केली आहे. iPhone 15 येऊन फार मोठा कालावधी लोटला नाही. अनेकजण या फोनसाठी उत्सुक आहेत. पण बजेटमुळे ते थांबले आहेत. अशातच नवीन iPhone 16 ची चर्चा रंगली आहे. त्यामुळे नवीन मॉडल जर बाजारात येत असेल तर iPhone 15 खरेदी करावा की iPhone 16 खरेदी करावा, अशी द्विधा होऊ शकते. अर्थात नवीन फोनची किंमत, फीचर आणि इतर माहिती समोर आल्यावरच तुम्हाला हा निर्णय घेणे योग्य ठरेल. फीचर्स, डिझाईनमध्ये जर मोठा बदल होत नसेल तर तुम्हाला निर्णय घेणे सोपे होईल.

Non Stop LIVE Update
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.