व्हॉट्सअॅपचे हे नवे फिचर एका क्लिकवर शोधून देईल न वाचलेले मेसेज

मेटा या लोकप्रिय अॅपचा वापर केवळ वैयक्तिकच नव्हे तर व्यावसायिक कामांसाठीही केला जातो. जर तुमचेही व्हॉट्सअॅपवर ऑफिस ग्रुप्स असतील तर ही माहिती तुमच्यासाठी आणखी महत्त्वाची आहे.

व्हॉट्सअॅपचे हे नवे फिचर एका क्लिकवर शोधून देईल न वाचलेले मेसेज
Whatsapp FeatureImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Dec 18, 2023 | 9:58 PM

नवी दिल्ली | 18 डिसेंबर 2023 : व्हॉट्सअॅपचा वापर केवळ भारतातच नाही तर जगभरातील 180 हून अधिक देशांमध्ये केला जातो. मेटाचे हे चॅटिंग अॅप कॉलिंग आणि फाइल शेअरिंगसाठीही वापरले जाते. या लोकप्रिय अॅपचा वापर केवळ वैयक्तिकच नव्हे तर व्यावसायिक कामांसाठीही केला जातो. खरं तर, बहुतेक लोक व्हॉट्सअॅप वापरतात. या अॅपवर अनेक फीचर्स उपलब्ध आहेत. पण, व्हॉट्सअॅपवर होणाऱ्या मेसेजच्या माऱ्यामुळे काही अति महत्वाचे मेसेज पहायचे राहून जाते. अशा परिस्थितीत हे फिचर खूप उपयुक्त आहे. जर तुमचा व्हॉट्सअॅपवर ऑफिसचा ग्रुप असेल आणि त्यावरील महत्वाचा मेसेज पहायचं असेल तर तुमच्यासाठी ही माहिती आणखी महत्त्वाची आहे.

व्हॉट्सअॅपवर लांबलचक चॅट लिस्ट तपासण्याची पद्धत आता जुनी झाली आहे. व्हॉट्सअॅपमध्ये असे एक नवे फिचर आले आहे जे एका क्लिकवर तुम्हाला नवीन मेसेज शोधून देईल. ही सोपी युक्ती आता तुम्हाला उपयोगी पडेल.

WhatsApp चे न वाचलेले मेसेज कसे तपासायचे

वास्तविक बहुतेक लोक व्हॉट्सअॅप वापरतात. विश्वसनीय म्हणून या अॅपवर अनेक जण विश्वास ठेवतात. दिवसभरात व्हॉट्सअॅपवर हजारो मेसेज येत असतात. अशा स्थितीत अनेक वेळा महत्त्वाच्या कामाचा संदेश लांबलचक चॅट लिस्टमध्ये खाली कुठे तरी शिफ्ट होतो. प्रत्येक वेळी नवीन संदेश आल्यावर लांबलचक चॅट लिस्ट स्क्रोल करावी लागते. परंतु, आता असे काही करण्याची गरज नाही अशा वेळी एक छोटीशी युक्ती तुमचे काम सोपे करू शकते.

एका क्लिकवर WhatsApp चे न वाचलेले मेसेज तपासा

व्हॉट्सअॅप वापरकर्त्याचा वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी न वाचलेले संदेश वेगळ्या श्रेणीमध्ये वाचण्याची सुविधा व्हॉट्सअॅपवर उपलब्ध आहे. हो! WhatsApp वर न वाचलेल्या श्रेणीसह न वाचलेले सर्व मेसेज एकाच वेळी पाहता येतात.

व्हॉट्सअॅपचे न वाचलेले मेसेज तपासण्यासाठी, तुम्हाला प्रथम अॅप ओपन करावे लागेल. होम पेजवरील वरच्या उजव्या कोपऱ्यात सर्च आयकॉन दिसेल. त्यावर तुम्हाला टॅप करावे लागेल. सर्च आयकॉनवर क्लिक करताच स्क्रीनवर Unread, photos, videos, links, gifs, audio, document असे पर्याय दिसतील.

यातील Unread पर्यायावर तुम्हाला क्लिक करावे लागेल. या पर्यायावर क्लिक करताच चॅट लिस्ट उघडेल आणि चॅट लिस्टमध्ये न वाचलेले मेसेज एकत्र पाहता येतील. हीच पद्धत फोटो, व्हिडीओ, महत्वाचे document यासाठी तुम्हाला वापरता येईल. समजा तुम्हाला कुणी तरी पाठवलेले जुने परंतु महत्वाचे document शोधायचे आहे. अशावेळी तुम्ही document यावर क्लिक केले तर व्हॉट्सअॅपवर आलेली सर्व document तुम्हाला एकत्र दिसतील. यासाठी व्यक्तीचे नाव किंवा ग्रुपमधील सर्व चॅट तपासण्याची गरज नाही.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.