Twitter update | ट्विटरचे नवे फिचर लॉंच, पाठवता येणार व्हाईस मेसेज
ट्विटरने थेट व्हाईस मेसेज पाठवण्याची सोय करून दिली आहे. ट्विटरच्या अपडेटेड व्हर्जनमध्ये ही सुविधा असेल. (twitter new feature direct voice message)
मुंबई : ज्वलंत मुद्द्यांवर कमी शब्दामध्ये थेटपणे व्यक्त होण्यासाठीचे माध्यम म्हणून ट्विटरची ओळख आहे. ट्विटरचे युजर्स वेगवेगळ्या देशातील नागरिक असून त्या देशांच्या प्रमुख व्यक्तीसुद्धा ट्विटरवर अॅक्टिव्ह असतात. त्यामुळे कालानुरुप बदल म्हणून ट्विरटमध्ये नवनवे अपडेट केले जातात. नुकत्याच केलेल्या बदलानुसार ट्विटरने थेट व्हाईस मेसेज पाठवण्याची सोय करून दिली आहे. ट्विटरच्या अपडेटेड व्हर्जनमध्ये ही सुविधा असेल. (twitter new feature of direct voice message)
ट्विटरचे नवे अपडेटेड व्हर्जन आता आणखी मजेदार असणार आहे. ट्विटरने आपल्या नव्या व्हर्जनमध्ये व्हाईस मेसेज (voice messages) करण्यासाठी ऑप्शन उपलब्ध करुन दिला आहे. युजर्सना 17 जानेवारीपासून या नव्या फिचरचा वापर करता येईल. ट्विटरने ही सुविधा भारत (India), ब्राजील (Brazil) आणि जपान (Japan) या देशांसाठी जारी केली आहे. कोणतेही ट्विट करताना जशी शब्दांची मर्यादा असते, तशीच 140 सेकंदांची मर्याद आता व्हाईस मेसेजमध्ये असणार आहे.
नव्या फिचरचा उपयोग कसा करावा ?
ट्विटरने आपले नवे फिचर जारी केल्यानंतर युजर्सकडून आनंद व्यक्त केला जातोय. ट्विटरचे अपडेटेड व्हाईस मेसेजचे व्हर्जन वापरण्यासाठी सर्वप्रथम ट्विटर अॅप डाऊनलोड करावे लागेल. त्यानंतर डायरेक्ट मेसेजिंग ऑप्शनमध्ये जाऊन व्हाईस रेकॉर्डिंग (voice recording) या बटनावर क्लिक करा. त्यानंतर व्हाईस मेसेज रेकॉर्ड केल्यानंतर ते समोर पाठवता येईल. विशेष म्हणजे, व्हाईस मेसेज समोर पाठवण्यापूर्वी त्याला पुन्हा एकण्याचा ऑप्शन ट्विटरने दिलेला आहे. त्यामुळे योग्य मेसेज रेकॉर्ड झाला का?, हे चेक करता येणार आहे. व्हाईस मेसेजची सुविधा मोबाइल अॅप (mobile app) तसेच (desktop) अशा दोन्हींवर उपलब्ध आहे.
ट्विटर काय म्हणाले?
आपल्या अपडेटेड व्हर्जनविषयी बोलताना ट्विटरने नवे फिचर लॉन्च केल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. भारत ही ट्विटरसाठी महत्वाची बाजारपेठ आहे. त्यामुळे आम्ही ट्विटरला वेळोवेळी अपडेट करत असतो. या नव्या फिचरमुळे ट्विटर युजर्सना एक नवा अनुभव मिळू शकेल, असे ट्विटरने सांगितले आहे. यापूर्वी ट्विटरने ऑडियो मेसेजिंगचे पिचर लॉन्च केले होते. त्यानंतर आता व्हाईस मेसेजिंगचीही सुविधा ट्विटरने जारी केली आहे.
इतर बातम्या :
देसी ट्विटर Koo App मधून चिनी गुंतवणूकदाराचा काढता पाय
High-Speed Night Data offer | खुशखबर ! ‘या’ कंपनीच्या ग्राहकांना रात्री मोफत इंटरनेट, जाणून घ्या अटी
वर्षभरात तब्बल 4 कोटी फोनची विक्री, नंबर वन पटकावत Xiaomi चा दबदबा, टॉप 5 कंपन्या कोणत्या?
(twitter new feature of direct voice message)