Twitter : ‘भोंगळ’ कारभाराला चाप; न्यूडिटीमुळे ट्विटरकडून 43 हजार अकाऊंट बंद

मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरनं जून महिन्याचा अहवाल प्रसिद्ध केलाय. कंपनीनं केवळ जून महिन्यात 43 हजार 140 हून अधिक खात्यांवर नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. करवाई करण्यात आलेल्यांची यादी पाहा...

Twitter : 'भोंगळ' कारभाराला चाप; न्यूडिटीमुळे ट्विटरकडून 43 हजार अकाऊंट बंद
ट्विटरImage Credit source: social
Follow us
| Updated on: Aug 02, 2022 | 3:26 PM

नवी दिल्ली : मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरनं (Twitter) जूनचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. कंपनीनं जून महिन्यात तक्रारींवर केलेल्या कारवाईबाबत हा अहवाल (Report) जारी केला आहे. कंपनीने केवळ जून महिन्यात 43 हजार 140 हून अधिक खात्यांवर नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. या कारवाईत सर्वाधिक 536 प्रकरणे गैरवर्तन आणि छळाशी संबंधित आहेत. तर 134 प्रकरणे दुर्भावनापूर्ण आणि द्वेषाशी संबंधित आहेत. अहवालानुसार ट्विटरने लैंगिक हिंसा, नग्नता आणि संबंधित प्रकरणांमुळे सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मवरून 40 हजार 982 खाती काढून टाकली आहेत. यापैकी 2158 खाती हिंसा आणि दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याच्या आरोपामुळे काढून टाकण्यात आली. ट्विटरकडे भारतातून 724 तक्रारी आल्या होत्या. ट्विटरनं तयार केलेल्या स्थानिक यंत्रणेद्वारे या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. 26 मे 2022 ते 25 जून 2022 दरम्यान आलेल्या तक्रारींच्या आधारे ट्विटरनं कारवाई केली आहे. ट्विटरनं एकूण 122 URL वर कारवाई केली आहे.

 52 तक्रारी

खाते निलंबन संपुष्टात आणण्याच्या एकूण 52 तक्रारी ट्विटरला प्राप्त झाल्या होत्या. परंतु त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. मायक्रोब्लॉगिंग साइटने यापैकी कोणत्याही तक्रारीवर कारवाई केली नाही आणि कोणतेही खाते उघडले नाही.

हायलाईट्स

  1. अहवालानुसार ट्विटरने लैंगिक हिंसा, नग्नता आणि संबंधित प्रकरणांमुळे कारवाई
  2. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून 40 हजार 982 खाती काढून टाकली आहेत
  3. 2158 खाती हिंसा आणि दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याच्या आरोपामुळे काढून टाकण्यात आली
  4. ट्विटरकडे भारतातून 724 तक्रारी आल्या होत्या
  5. ट्विटरनं तयार केलेल्या स्थानिक यंत्रणेद्वारे या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत
  6. 26 मे 2022 ते 25 जून 2022 दरम्यान आलेल्या तक्रारींच्या आधारे ट्विटरनं कारवाई केली आहे
  7. ट्विटरनं एकूण 122 URL वर कारवाई केली आहे.

खरे किती, खोटे किती?

ट्विटरवर 29 कोटीहून अधिक यूजर्स आहेत. यापैकी 5 टक्के यूजर्स स्पॅम किंवा बनावट असल्याचे ट्विटरने यापूर्वीच स्पष्ट केलं आहे.  वारंवार बनावट खाते समोर येत असल्यानं ती देखील एक डोकेदुखीच आहे.

ट्विटरची व्याप्ती

ट्विटर हे आघाडीचं सोशल नेटवर्किंग आणि मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट मानली जाते. ट्विटरच्या साहाय्याने अगदी कमी शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त करुन संवाद साधता येतो. ट्विटरवरील मजकुराला ट्वीट म्हटलं जातं. ट्विटरवर 280 अक्षरांपर्यंतची मर्यादा आहे. ट्विटरचा वापर 35 पेक्षा अधिक भाषांमध्ये केला जातो.ट्विटर वर दररोज 400 मिलियन पेक्षा जास्त ट्विट केले जातात. ट्विटर वर दररोज 400 मिलियन पेक्षा जास्त ट्विट केले जातात. ट्विटरच्या लोगोमधील पक्षी लैरी नावानं जगविख्यात आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.