Facebook वापरण्यासाठी लवकरच पैसे द्यावे लागणार, Meta ने घेतला निर्णय
फेसबुक आणि इंस्टाग्रामचा वापर करणाऱ्या युजर्सना आता आपला खिसा खाली करावा लागणार आहे. मेटाने या दोन्ही सेवा पेड करण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली | 2 सप्टेंबर 2023 : फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरणाऱ्यासाठी महत्वाची बातमी आली आहे. मेटाने ( Meta ) त्याच्या दोन सर्वात सोशल मिडीया प्लॅटफॉर्म फेसबुक ( Facebook ) आणि इंस्टाग्राम ( Instagram ) यांच्या वापरासाठी शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरण्यासाठी तुम्हाला पैसे खर्च करावे लागणार आहे. फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरणाऱ्यांची संख्या भारतात प्रचंड मोठी आहे. इंस्टाग्रामने आपल्या रिल्सचा वेळही तीन मिनिटांवरुन दहा मिनिटे करण्याचा निर्णय घेतला आहे.
फेसबुक आणि इंस्टाग्रामची कंपनी मेटाने हे दोन्ही सोशल मिडीया प्लॅटफॉर्म वापरण्यासाठी शुल्क आकारचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात आलेल्या बातम्यांनूसार सध्या पेड सर्व्हीस युरोपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. युरोपीयन युनियनकडून जाहीराती आणि प्रायव्हसीवरुन दबाव वाढवत नेल्याने मेटाने युरोपात पेड सर्व्हीस लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मेटा कंपनी फेसबुक आणि इंस्टाग्रामचे पेड व्हर्जन भारतातही लागू करु शकते. परंतू यासंदर्भात अजून अधिकृतरित्या अजून स्पष्टीकरण केलेले नाही.
फ्री आणि पेड असे दोन व्हर्जन ?
युरोपियन युनियनमधील देशांच्या युजर्ससाठी फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या दोन सेवा असतील. यातील एक सेवा पेड असेल तर दुसरी फ्री असणार आहे. जे युजर्स फेसबुक आणि इंस्टाग्रामची पेड सर्व्हीस घेतील त्यांना फेसबुक आणि इंस्टाग्रामवर जाहीराती दिसणार नाहीत. तर फ्री व्हर्जनवर पहिल्यासारख्याच जाहीराती दाखविल्या जातील. मेटाने आतापर्यंत यावर कोणताही अधिकृत भाष्य केलेले नाही.
मेटावर होतोय वापर
मेटाने अजूनपर्यंत हेही स्पष्ट केलेले नाही की पेड व्हर्जनसाठी युजर्सला किती पैसे भरावे लागतील. तसेच एकाच पेड सर्व्हीसमध्ये इस्टाग्राम आणि फेसबुक दोन्ही सेवा वापरता येतील कि दोन्ही सेवांसाठी वेगवेगळे पैसे भरावे लागतील. मेटा साल 2019 पासून युरोपीयन युनियनच्या चौकशीला सामोरे जावे लागत आहे. कंपनीवर युजर्सचा डाटा त्यांच्या परवानगीविना एकत्र केल्याचा आरोप गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे.