iPhone 16 | आयफोन 16 मध्ये दिसेल मोठा बदल, या खास फीचर्सचा दे धक्का
iPhone 16 | iPhone 16 आणि iPhone 16 Pro संबंधी मोठी अपडेट समोर आली आहे. iPhone 15 नुकताच बाजारात आला आहे. या फोनचे वैशिष्ट्ये म्हणजे हा फोन भारतात तयार करण्यात आला. त्यातील नेव्हिगेशन सिस्टिम भारतीय आहे. काही आयफोनमध्ये बगमुळे ओव्हरहिटिंगची समस्या आहे. पण ती लवकरच दूर करण्याचे आश्वासन कंपनीने दिले आहे.
नवी दिल्ली | 25 ऑक्टोबर 2023 : iPhone 15 ची अजूनही जोरदार चर्चा रंगली आहे. तेवढ्यात आता iPhone 16 ची पण चर्चा रंगली आहे. iPhone 15 ग्राहकांच्या पसंतीला उतरला आहे. आता सर्वांचेच लक्ष iPhone 16 कडे लागले आहे. त्याचे डिझाईन कसे असेल. त्यात कोणते अपडेट असेल, डिझाईन कसेल असेल, त्याची किंमत किती असेल याची इत्यंभूत माहिती युझर्सला हवी आहे. MacRumors च्या रिपोर्टनुसार, यावेळी iPhone 16 च्या डिझाईनमध्ये खास बदल दिसतील. iPhone 16 आणि iPhone 16 Pro मध्ये युझर्ससाठी ‘Capture Button’ दिले जाऊ शकते. त्यावर सध्या काम सुरु आहे. नवीन iPhone 16 मध्ये काय बदल असतील?
कुठे असेल Capture Button?
Apple काही दिवसांपासून iPhone 16 वर काम करत आहे. लेटेस्ट लीकनुसार, iPhone 16 मालिकेत Capture Button जोडल्या जाऊ शकते. पॉवर बटणजवळच हे कॅप्चर बॅटण असेल. पण याविषयीची माहिती समोर आलेली नाही. अर्थात त्या बटणाचा उपयोग कशासाठी असेल हे पण समोर आलेले नाही. mmWave कटआउटला डिव्हाईसच्या दुसरीकडे व्हॅल्यूम बटणाच्या खाली शिफ्ट करण्यात येईल. सध्या हे बटण 5G एंटीना म्हणून काम करत आहे.
काय आहे Capture Button?
अजून याविषयीची संपूर्ण माहिती समोर आली नाही. पण हे बटण फोटो क्लिक करण्यासाठी उपयोगी पडू शकते. Capture Button फिजिकल शटर बटण प्रमाणेच काम करेल. त्यामुळे iPhone 16 चा कॅमेरा कंट्रोल करता येईल. हा कॅमेरा शॉर्टकट सारखा काम करेल.
हे असेल सरप्राईज
Macrumors च्या रिपोर्टनुसार, iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max मध्ये कंपनी मोठा डिस्प्ले देऊ शकते. प्रोमध्ये 6.3 इंचचा डिस्प्ले असेल तर प्रो मॅक्समध्ये 6.9 इंचचा असेल. iPhone 16 Pro मॉडेलमध्ये टॉलर अस्पेक्ट रेटिओ 19.6.9 जोडल्या जाईल. सध्या हा रेटिओ 19.5:9 आहे. तर प्रो मॅक्स मॉडल्समध्ये ते यापेक्षा अधिक असेल.
iPhone 16 मध्ये काय असेल खास
टेक्नोलॉजी एनालिस्ट Jeff Pu ने याविषयीचा एक अहवाल दिला आहे. त्यानुसार, iPhone 16 आणि iPhone 16 Pro या दोन्ही फोनमध्ये Snapdragon X75 मॉडम असेल. MacRumors च्या रिपोर्टनुसार, या स्मार्टफोन्समध्ये गतिमान आणि ऊर्जा बचतीचे 5G एडवांस नेटवर्क आहे. रिपोर्टनुसार iPhone 16 आणि iPhone 16 Pro में X70 Modem जोडल्या जाईल.