कर चुकवल्याच्या आरोपावरुन टिकटॉकची मूळ कंपनी बाइटडान्सची बँक खाती फ्रिज
बाइटडान्सने याला न्यायालयात आव्हान दिले आहे. तसेच हा आदेश लवकरात लवकर रद्द करावा, यामुळे आपल्या व्यवसायाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते, असेही बाइटडान्सने म्हटले असल्याचे सूत्रांनी सांगितले. (TikTok's parent company Bytedance's bank account frozen over tax evasion allegations)
नवी दिल्ली : शॉर्ट व्हीडिओ प्लॅटफॉर्म टिकटॅकचे स्वामित्व असलेली कंपनी ‘बाइटडान्स’ चे भारतीय बँकेतील खाती फ्रिज करण्यात आली आहेत. कंपनीवर कथित कर चुकवल्याच्या आरोपामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. तर, बाइटडान्सने याला न्यायालयात आव्हान दिले आहे. तसेच हा आदेश लवकरात लवकर रद्द करावा, यामुळे आपल्या व्यवसायाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते, असेही बाइटडान्सने म्हटले असल्याचे सूत्रांनी सांगितले. (TikTok’s parent company Bytedance’s bank account frozen over tax evasion allegations)
जानेवारीत भारतीय कर्मचाऱ्यांना सेवामुक्त केले
बाइटडान्सने जानेवारीत आपल्या भारतातील कर्मचार्यांना कामावरुन काढून टाकले. भारत सरकारने आपल्या लोकप्रिय व्हिडिओ अॅपवरील बंदी न हटविल्याच्या कारणावरुन कंपनीने ही कारवाई केली होती. तथापि, भारतात अद्यापही बाइटडान्सचे 1300 कर्मचारी आहेत, त्यातील बरेच जण परदेशी ऑपरेशन्स हाताळत आहेत, ज्यात कंटेंट मॉडरेशनचा समावेश आहे.
ऑनलाईन जाहिरात करारादरम्यान टॅक्सचोरी उघड
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्चच्या मध्यात सिंगापूरमधील बाइटडान्सचे युनिट आणि सिंगापूरमधील याची मूळ कंपनी टिकटॉक पीटीई लिमिटेड यांच्यात ऑनलाईन जाहिरात करार करताना कथित टॅक्स चोरीबाबत कळले. यानंतर अधिकाऱ्यांनी कंपनीचे सिटी बँक आणि एचएसबीसी बँक खाती ब्लॉक करण्याचे आदेश दिले होते. याशिवाय सूत्रांनी असेही म्हटले आहे की, या दोन बँकांव्यतिरिक्त अधिका-यांनी सिटी बँक आणि एचएसबीसी बँकेला आदेश दिले होते की, टॅक्स आयडेंटिफिकेशन क्रमांकाशी संबंधित असलेल्या कोणत्याही बँक खात्यातून बाइटडान्स इंडियाला आर्थिक व्यवहार करु देऊ नयेत.
आदेशाविरोधात बाइटडान्सची न्यायालयात धाव
बाइटडान्सने यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्यावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यामध्ये बाइटडान्स इंडियाने असा युक्तिवाद केला आहे की जर कंपनीच्या खात्यात फक्त 10 मिलियन डॉलर्स आहेत, तर अशा प्रकारची स्थगिती करणे कायदेशीर प्रक्रियेचा दुरुपयोग आहे आणि यामुळे पगार देणे आणि कर भरणे कठिण होईल. लाइव्ह मिंटच्या वृत्तानुसार, दोन्ही सूत्रांनी त्यांची नावे जाहीर करण्यास नकार दिला आहे. कारण बँक खाते फ्रिज आणि कंपनी कोर्टात जाण्याचे प्रकरण सार्वजनिक केले गेले नाही. (TikTok’s parent company Bytedance’s bank account frozen over tax evasion allegations)
…तर सचिन तेंडुलकर, गांगुली, लक्ष्मण आंतरराष्ट्रीय सामने खेळूच शकले नसते, वीरेंद्र सेहवागचं मोठं विधानhttps://t.co/S7JBh14bI6#VirenderSehwag #SachinTendulkar #Ganguli #VVSLaxman
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 30, 2021
इतर बातम्या
बीएमसी प्रशासन दक्षता घेतंय, मुंबईकरांनी घाबरुन जावू नये : महानगरपालिका आयुक्त चहल