Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आली जगातील पहिली उडणारी रेसिंग कार, 360 किमीच्या वेगाने पोहचता येणार

ही कार जगातील सर्वात वेगवान इलेक्ट्रीक व्हर्टीकल टेकऑफ आणि लॅंडींग मॉडेल आहे. यामुळे वाहतूकीच्या सर्व संकल्पनाच बदलणार आहेत.

आली जगातील पहिली उडणारी रेसिंग कार, 360 किमीच्या वेगाने पोहचता येणार
AIRSPEEDERCARImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Feb 22, 2023 | 3:28 PM

नवी दिल्ली : तुम्ही उडणारी टॅक्सी किंवा बाईक पाहिली असेल, परंतू आता उडणाऱ्या रेसिंग कारचा तुम्ही कधी विचार केला आहे का..वाऱ्याच्या वेगाने उडणाऱ्या या कारचा वेग भन्नाट आहे. जगातील हवेत उडणारी रेसिंग कार खरोखरच आली आहे. ही दरताशी 360  किमीच्या वेगाने उडू शकणार आहे. या उडत्या रेसिंगकारने वाहतूकीची सारी समीकरणेच बदलणार आहेत. या काराला तुम्ही काही दिवसांनी हवेत उडताना पाहू शकणार आहे. चला पाहूया स्पेशल फ्लाईंग रेसिंग कारबद्दल काय आली आहे माहिती …

ऑस्ट्रेलियाच्या एका कंपनीने उडणाऱ्या रेसिंग कारचे नुकतेच अनावरण केले आहे. अशा प्रकारची ही पहीलीच कार मानली जात आहे. ऑस्ट्रेलियातील एका कंपनीने जगातील पहिली उडणारी रेसिंग कार तयार केली आहे. या कारचे अनावरण नुकतेच या कंपनीने केले आहे. अशाप्रकारची ही पहिलीच कार आहे. एडलेट मधील अलाऊडा एरोनॉटीक्सने एअरस्पीड एमके-4 चे अनावरण केले आहे. त्यांचा दावा आहे की हे जगातील सर्वात वेगवान इलेक्ट्रीक व्हर्टीकल टेकऑफ आणि लॅंडींग मॉडेल आहे. ज्याचा कमाल वेग ताशी 360  किमी आहे. हे उडणाऱ्या रेस कारचे हे पहिले क्रिव वर्जन देखील आहे. हे मॉडेल एआय गिंबल थ्रस्ट टेक्नोलॉजीसोबत आणण्यात आले आहे. ज्यामुळे फॉर्म्यूला – 1 रेसिंग कारसारखी ताकद या मॉडेला मिळते असे कंपनीने म्हटले आहे.

एअरस्पीडर एमके-4 ची खासियत…

उडणाऱ्या रेस कार एअरस्पीडर एमके-4 ला ऑस्ट्रेलियाच्या एडलेटमध्ये डिझाईन केले आहे. याला हायड्रोजन टर्बोजेटरद्वारे पॉवर प्राप्त होते. ज्यामुळे 1,340  बीएचबी इतकी जबरदस्त पॉवर जनरेट केली जाते. ही कार केवळ तीस सेंकदात दर ताशी 360 किमीचा टॉप स्पीड पकडण्यासाठी सक्षम आहे. एअरस्पीडर एके – 4 जवळपास तीनशे किमीपर्यंत उडू शकते. अलाउडा एरोनॉटिक्सचे सीईओ मॅट पियर्सन यांनी आम्ही आणि आमच्या सोबत जग एका नव्या प्रवासासाठी सज्ज झाल्याचे म्हटले आहे. आम्ही वाहनांचे मॅन्यूफॅक्चरींग आणि डेव्हलपिंग केले आहे. आता जग सर्वात प्रोग्रसिव्ह, इनोवेटीव्ह आणि एम्बिशियस ऑटोमोटीव्ह ब्रॅंडसाठी तयार राहण्याची वेळ आली आहे.

950 किलो वजनासह उडणार ….

एअरस्पीडर एमके-4 उडविण्यासाठी प्रशिक्षित पायलटची गरज लागणार आहे. ही एक सोफेस्टीकेटेड इलेक्ट्रीक प्रोपोलेशन सिस्टीम असून त्यात अॅडव्हान्स एअरोडायनामिकसह ती सुसज्ज आहे. ही कार सुमारे 950 किलोग्रॅम वजनासह टेक ऑफ करू शकते

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.