व्हाट्‌सॲपमध्ये ‘हे’ तीन फीचर्स नव्याने होणार दाखल, युजर्सना असा मिळेल फायदा

इमोजी रिॲक्शनसोबत व्हाट्‌सॲप युजर्स मॅसेजिंग ॲपवर आता 2 जीबीपर्यंतची फाइल ट्रांन्सफर करु शकतात. यासह आता व्हाट्‌सॲप ग्रुपमध्ये 512 सदस्यांना ॲड करु शकणार आहेत.

व्हाट्‌सॲपमध्ये ‘हे’ तीन फीचर्स नव्याने होणार दाखल, युजर्सना असा मिळेल फायदा
प्रातिनिधीक फोटोImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 07, 2022 | 11:04 AM

संदेश वहनासाठी सध्या भारतात मोठ्या प्रमाणात व्हाट्‌सॲपचा (whatsapp) वापर होत आहे. मॅसेजिंग एक्सपीरियंसला अधिक चांगले बनविण्यासाठी कंपनीकडून काही नवीन फीचर्स वाढविण्यात आले आहे. या आधी आय मॅसेज (iMessage) सारखे इमोजी रिॲक्शन  करताना पाहिले गेले होते. परंतु व्हाट्‌सॲपने या फीचरला ऑफिशियल केले आहे. ज्या माध्यमातून युजर्स आता मॅसेजवर इमोजीच्या माध्यमातून रिॲक्ट करु शकणार आहेत. नवीन रिॲक्शनसोबत व्हाट्‌सॲप युजर्स मॅसेजिंग ॲपवर 2 जीबीपर्यंतची फाइल ट्रांन्सफर करु शकणार आहे. याशिवाय व्हाट्‌सॲप युजर्सना व्हाट्‌सॲप ग्रुपमध्ये 512 सदस्यांना (group members) ॲड करण्याची सुविधादेखील उपलब्ध होणार आहे. दरम्यान, मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी सर्वात आधी याबाबत फेसबूक अकाउंटवर घोषणा केली होती, की व्हाट्‌सॲपवर इमोजी रिॲक्शन युजर्ससाठी रोल आउट करण्यात येणार आहे.

इमोजी रिॲक्शन फीचर

इमोजी रिॲक्शन फीचर व्हाट्‌सॲपच्या कॉम्पिटिटल सिग्नल, टेलीकॉम, iMessage वर उपलब्ध होते. दुसरे मेटाच्या मालकिच्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर देखील इमोजी रिॲक्शन फीचर आहेत. व्हाट्‌सॲपच्या या फीचरवर सर्वाधिक वेळ काम करु शकतो. या वेळी बीटा टेस्ट दरम्यान टेस्टर्सने ॲपवर या फीचरला पाहिले आहे. व्हाट्‌सअपच्या दाव्यानुसार ही मॅसेजिंग ॲप सुविधा लेटेस्ट व्हर्जनवर आधारीत असेल.

2GB पर्यंत फाइल ट्रांन्सफर

व्हाट्‌सॲपने ॲपमध्ये एका वेळेत 2GB पर्यंत फाइल ट्रांन्सफर करण्याची सुविधा सुरु केली आहे. या फाइल्समध्ये एंड टू एंड अन्क्रिप्शन होणार आहे. मागील सेटअपमध्ये युजर्सना एका वेळी केवळ 100 एमबी ट्रांन्सफर करण्याची मर्यादा होती. परंतु आता ही लिमिट वाढविण्यात आली आहे. त्यामुळे विविध व्हिडिओ आणि फाइल्स पाठविण्यासाठी युर्जसना आता कुठलीही समस्या येणार नसल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, व्हाट्‌सॲप या फाइल्सना पाठविताना वायफाय वापरण्याचा सल्ला देते.

सदस्य मर्यादेत वाढ

व्हाट्‌सॲप ग्रुपच्या सदस्य संख्येतही वाढ करण्यात आली आहे. आता युजर्स एका ग्रुपमध्ये 512 लोकांना सहभागी करु शकणार आहेत. सध्या एका ग्रुपमध्ये केवळ 256 लोकांना समाविष्ठ करण्याची मर्यादा आहे. असे असले तरी ही सुविधा लगेच देण्यात येणार नसल्याचे व्हाट्‌सॲपकडून सांगण्यात आले आहे. अशा काही नवीन फीचर्सना व्हाट्‌सॲप हळूहळू रोलआउट करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.