चुकीने दुसऱ्या नंबरवर UPI पेमेंट झाले आहे? अशा प्रकारे पैसे मिळू शकतात परत
बऱ्यादा चुकीच्या नंबरवर पैसे ट्रान्सफर झाल्यामुळे गोंधळ होतो. अशा वेळेस आपले पैसे कशा प्रकारे परत मिळवू शकतो ते जाणून घेऊया.
मुंबई : सध्याच्या काळात जवळपास सर्वच गोष्टी ऑनलाईन झालेल्या पहायला मिळतात. परिणामी आपलं जीवन आणखी सुखकर झाले असून घरबसल्या एका क्लिकवर आपण अनेक गोष्टी करू शकतो. आता आर्थिक व्यवहारही ऑनलाईन (UPI Payment issue) झाल्याने तर अनेक कामं सोपे झाले आहेत. डेबिट कार्ड किंवा रोख रक्कम तुम्हाला सगळीकडे घेऊन जाण्याची गरज लागत नाही. हातातल्या फोनवरूनच तुमचं काम होतं. तुम्ही तुमच्या दैनंदिन गरजांसाठी, लहान किंवा मोठ्या, तुमच्या फोनद्वारे पैसे देऊ शकता. कोविडदरम्यान UPI चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला.
Paytm, Google Pay, PhonePe आणि BHIM अॅपच्या स्वरूपात UPI वापरण्यासाठी लोकांना वेगवेगळे पर्याय देखील मिळाले, मात्र बऱ्याचदा UPI युजर्सना अडचणीचा सामना करावा लागत आहे. बऱ्यादा चुकीच्या नंबरवर पैसे ट्रान्सफर झाल्यामुळे गोंधळ होतो. अशा वेळेस आपले पैसे कशा प्रकारे परत मिळवू शकतो ते जाणून घेऊया.
अॅप सपोर्टशी बोला
आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, वापरकर्ता प्रथम पेमेंट सेवा प्रदात्याला या प्रकरणाची तक्रार करू शकतो. तुम्हाला GPay, PhonePe, PayTM च्या केअर सपोर्टवर कॉल करून या प्रकरणाची माहिती द्यावी लागेल. तुम्ही येथे तक्रार करू शकता आणि परताव्याची विनंती करू शकता. तुमचे पैसे परत करायचे की नाही हे पैसे ज्याला गेले आहेत त्याच्यावर आहे. चुकून असे काही घडल्यानंतर, तुम्ही UPI अॅपच्या सपोर्ट विभागात तक्रार नोंदवावी. याशिवाय, तुम्ही BHIM अॅपच्या टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक 18001201740 वर चुकीच्या व्यवहाराची तक्रार करू शकता.
येथे करू शकता तक्रार
जर वापरकर्त्याला कस्टमर केअरकडून कोणतीही मदत मिळाली नाही, तर तो NPCI पोर्टलवर तक्रार करू शकतो. तक्रार कशी करायची ते जाणून घेऊया.
- What we do या टॅबवर जा
- त्यानंतर UPI वर क्लिक करा.
- येथे Dispute Redressal Mechanism चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
- येथे तुम्हाला व्यवहार तपशील प्रविष्ट करण्यास सांगितले जाईल.
- तपशील प्रविष्ट केल्यानंतर, जेथे कारण विचारले जाईल, निवडा चुकीच्या पद्धतीने दुसऱ्या खात्यात हस्तांतरीत हा पर्याय निवडा
- त्यानंतर तक्रार दाखल केली जाईल.
बँकेशी संपर्क साधा
यानंतरही कोणताही तोडगा निघाला नाही, तर तुम्ही तुमची तक्रार पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर बँक आणि ज्या बँकेत पैसे पाठवले आहेत त्या बँकेकडे करू शकता.