VI चा कमी किंमतीत २७० दिवसांची वैधता देणारा नवा प्लॅन लाँच, जाणून घ्या किंमत
व्होडाफोन आयडियाने प्रीपेड युजर्ससाठी एक सर्वात स्वस्त आणि सर्वांना परवडणारा प्लॅन लाँच केला आहे ज्यात कंपनीकडून २७० दिवसांची वैधता मिळते. या प्लॅनची किंमत किती आहे आणि या प्लॅनमुळे तुम्हाला कोणते फायदे मिळतील हे आम्ही तुम्हाला सांगणारा आहोत.

भारतात अनेक टेलिकॉम कंपन्या आहेत ज्या ग्राहकांसाठी नेहमी नवनवीन योजना लाँच करत असतात. तसेच ग्राहकांना कमी किंमतीत जास्त वैधता असलेला प्लॅन देत असतात जेणेकरून सर्व ग्राहकांना त्याचा फायदा होतो. अशातच TRAI कडून मार्गदर्शक सूचना मिळाल्यानंतर टेलिकॉम कंपन्यांनी ग्राहकांसाठी आवडणारे व परडवणारे कमी किंमतीचे प्लॅन तयार करण्यास सुरुवात केली आहे. कधीकधी अनेक ग्राहकांना फक्त कॉलिंग आणि एसएमएसची सेवा असलेल्या प्लॅनची आवश्यकता असते, परंतु डेटासह असलेला प्लॅनचा अनेक ग्राहकांना खरेदी करावा लागतो आणि डेटासह या प्लॅनचे शुल्क भरावे लागते. पण आता TRAIकडून मार्गदर्शक तत्त्वे मिळाल्यानंतर VIने आता एक प्लॅन लाँच केला आहे जिथे तुम्हाला फक्त कॉलिंग आणि एसएमएससाठी पैसे द्यावे लागतील.
नव्या VI Plan कंपनीने नवीन प्लॅन लाँच केला आहे ज्यात तुम्हाला अधिक वैधता देण्यात येणार आहे. तर या प्लॅनची किंमत 1460 रुपये इतकी असून किंमत जाणून घेतल्यानंतर आश्चर्य वाटणे साहजिक आहे, पण या प्लॅनची एक गोष्ट तुम्हाला आवडेल ती म्हणजे कमी किंमतीत सार्वधिक काळ वैधता मिळते.
VI 1460 योजनेचा तपशील




1460 रुपयांच्या VIप्लॅनमध्ये युजर्संना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसचा फायदा होणार आहे. व्होडाफोन आयडियाकडून हा प्लॅन खरेदी करणाऱ्या युजर्संना २७० दिवसांची म्हणजेच जवळपास ९ महिन्यांची वैधता मिळणार आहे. अशातच 100 एसएमएस संपल्यास कंपनी तुमच्याकडून प्रति लोकल मेसेजसाठी 1 रुपये आणि एसटीडी मेसेजसाठी 1.5 रुपये आकारणार आहे. तर कंपनी लवकरच युजर्ससाठी आणखी काही नवीन प्लॅन लाँच करण्याच्या तयारीत आहे.
तुम्हाला कसा फायदा होणार ?
व्होडाफोन आयडियाकडून हा प्लॅन येण्यापूर्वी कॉलिंग आणि एसएमएस बेनिफिटहवे असलेल्या ग्राहकांना असा एखादा प्लॅन खरेदी करावा लागायचा की ज्यामध्ये डेटा सुद्धा मिळत होता. पण तुम्हाला देखील माहित असेलच की कंपनी कोणतीच सर्व्हिस फ्री देत नाही. तुम्हाला फक्त डेटासाठी सुद्धा पैसे भरावे लागायचे. परंतु व्होडाफोन आयडियाकडून तुम्हाला आता डेटासाठी कोणतेही पैसे न भरता फक्त कॉलिंग आणि एसएमएससाठी पैसे भरावे लागणार आहे.