लेकाची हौस पुर्ण करण्यासाठी बापाने भंगारातून बनवली ई बाईक
शाफिनची ही बाईक इतकी मस्त आहे, लाखो रुपयांच्या गाड्या असलेल्या त्याच्या मित्रांनाही या गाडीची राईड घेण्याचा मोह आवरत नाही. ही बाईक बनविण्यासाठी रहीमखान याना साधारण २० हजार रुपये खर्च आला आहे.
वाशिम : लेकाचं स्वप्न होतं, बाईक (bike) घेण्याचं पण बापाची (father) परिस्थिती हलाकीची, मग काय बापाने स्वतःच लेकासाठी ई बाईक बनवली. अन ती ही भंगारातून आणलेल्या साहित्यापासून, आता मुलगा मोठ्या दिमाखात आपल्या मित्रांसोबत बाईक वरून कॉलेजला जात आहे. बाईक तयार करण्यासाठी खर्च देखील आला आहे. ही स्टोरी वाशिम (washim karanja) जिल्ह्यातील कारंजा शहरातील आहे. सध्या ती बाईक पाहायला लोकांची गर्दी असते. त्याचबरोबर परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.
ही स्टोरी आहे, वाशिमच्या कारंजा शहरात राहणाऱ्या रहीम खान आणि शाफिन खान या पिता-पुत्राची, शाफिन हा आपल्या घरापासून दूर असलेल्या कॉलेजला पायी जायचा. पण त्याचे मित्र मात्र मोटार सायकलने कॉलेजला जात असतं. हीच बाब त्याच्या मनाला लागल्याने त्याने आपल्या वडिलांकडे बाईक घेऊन देण्याची मागणी केली. पण इलेक्ट्रिशनचं काम करून संसाराचा गाडा हाकणाऱ्या रहीम यांच्याकडे लेकाला बाईक घेऊन देण्या एव्हडे पैसे नव्हते. तेव्हा तेव्हा त्यांनी स्वतः चं लेकाला बाईक बनवून देण्याचा निश्चय केला. भंगाराचं दुकान गाठलं तिथून त्यांनी बाईक साठी लागणारे हँडल, शॉकअब्स, टायर इत्यादी साहित्य अगदी स्वस्तात खरेदी केलं. नंतर एक २४ होल्टची बॅटरी अन २४ होल्टची मोटार घेतली. घरी पडून असलेल्या मुलाच्या जुन्या सायकलच्या बॉडी वर फिट केली. स्वतः इलेक्ट्रिशन असल्याने व्यवस्थित सर्किट जोडून भंगार साहित्यापासून एक ई-बाईक तयार केली. शिवाय तिला चांगला लूक देण्यासाठी स्पीडमीटर, हेडलाईट, साईड इंडिकेटर जोडून कलरिंगही केली. याच जुगाड बाईक वरून आता शाफिन कॉलेजला जात आहे.
शाफिनची ही बाईक इतकी मस्त आहे, लाखो रुपयांच्या गाड्या असलेल्या त्याच्या मित्रांनाही या गाडीची राईड घेण्याचा मोह आवरत नाही. ही बाईक बनविण्यासाठी रहीमखान याना साधारण २० हजार रुपये खर्च आला आहे. त्याचबरोबर त्यांना दोन महिन्यांच्या कालावधी लागला, आता ही बाईक ५० ते ६० किलो वजन घेऊन २० ते २५ किमी प्रतितास वेगाने रस्त्यावर धावत आहे. याला जास्त क्षमतेची बॅटरी आणि मोटार जोडली तर हिची क्षमता आणि वेगही वाढवता येईल अशी माहिती रहीम यांनी दिली.