कमी किंमतीत लाँच होणार ‘या’ कार्स, टाटाच्या 3 दमदार कारचा समावेश
तुम्ही जर कार घेण्याचा प्लॅन करत असाल तर काही कमी किंमतीच्या कार लाँच होणार आहेत. या पॉवरफुल कारच्या यादीत टाटाच्या तीन नव्या कार बाजारात उतरण्याच्या तयारीत आहेत.
नवीन वर्षानिमित्त तुम्ही जर कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा. कारण लवकरच बाजार पेठेत दमदार कार्सचे आगमन होणार आहे. तुम्हाला 10 लाख रुपयांच्या आत बजेटमध्ये आणि लेटेस्ट कार घरी आणण्यासाठी हे पर्याय चांगले सिद्ध होऊ शकतात. टाटा मोटर्स १० लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणारी ३ नवीन कार लाँच करण्याची योजना आखत आहे. या कार्सची सुरुवातीची किंमत 5 ते 6 लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते.
आगामी कारच्या यादीत टाटा पंच, टिगोर आणि टियागो यांचा समावेश आहे. इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये टाटांच्या टियागो आणि टिगोर पाहायला मिळण्याची शक्यता आहे. चला तर मग जाणून घेऊया त्यांची किंमत आणि संभाव्य वैशिष्ट्ये.
Tata Punch Facelift चे फीचर्स आणि किंमत
रिपोर्ट्सनुसार टाटा पंचचे नवे मॉडेल पाहायला मिळू शकतो. तसेच तुम्हाला या नवीन मायक्रो एसयूव्हीमध्ये इलेक्ट्रिकसारखे डिझाइन देखील मिळतील. टाटाच्या या कारमध्ये तुम्हाला LED प्रोजेक्टर हेडलॅम्प, LED Drl मिळू शकतात.
या कारमध्ये १०.२५ इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम मिळू शकते. ज्यामुळे ग्राहकांना आणि प्रवाशांना मनोरंजनाची कमतरता भासणार नाही याची देखील काळजी कंपनीने घेतली आहे . यात वायरलेस कारप्ले, अँड्रॉइड ऑटो असे अनेक फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. या कारच्या इंजिन अपडेटबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र कंपनी आगामी कारच्या इंजिनमध्ये कोणताही बदल करू शकत नाही. टाटाच्या या कारची एक्स-शोरूम किंमत 6 लाख रुपयांपेक्षा जास्त असू शकते.
Tata Tiago Facelift
येत्या काही दिवसांत भारतीय बाजारपेठेत टाटा टियागो देखील लाँच होऊ शकते . यामध्ये तुम्हाला अनेक बदल पाहायला मिळतात. या कारच्या फीचर्स आणि एक्सटीरियर डिझाइनमध्येही कॉस्मेटिक अपडेट्स पाहायला मिळतील. टियागो फेसलिफ्टमध्ये टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि ॲडव्हान्स कनेक्टिव्हिटी असण्याची शक्यता आहे. Tata Tiago या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 5 लाख रुपये असू शकते.
Tata Tigor Facelift
टाटाच्या टिगॉर फेसलिफ्ट व्हर्जनही तुम्ही लवकरच पाहू शकता. या कारमध्ये नवीन डिझाइन आणि ॲडव्हान्स फीचर्स दिले जाऊ शकतात. टाटाच्या या कारची संभाव्य किंमत 6 लाख रुपये असू शकते.