Realme Narzo 70 Pro 5G, तुमच्या हाताच्या इशाऱ्यावर अशी करेल करामत

Realme Narzo 70 Pro 5G | हा स्मार्टफोन सध्या एकदम चर्चेत आला आहे. यामधील फीचर्सची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. रियलमी एक जोरदार फोन आहे. या फोनमध्ये एक खास फीचर आहे. त्याच्या मदतीने तुम्ही फोनला हात न लावता केवळ इशाऱ्याने त्यावर नियंत्रण मिळवू शकता.

Realme Narzo 70 Pro 5G, तुमच्या हाताच्या इशाऱ्यावर अशी करेल करामत
Follow us
| Updated on: Mar 20, 2024 | 5:14 PM

नवी दिल्ली | 20 March 2024 : Realme ने त्याचा मिड-रेंज स्मार्टफोन Realme Narzo 70 Pro 5G भारतीय बाजारात उतरवला आहे. या स्मार्टफोनची लाँचिंगपूर्वीच खूप चर्चा रंगली आहे. या कंपनीने भुतकाळापासून बोध घेतल्याची बाजारात चर्चा आहे. या फोनमध्ये आता इनबिल्ट ॲपची संख्या एकदम रोडवली आहे. ब्लोटवेअर ॲप्स इन्स्टॉल असतील. पण त्यांचे प्रमाण अगदी 65 टक्क्यांवर आले आहे. त्यामुळे ग्राहकांना हेरगिरी करणाऱ्या चीनचा ॲप्सची भीती कमी झाली आहे. या फोनमध्ये अजून एक खास फीचर आहे. त्याच्या सहाय्याने तुम्ही फोनला हात न लावता केवळ इशाऱ्याने त्यावर नियंत्रण मिळवू शकता. त्याची पण बाजारात मोठी चर्चा सुरु आहे. हा फोन ग्राहकांना Amazon वर पण सहज मिळू शकतो.

Realme Narzo 70 Pro 5G Specifications

  1. या स्मार्टफोनमध्ये क्रिएटिव्ह एअर जेस्चर कंट्रोल देण्यात आले आहे. त्याच्या मदतीने ग्राहकांना फोनला हात न लावता हाथाच्या हालचालीवरुन स्क्रीनवर कंट्रोल करता येईल.
  2. रिअलमी नार्जो 70 प्रो 5जी स्मार्टफोन मध्ये 2000 निट्सचा पीक ब्राईटनेस आणि रेनवॉटर स्मार्ट टच सपोर्ट मिळेल.
  3. हे सुद्धा वाचा
  4. दमदार कामगिरीसाठी या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 7050 5जी प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 8 जीबी रॅम देण्यात आली आहे. पण अजून 8 जीबी व्हर्चुअल रॅमचा सपोर्ट देण्यात आला आहे. या फोनमध्ये 256 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे.
  5. या स्मार्टफोनमध्ये 67 वॉट सुपरवूक फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. 5000 एमएएचची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. Sony IMX890 कॅमरा सेन्सर फोनची फोटो, व्हिडिओचा दर्जा टिकवून ठेवेल.

Realme Narzo 70 Pro 5G Price in India

  • Realme Narzo 70 Pro 5G या स्मार्टफोनची टक्कर Redmi Note 13, iQOO Z9 5G, Poco X6 Neo आणि Nothing Phone 2a या स्मार्टफोनशी होईल. बाजारात कमी किंमतीत जास्त फीचर्स देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
  • हा स्मार्टफोन मंगळवारी भारतीय बाजारात आल्यापासून या स्मार्टफोनच्या किंमतीविषयी ग्राहकांमध्ये उत्सुकता आहे. रिपोर्टनुसार, या स्मार्टफोनची किंमत 18,999 रुपयांपासून सुरु होत आहे. कॅमेरा, स्टोरेज आणि फीचर्सप्रमाणे किंमतीत बदल दिसून येईल.
Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.