Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चोरीचा iPhone आता वापरुन तर दाखवा! Apple आणणार हे खास फीचर

iPhone Feature | आयफोन चोरी गेला तर चोराला पकडणार तरी कसे नाही? पण ॲपल कंपनीने त्यावर एक जालीम उपाय शोधला आहे. कंपनीने एक फीचर विकसीत केले आहे. Stolen Device Protection असे त्याचे नाव आहे. काय आहे हे फीचर, त्याचा कसा वापर होणार, कसा फायदा होणार, हे जाणून घेऊयात..

चोरीचा iPhone आता वापरुन तर दाखवा! Apple आणणार हे खास फीचर
Follow us
| Updated on: Dec 14, 2023 | 10:08 AM

नवी दिल्ली | 14 डिसेंबर 2023 : ॲपल कंपनीच्या iPhone ची लोकप्रियता सध्या शिखरावर आहे. भारतात या स्मार्टफोनचे उत्पादन सुरु झाले आहे. सातत्याने नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर, ग्राहकपयोगी बदल, नवनवीन फीचर, जबरदस्त लूक यामुळे आयफोनची तरुणाईत खासा क्रेझ आहे. त्याची किंमत पण जास्त आहे. हा महागडा फोन खिशाचाच नाही तर त्या व्यक्तीचा रुबाब वाढवतो, हा समज रुढ झाला आहे. अनेक जण कर्ज काढून पण हा स्मार्टफोन खरेदी करतात. आयफोन चोरीच्या घटना घडल्या आहेत. या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी iPhone मध्ये एक दमदार फीचर जोडण्यात येणार आहे. Stolen Device Protection असे त्याचे नाव आहे. काय आहे या फीचरमध्ये खास?

iOS चे नवीन व्हर्जन

Apple कंपनी आयफोन युझर्ससाठी लवकरच iOS चे नवीन व्हर्जन घेऊन येत आहे. यामध्ये Stolen Device Protection ही सुविधा देण्यात येईल. ही सुरक्षेची दुसरी पायरी असेल. त्यामुळे आयफोन चोरीला गेला तरी, तरी त्याचा तो वापर करु शकणार नाही. कारण त्याला अनलॉक करणे सोपे नसेल. जर त्याने पासकोड माहिती करुन तो उघडला तरी त्याला फोनच्या डेटामध्ये बदल करता येणार नाही.

हे सुद्धा वाचा

आपोआप सक्रीय होईल हे फीचर

iPhone चोरी होण्यापासून वाचविण्यासाठी आणि आतील डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी अपकमिंग फीचर आपोआप ऑन होईल. हँडसेट नेहमीपेक्षा इतर कोणत्या पण लोकेशनवर पोहचला तर हे फीचर ऑटोमॅटिक ऑन होईल. त्यानंतर युझर्सला आयफोनचा वापर करण्यासाठी ते ऑथिंकेट करावे लागेल. त्यासाठी पासकोड आणि Face ID चा वापर करावा लागेल. Apple ID बदलवण्यासाठी Factory Reset करावा लागेल. त्यासाठी पासकोड आणि Face ID चा वापर आवश्यक आहे.

सुरक्षेचे फीचर महत्वाचे

नवीन लोकेशनवर फेस ऑथेंटिकेशन फेल झाल्यास, एक तासानंतर ही सुविधा मिळेल. त्यामुळे चोराला आयफोन चोरी केल्यानंतर पण त्याचा वापर करता येणार नाही. त्याने इतर कोणाला हा स्मार्टफोन विकाला तरी त्याला त्याचा वापर करता येणार नाही. चोर विना पासकोड या फोनचा डाटा एक्सेस करु शकणार नाही. पासकोड मिळाला तरी डाटा एक्सेस करणे त्याला शक्य होणार नाही. त्यासाठी फेस आयडी आवश्यक असेल. नवीन लोकेशनवर ही प्रक्रिया अधिक जटील असेल.

'हात पुढे कराल आणि भविष्यात..', योगेश कदम यांचा राज ठाकरेंना सल्ला
'हात पुढे कराल आणि भविष्यात..', योगेश कदम यांचा राज ठाकरेंना सल्ला.
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.