हिरो होंडाची ही बाईक देते 83 किमी बंपर मायलेज, किंमत 51,200 रुपयांपासून सुरु
हिरो होंडाची ही बाईक देते 83 किमी बंपर मायलेज, किंमत 51,200 रुपयांपासून सुरु (this bike from Hero Honda gives 83 kmpl bumper mileage)
मुंबई : जर तुम्हाला हिरोची बाईक खरेदी करायची असेल आणि तुमचे बजेट 60 हजार रुपयांपेक्षा कमी आहे, तर ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरु शकते. आज आम्ही तुम्हाला हिरो मोटोकॉर्पच्या सर्वात स्वस्त मोटरबाईकबाबत सांगणार आहोत. या बाईकमध्ये ग्राहकांना स्टायलिश लुक, उत्कृष्ट परफॉर्मन्ससह शानदार मायलेज मिळते. आम्ही बोलत आहोत हिरो एचएफ डिलक्स(Hero HF Deluxe)बद्दल. आम्ही तुम्हाला या बाईकच्या सर्व वैशिष्ट्यांबद्दल सांगणार आहोत. या व्यतिरिक्त बाईकच्या सर्व व्हेरिएन्टच्या किंमतींविषयी देखील माहिती देणार आहोत. (This bike from Hero Honda gives 83 km bumper mileage)
मायलेज
कंपनीच्या दाव्यानुसार ही बाईक प्रति लिटर 83 किलेमीटर मायलेज देते.
इंजिन
Hero HF Deluxe मध्ये पावरसोबत 97.2cc, एयर-कूल्ड, 4-स्ट्रोक सिंगल-सिलेंडर OHC इंजिन देण्यात आले आहेत.
परफॉर्मन्स
बाईकच्या परफॉर्मन्सबाबत बोलायचे झाले तर, Hero HF Deluxe चे इंजिन 8000 आरपीएमवर 8.24 bhp पावर आणि 5000 आरपीएमवर 8.05Nm टॉर्क देते.
ट्रान्समिशन
Hero HF Deluxe चे इंजिन 4-स्पीड गिअरबॉक्सपेक्षा कमी आहे.
सस्पेन्शन
Hero HF Deluxe च्या फ्रंटला टेलिस्कोपिक हाइड्रॉलिक शॉक अब्सॉर्बर देण्यात आले आहे. याच्या रियरमध्ये स्विंग आर्मसह 2-स्टेज अॅडजस्टेबल रियर सस्पेन्शन मिळते.
ब्रेक
Hero HF Deluxe मध्ये 130 मिलीमीटरचे फ्रन्ट ड्रम ब्रेक दिले आहे. यासोबतच याच्या रियरमध्ये 130 मिलीमीटरचे रियर ड्रम ब्रेक दिले आहे. सुरक्षेसाठी यात ग्राहकांना CBS फिचर मिळते.
डायमेन्शन
Hero HF Deluxe ची लांबी 1965 मिलीमीटर, रुंदी 720 मिलीमीटर आणि उंची 1045 मिलीमीटर आहे. याचे व्हीलबेस 1235 मिलीमीटर, ग्राउंड क्लियरेंस 165 मिलीमीटर आहे.
Hero HF Deluxe: व्हेरिएन्ट्सची किंमत
किक स्टार्ट ड्रम ब्रेक अलॉय व्हील- FI: 51,200 किक स्टार्ट ड्रम ब्रेक स्पोक व्हील- FI: 50,200 सेल्फ स्टार्ट ड्रम ब्रेक अलॉय व्हील- FI- i3s: 59,900 सेल्फ स्टार्ट ड्रम ब्रेक अलॉय व्हील- FI- ALL BLACK: 60,025 (This bike from Hero Honda gives 83 km bumper mileage)
Gupt Navratri 2021 | गुप्त नवरात्रीमध्ये पूर्ण होतील सर्व मनोकामना, पण चुकूनही करू नका ‘ही’ कामे! https://t.co/AMs7zPj0gc #GuptNavaratri | #Navratri
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 20, 2021
इतर बातम्या
Skoda च्या नव्या कारची पहिली झलक सादर, मेड इन इंडिया SUV 18 मार्चला बाजारात
लॉन्च होण्याआधीच लीक झाली Poco X3 Pro ची किंमत, वाचा काय आहे फीचर्स