मुंबई : व्हॅलेंटाईन डे जवळ येत आहे, त्यामुळे आपल्या प्रिय व्यक्तीला चांगलं गिफ्ट देण्याचा खटाटोप सुरु आहे. काय गिफ्ट द्यावं असा प्रश्न अनेकांना पडला. काही जणांचं बजेट जरा जास्त आहे, तर काही जणांना आपल्या खिशाकडे पाहून गिफ्ट निवडावं लागत आहे. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्ती चांगला स्मार्टफोन गिफ्ट देऊ शकता. जर तुम्हीही तुमच्या प्रिय व्यक्तीला गिफ्ट देण्यासाठी स्मार्टफोनच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.यामुळे तुमचा व्हॅलेंटाईन डे एकदम व्यवस्थितरित्या पार पडेल. यासाठी आम्ही काही पर्याय देणार आहोत. त्यामुळे तुम्हाला योग्य आणि बजेट स्मार्टफोन निवडता येईल. तसेच गिफ्ट पाहिल्यानंतर प्रिय व्यक्ती एकदम खूश होईल. यामध्ये आयफोन 14 प्रो मॅक्स, सॅमसंग गॅलकसी एस 23 अल्ट्रा या महागड्या फोनपासून सॅमसंग गॅलकसी एफ23 आणि रेडमी नोट 12 या स्मार्टफोनचा समावेश आहे.
आयफोन 14 प्रो मॅक्स (iPhone 14 Pro Max) : अॅपल कंपनीचा आयफोन प्रो मॅक्स हा स्मार्टफोन गिफ्ट देणं सर्वांनाच परवडेल असं नाही. पण तुमचं बजेट असेल हा उत्तम पर्याय ठरेल. या स्मार्टफोन पाहता क्षणीत तुमची छाप पडेल. डायनामिक आयलँड नॉच स्क्रिनवर असून 6.7 इंचांची सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले आहे. हा स्मार्टफोन ए16 बायोनिक पेअर्ड असून 1टीबी स्टोरेज आहे. आयफोन 14 मॅक्समध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप असून प्रायमरी कॅमेरा 48 एमपी इतका आहे.
सॅमसंग गॅलक्सी एस22 अल्ट्रा (Samsung Galaxy S22 Ultra): सॅमसंग गॅलक्सी एस22 अल्ट्रा हा स्मार्टफोनही जबरदस्त आहे.या स्मार्टफोनमधील कॅमेरा सेटअपने प्रिय व्यक्तीचं मन नक्कीच जिंकेल. या स्मार्टफोनमध्ये 8के रेकॉर्डिंग होते.स्मार्टफोनमधील ही सर्वात उच्च दर्जाची व्हिडीओ रेकॉर्डिंग आहे. त्याचबरोबर यामध्ये असलेलं पेन फीचर्स सर्वाधिक लोकप्रिय आहे. या माध्यमातून डुडल, फोटो किंवा व्हिडीओ एडिट करता येतात.
नथिंग फोन 1 (Nothing Phone 1): हा स्मार्टफोनदेखील उत्तम गिफ्ट ठरेल. या स्मार्टफोनमधये 6.55 इंचांची फुल एचडी प्लस ओएईडी डिस्प्ले आहे. त्याचबरोबर गोरिला ग्लासने प्रोटेक्टेड आहे. तसेच मिड रेंड चिपसेट 6एनएम क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778जी+ आमि 4500एमएएच बॅटरी सेटअप आहे.फोटोग्राफीसाठी ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. यात 50 एमपी सोनी आयएमएक्स766 प्रायमरी लेन्स आहे. तसेच 50 एमपी सॅमसंग जेएन1 सॅमसंग अल्ट्रा वाईड लेन्स आहे.
रियलमी 10 प्रो प्लस 5जी (Realme 10 Pro Plus 5G): रियलमी 10 प्रो प्लस 5जी आणखी एक जबरदस्त स्मार्टफोन आहे. कर्व्ह्ड 6.7इंच एफएचडी+ अमोलेड डिस्प्ले,मीडियाटेक डायमेन्सिटी 1080 चिपसेट, 108 एमपी प्रायमरी सेन्सर पेअर्ड, 8एमपी अल्ट्रावाईड लेन्स आणि 2 एमपी मॅक्रो लेन्स आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000 एमएएचची बॅटरी असून 67वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
सॅमसंग गॅलक्सी एफ23 (Samsung Galaxy F23): हा सुद्धा एक बेस्ट गिफ्ट पर्याय ठरू शकतो. या स्मार्टफोनमध्ये 5जी सुविधा असून 20 हजाराच्या रेंजमधील फोन आहे.या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 750 जी प्रोसेसर असून 6जीबी रॅम आहे. तसेच फोटोग्राफीसाठी ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. तसेच 5000एमएएच बॅटरी आहे.
आयक्यू झेड6 लाइट (iQOO Z6 Lite): आयक्यू झेड 6 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 5 जी चिपसेट आहे. तसेच 6 जीबी रॅम आणि स्टोरेज 128 जीबीपर्यंत आहे. यामध्ये 6.58 फुल एचडी प्लस 120 एचझेड डिस्प्ले आह. या स्मार्टफोनमध्येही ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. तसचे 5000 एमएएच बॅटरी असून 18 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते.