डोळ्यांपासून इतकी दूर ठेवा मोबाईल स्क्रीन, नाही तर होणार मोठे नुकसान, पाहा डिटेल्स

| Updated on: Aug 08, 2024 | 8:33 PM

स्मार्टफोनमुळे तरुणांपासून वृद्धापर्यंत साऱ्यांची दृष्टी कमजोर होऊ लागली आहे. त्यामुळे स्मार्टफोन वापरताना काळजी घ्यायाला हवी असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

डोळ्यांपासून इतकी दूर ठेवा मोबाईल स्क्रीन, नाही तर होणार मोठे नुकसान, पाहा डिटेल्स
smartphone close to eyes is danger for health
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

आजकालची पिढी बघावे तेव्हा स्मार्टफोन स्क्रीनला नाक लावून बसलेली असते. स्मार्टफोन्स शिवाय आता कोणतेही काम होणे अशक्य आहे. बॅंकींगपासून ते ऑफिसची कामे देखील आता मोबाईलवर होऊ लागली आहेत. लोकांच्या दैनंदिन व्यवहाराचा अविभाज्य भाग बनलेला स्मार्टफोन आपल्या डोळ्यांची दृष्टी देखील खराब करीत आहे. त्यामुळे अनेकांची डोळ्याची दृष्टी देखील कमी होत चालली आहे. त्यामुळे चाळीशीच्या आधीच तरुणांना चश्मे लागू लागले आहेत. त्यामुळे स्मार्टफोन डोळ्याच्या अंतरापासून किती दूर ठेवावा याबाबत काय सांगितले जाते माहिती…

डोळ्यापासून किती दूर ठेवावा स्मार्टफोनचा डिस्प्ले

कोणत्याही स्मार्टफोनची स्क्रीन डोळ्यांपासून किमान 16 ते 24 इंचापर्यंत दूर ठेवायला हवी. या अंतरावर मोबाईल स्क्रीन ठेवल्याने डोळ्यांवर तणाव येत नाही. तसेच डोळ्यांचे आरोग्य देखील चांगले होते. तसेच स्मार्टफोनच्या स्क्रीनची ब्राईटनेस आणि कॉन्ट्रास्ट लेव्हल देखील योग्य पातळीवर राहायला हवी.

काय म्हणतो नियम?

वास्तविक स्मार्टफोन कोणत्याही डिव्हाईसच्या स्क्रीनचा वापर करताना एक नियम असतो. या नियमाला फॉलो केल्याने डोळ्यांना आराम मिळतो. या नियमाला 20-20-20 असे म्हणतात. हा एक खूप महत्वाचा नियम म्हटला जातो. या नियमामुळे डोळ्यांचे आयुष्य वाढते. या नियमानूसार दर 20 मिनिटाला 20 सेंकदासाठी 20 फूट अंतरावरील वस्तू पाहण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे डोळ्यांचा ताण कमी होतो आणि त्यामुळे डोळे आरोग्यदायी राहातात.

डोळ्याचे स्नायू पेशींना आराम

आपण जण कोणत्याही बारीक अक्षरांना सातत्याने पाहील्याने डोळ्यांवर प्रचंड ताण येतो. त्यामुळे स्मार्टफोनची स्क्रीनला सातत्याने पाहील्याने डोळ्यांवर तणाव येतो. यामुळे डोळ्यात रुक्षपणा वाढतो. डोळे जळजळतात आणि धूसर होते. परंतू 20-20-20 नियमाने डोळ्याचे स्नायू पेशींना खूप आराम मिळतो. तसाच रिलॅक्स होण्याचा वेळ देखील मिळतो. ज्यामुळे तुमचे डोळे देखील सुरक्षित राहतात असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.