पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनेवर Apple फिदा; एक लाख कोटींचे फोन केले तयार

PM Narendra Modi Apple | iPhone तयार करणारी कंपनी Apple ला ही योजना चांगलीच पसंत पडली. या योजनेतंर्गत कंपनीने भारतात एकाच वर्षात 1 लाख कोटी फोन तयार केले. ॲप्पलने वर्ष 2023 मध्ये हा विक्रम केला. डिसेंबर ते जानेवारीपर्यंत 65 हजार कोटी रुपयांचे आयफोन निर्यात करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनेवर Apple फिदा; एक लाख कोटींचे फोन केले तयार
Follow us
| Updated on: Jan 09, 2024 | 2:55 PM

नवी दिल्ली | 9 जानेवारी 2024 : Apple ने भारतात एक नवीन विक्रम नावावर नोंदवला आहे. भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या PLI स्कीमचा कंपनीने फायदा घेतला. या योजनेतंर्गत PLI स्कीममध्ये ॲप्पलने देशात 1 लाख कोटी रुपयांचे फोन तयार केले. हा एक विक्रम आहे. याविषयीची माहिती एका अधिकाऱ्याने ET ला दिली आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार कंपनीने गेल्या वर्षात, 2023 मध्ये जवळपास 1 लाख कोटी रुपयांच्या आयफोनची निर्मिती केली. यामधील 65 हजार कोटी रुपयांचे आयफोन डिसेंबर ते जानेवारीदरम्यान निर्यात करण्यात आले.

PM मोदी यांच्या या योजनेचा फायदा

देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी केंद्र सरकार पीएलआय योजना घेऊन आली आहे. PLI स्कीममुळे स्मार्टफोन कंपनीने, पुरवठादार कंपन्यांना देशातच स्थलांतरीत केले. यामध्ये तायवानची दिग्गज कंपनी फॉक्सकॉन, विस्ट्रॉन आणि पेगाट्रॉन यांचा समावेश आहे. Apple ने या योजनेचा फायदा घेतला. एकाच वर्षात त्याचा कंपनीला मोठा फायदा झाला.

हे सुद्धा वाचा

उद्दिष्टांपेक्षा अधिक उत्पादन

आयफोनने पीएलआय योजनेतंर्गत जे उद्दिष्ट निर्धारीत केले होते. त्यापेक्षा अधिकच्या मोबाईलचे उत्पादन केले आहे. अर्थात या उत्पादनाची गोळाबेरीज त्यातनंतर जोडण्यात येणारे कर आणि इतर शुल्काआधारीत निश्चित होते. पण कंपनीच्या उत्पादन आकड्यांनुसार, कंपनीने उद्दिष्टापेक्षा अधिकची मोबाईल निर्मिती केली आहे.

चीनला दिली धोबीपछाड

चीनमध्ये Apple च्या पुरवठादार कंपन्याचे नेटवर्क होते. या कंपन्यांची श्रृखंला खंडीत करण्यात भारताला यश आले. ॲप्पल कंपनीने भारतात येताना तिच्या पुरवठादार कंपन्या पण सोबत आणल्या. आता ॲप्पल भारतातील विस्तारीकरणाच्या प्रक्रियेला गती देत आहे. ही गती मिळताच, उत्पादन वाढेल आणि एफओबी मूल्य वाढेल. त्यामुळे भारत जागतिक बाजारात अग्रेसर होईल. चीनला धोबीपछाड मिळेल.

सॅमसंग पिछाडीवर

मूल्यानुसार iPhone ही सध्या भारतातील सर्वात मोठी मोबाईल निर्माता कंपनी आहे. काऊंटरपॉईंटनुसार भारतात कंपनीचे हिस्सेदारी आर्थिक वर्ष 2018 मध्ये 2% होती. आर्थिक वर्ष 2023 मध्ये ती वाढून 6% वर पोहचली. तर सॅमसंगची हिस्सेदारी गेल्या पाच वर्षांत 26% हून 20% पर्यंत घटली.

ॲप्पलला व्यापारात मोठा फायदा

Apple ला भारतीय व्यवसायात फायदा झाला. हा व्यवसाय 13,097 कोटी रुपयांहून वाढून 49,322 कोटी रुपयांवर पोहचला. तर सॅमसंगचा मोबाईल व्यवसाय वाढला. कंपनीचा महसूल 37,349 कोटी रुपयांहून 70,292 कोटी रुपयांवर पोहचला. ॲप्पल सध्या पुरवठादारांची चेन तयार करण्यात गुंतलेली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.