मुंबई : Toyota ब्रँडच्या कार सर्वांनाच आवडतात. पहिल्याच नजरेत प्रेमात पडावं इतक्या आकर्षक अशा टोयोटाच्या कार असतात. Toyota या प्रतिष्ठीत कंपनीच्या Fortuner सिरीजमधील कार सर्वात प्रसिद्ध आहेत. Fortuner ब्रँडची क्रेझ आणि ग्राहकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन Toyota ने याच सिरीजमधील आपल्या प्रसिद्ध अशी SUV Fortuner चे फेसलिफ्ट मॉडल जारी केलं आहे. लवकरच हे नवे मॉडेल बाजारात दाखल होणार असून या कारचं नाव Toyota Fortuner ‘Legender’ असं ठेवण्यात आलं आहे. या Legender ची भारतीय बाजारातील शो-रुम किंमत 29.98 लाख रुपये आहे. (toyota fortuner legender new car facelift version all details information)
Toyota ने जारी केलेल्या Toyota Fortuner ‘Legender’ या आपल्या नव्या मॅडेलच्या फ्रन्ट लूकमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. या नव्या मॉडेलमध्ये Grill आणि Bumper मध्ये बदल करण्यात आले आहेत. फॉर्च्यूनरच्या फेसलिफ्टमधील Grill पूर्वीपेक्षा Slim आहेत. या फेसलीफ्टला काळ्या रंगाची फिनिशिंग देण्यात आली आहे. Bumper सोबत त्रिकोणी आकाराचे फॉक्स एअर इंटेक्स आहेत. या नव्या मॉडेलमध्ये SUV च्या हेडलाईटमध्येसुद्धा बदल केलेले आहेत.
1) Toyota Fortuner फेसलिफ्ट- पेट्रोल
>> 4X2 मॅन्यूअल : 29.98 लाख रुपये
>> 4X2 ऑटो : 31.57 लाख रुपये
>> 4X2 मॅन्यूअल : 33.48 लाख रुपये
>> 4X2 ऑटो : 34.84 लाख रुपये
>> 4X4 मॅन्यूअल : 35.14 लाख रुपये
>> 4×4 ऑटो : 37.43 लाख रुपये
फॉर्च्यूनरच्या नव्या मॉडलमधील स्टँडर्ड व्हर्जनमध्ये Sleek Headlamps, नवे ग्रिल, नवे बंपर स्प्लिटर दिलेले आहे. या सर्व बदलांमुळे जुन्या Fortuner च्या तुलनेत नवी Fortuner अतिशय स्टाईलीश आणि अॅग्रेसीव्ह अशी आहे. Toyota कंपनीने Fortuner या गाडीचे इंजिन अपग्रेड केले आहे. नव्या इंजिमध्ये जास्त कार्यक्षमता असून नवी Fortuner पेट्रोल आणि डिझेल अशी दोन्ही प्रकारच्या इंधनांवर चालू शकते. 2.7 लीटर Petrol Engine 164 Bhp च्या क्षमतेने 245 Nm च्या Peak टॉर्कची निर्मीती करेल.
संबंधित बातम्या :
सॅमसंगच्या टीव्हीवर Free मिळणार स्मार्टफोन आणि साऊंडबार, धमाकेदार आहेत ऑफर्स
पेट्रोल पंपप्रमाणेच इलेक्ट्रिक गाड्यांसाठी ‘चार्जिंग’ स्टेशन उघडणार, चार्जिंगसाठी येणार ‘इतका’ खर्च!
2021 मध्ये येणार जबरदस्त इलेक्ट्रिक कार, एकदाच चार्ज करून 500 किमी धावणार
(toyota fortuner legender new car facelift version all details information)