तुमच्या मुलांच्या हातात फोन देण्याआधी ‘या’ सेंटिग करा ऑन , YOUTUBE वर दिसणार नाही ‘ते’ व्हिडिओ
YOUTUBE वर अनेक वेळा फीडमध्ये सर्च करताना असे काही व्हिडीओही दिसतात, ज्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांना किंवा मुलांना फोन देण्यास कचरता. अशा परिस्थितीत तसे कोणतेही व्हिडिओ सर्च करताना दिसू नये यासाठी या मार्गचा अवलंब करा.

इंटरनेटच्या जगात दररोज करोडो लोकं YouTube चा वापर मोठ्या प्रमाणात करतात. या ॲपवर तुम्हाला मनोरंजनासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व प्रकारचा कंटेंट पाहायला मिळतो. पण अनेक वेळा YouTube ॲप उघडताच विचित्र व्हिडिओ दिसतात. त्यामुळे आपला फोन कुटुंबातील इतर सदस्यांना देताना विचार करावा लागतो. अनेक वेळा सर्च फीडमध्ये असे काही व्हिडिओही दिसतात, ज्यामुळे तुम्ही तुमचा फोन मुलांना फोन देण्यास कचरता. पण आज आम्ही तुम्हाला एक अशी ट्रिक्स सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही सर्च फीडवर सहजपणे नको असणारे व्हिडिओ बंद करू शकता आणि तुमचा फोन मुलांनाही कुटूंबातील इतर सदस्यांना देऊ शकता.
सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या फोनमध्ये YouTube ॲप उघडावे लागेल. यानंतर तुमच्या प्रोफाईलवर जा. त्यानंतर तुम्हाला सेटिंग्ज पर्यायावर जाऊन General वर क्लिक करावे लागेल.
यानंतर तुम्ही थोडेसे स्क्रोल कराल तेव्हा तुम्हाला Restricted Mode चा पर्याय दिसेल. तेथे तुम्हाला समोर एक बटण दिसेल, ते तुम्ही चालू करा.
तुम्ही बटण चालू करताच तुम्हाला Apply वर क्लिक करावे लागेल. हे सेटिंग चालू केल्यानंतर, तुमच्या YouTube फीडवर विचित्र व्हिडिओ दिसणे बंद होईल आणि तुम्ही तुमचा फोन तुमच्या मुलांनाही देऊ शकाल.
सबटायटल्स कसे चालू करायचे?
बऱ्याच वेळा आपण असे व्हिडिओ पाहतो ज्यामुळे आपल्याला भाषा समजण्यात अडचण येते. पण YouTube वर, सबटायटल्स चालू करूनही तुम्ही तुमच्या भाषेत तो व्हिडिओ समजून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला थोडे काम करावे लागेल. जेव्हा तुम्ही YouTube व्हिडिओ प्ले कराल तेव्हा तुम्हाला CC चा पर्याय दिसेल. ते चालू करून, तुम्ही व्हिडिओच्या खालील येणारे टेक्स्ट अगदी सहजपणे वाचू शकता आणि तुम्हाला व्हिडिओचा कंटेंट पाहण्यात कोणतीही अडचण येणार नाही.