फेसबुकवरील ‘हे’ फीचर लवकरच होणार बंद…काय आहे कारण ?

फेसबुक आपल्या प्लेटफॉर्मवर एक निअरबी फ्रेंडस्‌ फीचर देते, जे युजर्सला दुसर्या फेसबूक युजर्ससोबत आपले करंट लोकेशन दाखवत असते. परंतु आता 31 मेपासून हे फीचर बंद करण्यात येणार असल्याची माहिती फेसबुककडून देण्यात आलेली आहे.

फेसबुकवरील ‘हे’ फीचर लवकरच होणार बंद...काय आहे कारण ?
फेसबुकImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 07, 2022 | 12:44 PM

फेसबुक (Facebook) हे आता जगभरात लोकप्रिय ठरत असलेले तसेच सर्वाधिक वापरकर्ते असलेले सोशल मीडिया (Social media) माध्यम ठरत आहे. दिवसेंदिवस फेसबुकच्या युजर्समध्ये वाढ होताना दिसून येत आहे. आता फेसबुक आपल्या प्लेटफॉर्मवर एक निअरबी फ्रेंडस्‌ फीचर देते जे युजर्सला दुसर्या फेसबूक युजर्ससोबत आपले करंट लोकेशन दाखवत असते. परंतु आता 31 मेपासून हे फीचर बंद करण्यात येणार असल्याची माहिती फेसबूककडून देण्यात आलेली आहे. सोशल मीडिया प्लेटफॉर्मवर (Platform) युजर्सच्या एका रिपोर्टनुसार, मेटाच्या मालिकच्या असलेल्या कंपनीने युजर्सना निअर फ्रेंडस्‌ हे फीचर बंद करण्याचे आणि दुसरे लोकेशन बेस्ड फीचर्सची माहिती देण्याला सुरुवात केली आहे.

कंपनीने दिली याबाबत माहिती

दरम्यान, एक वेळा अनेबल झाल्यावर युजर्सला त्यांचे मित्र आपल्या करंट लोकेशनच्या जवळपासच्या लोकेशनमध्ये असण्याची सूचनाही देण्यात येणार आहे. निअर फ्रेंड्‌ससोबत फेसबुक वेदर अर्लट, लोकेशन हिस्ट्री आणि बॅकग्राउंड लोकेशनदेखील बंद करत आहे. ट्विटरवर टाकण्यात आलेल्या युजर्सच्या अनेक पोस्टनुसार, फेसबुकने आपल्या ॲपवर एक नोटीफिकेशनच्या माध्यमातून फ्रेंड्‌स निअरबी फीचरला बंद करण्याची घोषणा केली आहे. युजर्सला पाठविण्यात आलेल्या एका नोटिफिकेशनमध्ये कंपनीने सांगितलेय, की दुसर्या युजर्सचे लोकेशन सांगणारी ही सुविधा येत्या 31 मेपासून बंद करण्यात येणार आहे.

या देखील सुविधा होणार बंद

दरम्यान, हवामान अलर्ट, लोकेशन हिस्ट्री आणि बॅकग्राउंड लोकेशनसह दुसरे लोकेशन बेस्ड फीचर्स देखील आता बंद करण्यात येणार आहे. कंपनीने युजर्सला लोकेशन हिस्ट्रीसोबत आपला डेटा डाउनलोड करण्यासाठी या वर्षी 1 ऑगस्टपर्यंत वेळ दिला आहे. ज्यानंतर याला हटविण्यात येणार आहे. फेसबुकने 2014 मध्ये आईओएस आणि अँड्रोइड दोन्हींवर निअर फ्रेंड्‌स फीचर रोल करण्याला सुरुवात केली होती. ऑप्शनल फीचरव्दारे आपले कुठले मित्र जवळपास आहेत, याची माहिती मिळते. एक वेळा जर तुम्ही निअर फ्रेंडस फीचर अनेबल केले तर तुम्हाला कधी कधी फ्रेंडसच्या जवळपास असण्यावर नोटिफाई केले जाईल, जेणेकरुन तुम्ही त्यांना संपर्क करु शकणार आहात. दरम्यान, या बदलांबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. केवळ विविध माहितीच्या आधारावर हे बदल केले जाणार असल्याची चर्चा आहे.

हे सुद्धा वाचा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.