तब्बल तीन रिअर कॅमेरे, ओप्पोचा नवा फोन 4 तारखेला भारतात
मुंबई : ओप्पो भारतात आर सीरिजचा पहिला स्मार्टफोन लाँच करत आहे. येत्या 4 डिसेंबरला कंपनी मुंबईतील एका कार्यक्रमात आर17 फोन लाँच करणार आहे. ओप्पोच्या आर17 प्रो स्मार्टफोनमध्ये तीन कॅमेराचा सेटअप दिला आहे. कंपनीने या मोबाईलचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित केला आहे. वॉटरड्रॉप डिस्प्ले नॉच आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरची सुविधा फोनमध्ये दिली आहे. याशिवाय फोनमध्ये जलद […]
मुंबई : ओप्पो भारतात आर सीरिजचा पहिला स्मार्टफोन लाँच करत आहे. येत्या 4 डिसेंबरला कंपनी मुंबईतील एका कार्यक्रमात आर17 फोन लाँच करणार आहे. ओप्पोच्या आर17 प्रो स्मार्टफोनमध्ये तीन कॅमेराचा सेटअप दिला आहे. कंपनीने या मोबाईलचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित केला आहे. वॉटरड्रॉप डिस्प्ले नॉच आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरची सुविधा फोनमध्ये दिली आहे. याशिवाय फोनमध्ये जलद चार्जिंगची सुविधाही आहे. ओप्पो आर17 प्रो फोन चीनमध्ये 4,299 चीनी युआन (अंदाजे 44.000 रुपये) रुपयामध्ये लाँच केला आहे.
The revolution of power has begun. Introducing #SuperVOOCFlashCharge. #OPPOR17Pro Know more: https://t.co/7EotpkHAuR pic.twitter.com/Uw1FAyziV7
— OPPO Mobile India (@oppomobileindia) November 25, 2018
SuperVOOC फ्लॅश सेलमध्ये ओप्पो आर17 प्रोवर दमदार अशी सूट देण्यात आली आहे. फ्लॅश सेलच्या सुरुवातीच्या 10 मिनिटामध्ये जर तुम्ही हा फोन खरेदी केला तर तुम्हाला फक्त 40 टक्के किंमत मोजावी लागेल, असा दावा कंपनीने केला आहे.
Oppo R17 Pro: स्पेसिफिकेशन्स
- 6.4 इंच आकाराचा एमोलेड डिस्प्ले (वॉटरड्रॉप स्टाइल नॉच लेस)
- ऑक्टा-कोअर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 प्रोसेसर
- 8 जीबी रॅम, इनबिल्ट स्टोरेज 128 जीबी
Oppo R17 Pro फीचर्स
- ड्युअल कॅमेरा
- रिअर कॅमेरा 12+20 मेगापिक्सल
- फ्रंट सेल्फी कॅमेरा 25 मेगापिक्सल
- अॅंड्रॉईड 8.1 ओरियो ओएस सिस्टम
- बॅटरी क्षमता 4000mAh
- 4G विओएलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ, यूएसबी टाइप-सी, एनएफसी आणि जीपीएस